नात्याचा परीघ !
भाग २ :
निलेश ने प्रीतीला खांद्याला हलवून विचारले, "काय आहे हे? तू पूर्वा ला आदी का म्हणतेयस? कोण आहे आदी? काय झालेय माझ्या पूर्वा ला? "
प्रीती ने निलेश ला दिवाणखान्यात आणले आणि कहाणी चालू केली.
"निलेश तुला आठवत ? आपण एकाच कंपनीमध्ये आपलं जॉब चालू केला होता.induction training ला आपली भेट झाली.आपली चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर काही activities मध्ये आपण एकत्र होतो.
आठवड्यात दोन वेळेसच तू आमच्या टीम ला meeting निमित्त यायचास ,पण एक वेगळं नातं तयार होत होत. मी मंगळवार आणि शुक्रवार येण्याची वाटच पाहत असायचे. एकदा तुझ्याही डोळ्यात मला माझ्यासाठी माझ्यासारखाच भाव दिसला मला वाटलं तू पण माझा विचार करतोस.
काही दिवस असेच गेले मी तुझ्यात गुंतत चालले होते.तुझ्याशी बोलण्याचे बहाणे शोधात होते.पण मला माझ्या priorities अडवत होत्या.घरातल्या जबाबदाऱ्या, स्वतःचे पाहिलेले स्वप्न या सगळ्यासाठी मला वेळ पाहिजे होता.
पण दुसरीकडे तुझ्यात गुंतणही वाढलं होत.तुझ्या बरोबर फक्त वेळ घालवण्यासाठी तू ज्या गोष्टींमध्ये असायचास तिथे सगळीकडे असण्याचा प्रयत्न मी करत होते.तुला आठवत HR ला कॉल करून मी अचानक सांगितलं होत मी पण येतेय ऑफिस च्या सहलीला कारण मला कुठूनतरी कळलं होत तू येतोयस त्या बस मध्ये.शेवटी माझं मन माझ्या डोक्यावर हरलं होत, आणि मानाने ठरवलं कि आता ता येऊन विचारायचेच " माझ्याशी लग्न करशील?"
आत्ताही आठवते मला ती तारीख ७ एप्रिल मी ठरवलं होत तुला विचारायचं ७ एप्रिल ला गुरुवार होता.दुसरे दिवशी तू येणार होतास तू आलास कि तुला coffe साठी विचारायचे आणि तिथेच माझ्या मनातल्या भावना तुझ्याजवळ व्यक्त करायच्या.
दुसरे दिवशी मी थोडं स्वतःला नीट आवरून, सावरून आले होते.सकाळचे दहा वाजले तरी तू आमच्या टीम मध्ये आलाच नाहीस. ऍडमिन ला विचारले तर तिने सांगितले तू आज येणार नाहीस.
थोडासा हिरमोस झाला माझा पण विचार केला ठीक आहे मंगळवारी सांगू."
निलेश च्या चेहऱ्यवाराचे भाव भरभर बदलत होते.आश्चर्य, तिरस्कार हतबलता सगळं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.प्रीती मात्र शांत होती.ज्याच्यासाठी ती एव्हडी इमोशनल होती तो समोर असून ती एव्हडी शांत होती निलेश च्या मनात नकळत शंका अली.
प्रितीने पाणी घेऊन पुढे चालू केले, " शुक्रवार गेला शनिवारी मी आशु ला फोन केला.आठवते तुला आशु? वरच्या टीम मध्ये होती.तिच्याशी बोलताना कळले कि शुक्रवारी ८ एप्रिल ला, तुझी पूर्वा नावाच्या मुलीसोबत एंगेजमेंट झाली आहे ".
"खरं सांगते पायाखालची जमीन सरकली होती ,पहिल्यांदा देवाला प्रतिप्रश्न केले होते.का माझे प्रेम असे तोडले? का तुझ्या जवळ येण्याआधीच तुझ्यापासून कायमचे लांब केले?"
"पण या सगळ्याचा काहीच उपयोग नव्हता आता. सगळं संपलं होत, तू कायमचा दुसऱ्या कोणाचा तरी झाला होतास."
"त्यानंतर एप्रिल ते डिसेंबर तुझं लग्न होईपर्यंत खूप वेळा वाटलं एकदा येऊन तुला सगळं सांगावं, पण १८ डिसेंबर पर्यंत कधीच हिम्मत नाही करू शकले.मी तुला कायमच गमावलं होत. मी तुझी असून कधीच तुझी होऊ शकत नव्हते."
आता मात्र प्रीतीला अश्रू अनावर झाले होते.ती आत्ताही हमसून हमसून रडली.
निलेश ला हे सगळं धक्कादायक होत.पण पूर्वा चा विचार आला आणि तो बोलला,""पण हा आदी कोण आणि आता तो पूर्वा ला का त्रास देतोय?"
प्रीती बोलली , " आदी माझा नवरा आहे."
निलेश ने एकदम आश्चर्याने प्रीती कडे पहिले.
"हो निलेश माझा नवरा आहे. तुझं आणि पूर्वा च लग्न झालं आणि तुम्ही हैद्राबाद शिफ्ट झालात.तुझ्या बाहेर यायला मला दोन वर्ष लागले.खरं किती बाहेर आले होते यावरही शंकाच आहे म्हणा."
"असो , मला डायरी लिहायची सवय होती. आणि मला माझ्या या भावना डायरी शिवाय कोणालाही सांगता येणार नव्हत्या." " मी डायरी मध्ये सगळं लिहाल होत. आपल्या काही आठवणी म्हण ना."
" तीन वर्षाने माझं लग्न झालं. आदिराज इनामदार त्याच नाव, श्रीमंत ,दिसायला देखणा आणि मेन म्हणजे त्याने माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या."
"लग्नाला कोणत्याच तोंडाने नाही म्हणू शकत नव्हते.तू तुझ्या संसारात रमला होतास.तुला मुलगी झाल्याचंही fb ने सांगितलं होत."
"लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते.स्वप्नवत होत सगळं.बडे लोक होते पण माणुसकीला धरून होते.एकाच प्रॉब्लेम होता तो म्हणजे आदिराज चा स्वभाव,विचित्र नाही म्हणता येणार पण थोडा संशयी. लग्नानंतरही मी नोकरी चालूच ठेवली होती,नंतर मला कळले कि आदी रोज माझा पाठलाग करतो ऑफिस पर्यंत, पण मी लक्ष नाही दिल हे समजून कि arrange marriage आहे थोडा वेळ लागेल विश्वास यायला."
"काही दिवसांनी आई च्या घरून माझे काही बुक्स आणायचे होते, त्यामुळे मी आणि आदी गेलो होतो. त्या बुक्स बरोबर माझी ती डायरी हि आली ज्यामध्ये आपल्या गोष्टी होत्या."
"एकदा मी ओफिस ला गेलेले असताना आदी ने माझी डायरी वाचली आणि सगळंच बदललं. मला त्याची सतत टोमणे गिरी , सतत किरकिर एकदातरी त्याने हात उचलला माझ्यावर. त्याला सतत असा वाटायचं कि मी त्याच्यावर प्रेम नाही करत"." आमच्यातली वाद कमी व्हावेत म्हणून आमच्या घरच्यांनी आम्हाला या घरात राहायला पाठवलं.त्यांना वाटलं कि आम्हाला एकांत मिळेल इथे आल्यावर , खरंच एकांत मिळालं आमच्या भांडणाला , फक्त आदीच चुकला असा नाहीए कदाचित मी पण चुकले मगच सगळं विसरून मी आदींवर एकदा प्रेम करून तरी पाहायला हवं होत.आत्तापर्यंत बेड रूम मध्ये होत असलेली भांडणे आता घरात होऊ लागली.आणि अश्यातच या जिन्यावरून पडून आदींचा अंत झाला.मारताना तो एकाच गोष्ट बोलला ज्याने माझी बायको माझी होऊ दिली नाही त्याला त्याची बायको मी देणार नाही.तेव्हा पासून मला पूर्वा ची काळजी वाटत होती.भीती वाटत होती कि तो मेल्यानंतर काही करणार तर नाही ना? आणि माझी ही भीती जास्तच वाढली जेव्हा मी पूर्वा आणि तुला इथे राहायला आलेलं पाहिलं."
"तेव्हाच लक्षात आलं होत हे तुमचं नशीब नाही तर आदिराज ची शक्ती आहे ती तुम्हाला इथे घेऊन आली आहे,आणि तेव्हाच ठरवलं काहीही झालं तरी तुझ्या नात्याचा परीघ बिघडू द्यायचा नाही."
आता मात्र निलेश पुरता घाबरला होता कारण कोणता रोग असता तर डॉक्टर ला दाखवलं असत, पण मेलेल्या माणसाशी कसं लढणार ?त्याच हि भीती प्रीती ने ओळखली.
निलेश ने प्रीतीला विचारले पण आम्ही इथे राहायला आल्यानंतर दोन तीन महिन्याने आम्हाला त्रास चालू झाला, त्याआधी कधी काही जाणवलं देखील नाही असा कसं?
प्रीती ने सांगितलं "तुम्ही राहायला आले तेव्हा तुमचे वडिलोपार्जित देव बरोबर घेऊन आलात आणि पूर्वा खूप मनोभावे त्याचे पूजन करायची, पण त्यादिवशी नुपुरा खेळात मागच्या अंगणात गेली आणि तिने खेळता खेळता मागच्या अंगणात ठेवलेला मारुती पालथा केला ज्यामुळे आदी च्या भुताला त्याच तोंड दिसत नाहीए.
दुसरेदिवशी पूर्वा ने पूजा नाही केली आणि तो तिच्यावर काबू करू शकला."
"माझ्या पूर्वा ला यातून सोडवायचय मला, मी काय करू शकतो?" निलेश डोक्याला हात लावत खाली बसला व प्रीतीला बोलू लागला.
निलेश च पूर्वा वॉर प्रेम पाहून प्रीतीला पुन्हा भरून आले पण स्वतःला सावरत ती बोलली मी आणेल तुझ्या पूर्वा ला यातून सोडवून.
असा बोलून प्रीती निलेश ला सांगून गेली कि काहीही झालं तरी नूपुरला तिच्या खोलीच्या बाहेर येऊ देऊ नकोस आणि अंगणातला मारुती सरळ कर देवाचा धावा कर विश्वास ठेव पूर्वा फक्त तुझी आहे आणि तुझीच राहील.
आता घरात निलेश एकटाच होता सकाळ होत आली होती.निलेश ने नूपुरला फ्रेश केले जेवू घातले आणि इथेच खेळवत बसला पण लक्ष मात्र पूर्वा कडे लागले होते.मनातल्यामनात देवाचा आई वडिलांचा धावा चालूच होता.
साधारण अकरा वाजता प्रीती परत आली.थोडीशी घाबरलेली होती.तिने सांगितले कि नुपुरा ला आपल्याला घरात ठेवून नाही चालणार तिला कुठेतरी संरक्षित जागी न्यावे लागेल.
पण हे तिच्यासाठी का सुरक्षित नाहीए?
या सगळ्याचे उत्तर देण्याची ही वेळ नाहीए तिला कुठंतरी सोड जिथे ती सुरक्षित राहील.
या सगळ्यामध्ये निलेश ला फक्त श्याम काका आठवले जे नुपूराला सुरक्षेत ठेवतील.निलेश ने लगेच त्यांना कॉल केला ते पण थोड्याच वेळात पोहचले. निलेश ने त्यांना सगळं सांगितलं आणि नुपूराला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली.
श्याम काका खरंच कृष्णासारखे धावून आले होते ते लगेच तयार झाले.ते बोलले मी तिला आपल्या घरातल्या देवघरात नेऊन खेळवतो त्या पेक्षा कोणती जागा सुरक्षित असेल?
तिथे देवाचे तर आहेतच तिच्या आजी आजोबांचे पण आशीर्वाद आहेत.
निलेश ला त्यांचे बोलणे खूप जिव्हाळ्याचे वाटले, वाटलं आई बाबाच त्यांच्या रूपात आहेत.
श्याम काका नुपूराला घेऊन गेले जाताना काळजी घ्या लवकर या पोरगी, म्या, आई बाबा वाट पाहतायत हे लक्षात ठेवा असे सांगून गेले.
आता सुरवात होती पूर्वा ला वाचवायची, प्रीती ने पूर्ण तयारी केली होती.
वाट पाहत होते ते आदींच्या येण्याची म्हणजेच पूर्वा च्या उठण्याची.
साधारण रात्री चे बारा वाजत असतील, पूर्वा उठली पण नॉर्मल होती तिचे वागणेच कळेना. तिने उठून निलेश ला विचारले हि कोण?
निलेश ने सांगितले ही माझी मैत्रीण प्रीती!
पूर्वा ने तिचे हसत स्वागत केले आणि बोलली भूक लागली आहे मी काहीतरी खायला आणते आणि किचेन कडे वळली.
प्रीती आणि निलेश ला काहीच उमगेना हे काय होतेय त्यांची अपेक्षा होती पूर्वा उठेल ओरडेल तो आदी तिच्यामध्ये तिला त्रास देईल.पण असे काहीच घडले नव्हते.
पूर्वा किचेन कडे वळली पण किचेन मध्ये जाऊच शकली नाही कारण मधेच देवघर होत आणि देवघरात वडिलोपार्जित आशीर्वाद होते.
तसं पूर्वा चा पार चढला.ती तिथून आली ते डायरेक्ट प्रीतीवर वार करू लागली तिने प्रीतीची मुंडी धरली आणि ओरडली तू तू आणलं होतास ना त्या श्याम्याला इथे? तो आलं येताना त्या थेटक्यांचे हार घेऊन आला.कालच तुला संपवायला हवं होत.
निलेश ला काहीही सुचत नव्हतं त्याने देवघराकडे पाहिलं तर तिथे आई बाबांच्या फोटोचा हार होता.नंतर त्याच्या लक्षात आला निघताना नुपूराला देवाच्या पाय पडवतो म्हणून ते गेले होते तेव्हा त्यांनी ठेवला.
निलेश ने पूर्वा ला मागून गच्च धरले आणि जोरात बोलला, "ओम नमः शिवाय !"
तशी पूर्वा ने प्रीतीला लांब केले,आणि निलेश वर उडी घेतली. पूर्वा ने निलेश ला खाली पाडले व बोलू लागली तू मला मारणार मला?
"चल, मी सांगते तुला मी कसं मारेल ते माझ्या अंगावर देव पूजेचं पाणी पडलं मी तुझ्या बायकोच्या शरीरात असताना तर मी जाळून मरेल पण पूजा करणार कोण तू कि ही प्रीती?" असा बोलून पूर्वा भेसूर हसू लागली.
निलेश ने विव्हळत प्रीतीला विनंती केली कि जा आणि पूजा कर पण प्रीती ढिम्म सारखी तिथे बसून राहिली.
निलेश ओरडत होता पण ती तसूभरही हालत नव्हती.निलेश च्या विव्हळण्याने पूर्वा मात्र खुश होत होती.
आता ती निलेश च्या अंगावर बसून ववेडेवाकडे चाळे करू लागली त्याच्या पोटावर तबला वाजवू लागली आणि म्हणत होती माझी बायको मला मिळाली नाही तुला तुझी मिळणार नाही.
निलेश ला प्रीती चे नवल वाटत होते ती का काहीच करत नव्हती?
एवढ्यात समोरचे दार तोडले गेले आणि दोन चार साधू घरात आले त्यांनी त्यांच्या कमंडलूतलं पाणी पूर्वा आणि निलेश च्या अंगावर टाकले तसे पूर्वा जोरात ओरडत जमिनीवर लोळू लागली.
निलेश त्याच्या तावडीतून सुटला होता.तो उठून पूर्वा जवळ गेला त्याने तिला जवळ घेतले.तोंडावर पाणी मारून उठवले, तिला शुद्ध आली तशी ती रडू लागली तिला त्रास होत होता.त्याने तिला उठवून बेडरूम मध्ये झोपवले ती शांत झाली आहे आणि सगळं ठीक आहे कळल्यावर तो बाहेर आला त्याने त्या साधकांना बसवून पाणी दिले.आणि प्रीतीला ओरडू लागला का हलली नाहीस? का पूजा केली नाहीस? हे साधक वेळेवर आले नसते तर काय?
पण ती मात्र निश्चल तशीच होती.साधक बोलले, "बाळा तू कोणाशी बोलत आहेस? इथे कोणीच नाहीए."
तास निलेश घाबरला तो प्रीतीकडे बोट दाखवून बोलला अहो हि इथे बसलीय ना ती मुलगी माझी मैत्रीण आहे.
साधक बोलले," बाळा इथे कोणीच नाहीए. आम्ही साधनेला बसलो होतो एका मुलीने आमच्या कुटीबाहेर येऊन आम्हाला विनंती केली कि या घरात काहीतरी विघटीत होतेय तुम्ही लवकर या, म्हणून आम्ही आलो आणि आल्यावर लगेच आम्हाला कळलं काय चालू होत ते.आमचं काम झालं आहे आम्ही निघतो."
हा सगळं प्रकार निलेश च्या डोक्याबाहेर जात होता, साधक निघत होते एवढ्यात त्याने त्यांना थांबवलं आणि आपला लॅपटॉप घेऊन आला त्यामध्ये काही जुने फोटोज होते, त्यातला प्रीती चा फोटो ओपन करून विचारले हि मुलगी होती का ती?"
साधकांनी हो असे उत्तर दिले.हे ऐकून निलेश मात्र पुरता हादरला होता.त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने मागे वळून पहिले तर प्रीती तिथे नव्हती.त्याने पूर्ण घर शोधले प्रीतीला पण ती कुठेच नव्हती.
या सगळ्यात पाहत कधी झाली कळलंच नाही.
सगळ्याच विचार करता करता निलेश ला सोफ्यावरच झोप लागली.सकाळी सात ला पूर्वा च्या आवाजाने त्याला जाग आली ती खाली आली होती बरीच फ्रेश वाटत होती.तिने निलेश ला उठवले आणि नुपूराला उठवण्यासाठी तिच्या रूम कडे जात होती, निलेश ने तिला अडवले आणि सांगतले कि नुपुरा श्याम काका कडे गेली आहे. पूर्वा ला काहीच आठवत नव्हते. निलेश ने पूर्वा ला मिठी मारली आणि बोलला, " trust me!, असे बोलून त्याने तिला सगळं सांगायला सुरवात केली. प्रीती कुठे गेली ते कळले नाही हे ही तो बोलला आणि तो त्याच्या बेस्ट friend जवळ मनमोकळं बोलला "
निलेश पूर्वा दोघेही तयार होऊन , श्याम काकांकडे जायला निघाले.
बाहेर पाडले एवढ्यात शेजारचे एक आजोबा आले आणि बोलले " एक सांगायचं होत, तुम्ही हे घर सोडा इथे एक नवीन तरुण जोडपं राहत होत, त्या माणसाचा इथेको मृत्य झाला होता आणि त्याच्या बायकोचाही इथे मृत्य झाला पण ती कशी मेली कोणालाच नाही माहित. तुम्ही भले लोक वाटता म्हणून सांगितलं हे घर सोडा नका राहू इथे."
हे ऐकल्यावर निलेश पूर्वा च्या डोक्यात पाल चुकचीकली. निलेश ने त्या आजोबांना प्रीती चा फोटो दाखवला आणि विचारलं ही होती का त्या मेलेल्या माणसाची बायको? त्या आजोबांनी हो अशी मान डोलावली आणि निलेश ला अश्रू अनावर झाले.
त्याला तिचे पुन्हा पुन्हा तेच शब्द आठवू लागले ,"मी तुझ्या नात्याचा परीघ नाही बिघडू देणार."
आत्ता निलेश ला तिच्या वागण्याचा अर्थ कळत होता, तीच श्याम काकांकडे गेली नुपुरा च्या काळजीने तिनेच त्यांना बोलावलं, ती माणूस योनीत नव्हतीच म्हणून ती देवाची पूजा नाही करू शकली पण तिने त्या साधकांना सांगून निलेश ची पूर्ण मदत केली,कदाचित आदिराज असा करणार हे माहित असेल म्हणून मेल्यावरही ती मुक्त नाही झाली.हे प्रेम होत तीच निलेश वरच की माणुसकी होती?
खरंच देवाला प्रीती आणि निलेश ला भेटवायचं नव्हतं की प्रत्येक प्रेमाचा अंत लग्न होत नाही हे सांगायचं होत?
निलेश आणि पूर्वा ने मनोमन प्रीती चे धन्यवाद दिले आणि आपल्या लाडक्या लेकीला आणायला, आई बाबांचे आशीर्वाद घ्यायला मार्गी लागले.
@ किर्ती कुलकर्णी
मित्रांनो कशी वाटली काठ please कळवा!