तिच्यातली ती!!!
भाग २
प्रज्ञाच नेमकं दुखणं मला आणि रेवाला समजलं होत.थोडासा काय ते म्हणता ना ब्रेन वॉश त्याची गरज होती पण त्याआधी गरज होती ती पोटोबाची.सगळ्याच दमलो होतो म्हणून स्वीगी च केलं.फ्रेश होऊन आवरलं तोपर्यंत पार्सल आले पण.
तिघींनीही आलेल्या जिन्नसावर ताव मारला आणि येऊन बसलो मागच्या अंगणात.
आज सकाळ पासून मोबाईल कडे लक्षच गेलं नव्हतं. लेकीचा मिस कॉल होता. दुसरा कॉल येण्याअगोदर कॉल केला पाहिजे, नाहीतर सासूबाई ओरडत नव्हत्या एव्हडं ओरडेल.मी त्या दोघींसमोरच नैना शी बोलत होते. तिने सांगितले की हेमंत देशपांडे या मुलाचा तिला फोन आला होता. तिने नोंदणी केलेल्या लग्नासंबंधीच्या इंटरनेट site वरून घेतला होता त्याने नंबर. बोलायला ठीक वाटला आणि माझी अटही त्याला मान्य आहे.किडनी रोग तज्ज्ञ आहे. पुण्यात स्वतःचे घर आहे.नामंकित रुग्णालयात उच्च पदावर रुजू आहे. घरी आई, बहीण आणि वडील इति मंडळी आहेत.माझी जशी अट आहे, तशीच त्याची पण आहे की तो आई वडिलांना सोडून कधीच वेगळं नाही राहणार. नैना चे हे तपशीलवार माहिती ऐकून घेतली आणि तिला बोलले भेटून घे मग. तुला योग्य वाटतेय तर आणि मग बघू पुढे कसं ते.
माझा हा कॉल संपताच रेवा म्हणाली," चला म्हणजे तुम्ही पण आहेत तर सासूच्या प्रोमोशन लिस्ट मध्ये." तशी पद्मा ने तिला दुजोरा दिला, " मी झाले सासू, एकदा नाही तर तब्बल दोनवेळा जावयाची आणि सुनेची आता तू पण होणार मग मीना का मागे?" तिच्या या वाक्यावर आम्ही तिघी ही हसलो.
हसता हसता प्रज्ञा शांत झाली आणि म्हणाली," पण हे प्रोमोशन काही सोसत नाही बाई, जिव्हारी लागत." तसं आम्ही दोघीही शांत झालो. असाही आम्हाला विषय काढायचाच होता बरं झालं तिनेच काढला ते.
आम्ही विचारलं काय झालं?
तशी प्रज्ञा बोलू लागली," सहा महिण्यात वेगळी झाली गं, माझी सून माझ्या लेकाला घेऊन.पैसे येतात आज पण अकाउंट ला पण घराला घरपण नाही राहिलं गं."
"अगं पण असा झालं काय की ती घर सोडून गेली? काही भांडण वेगैरे?" मी विचारलं
" नाही गं काहीच नाही.लग्नानंतर आमच्यात कामामुळे वाद नकोत म्हणून आम्हीच कामाच्या वाटण्या केल्या होत्या. सकाळी तिला वेळ नसायचा म्हणून सकाळचं मी करायचे सगळं आणि संध्याकाळी , संध्याकाळ कसली रात्रच म्हण तेव्हा ती करायची सगळं. आणि काम तरी असा काय गं चार लोकांचा स्वयंपाक बाकी सगळ्याला तर बाई लावलेली होती. ती स्वयंपाकालाही लावू म्हणाली मी म्हणाले, नाही लावायची.
आपल्या स्वयंपाक घरात दुसरं कोणी स्वयंपाक करणार कसं वाटत ते ? आणि मला बाई नाहीच आवडत माझ्या स्वयंपाक घरात दुसरं कोणी.
बरं तिला घरात सगळं नीटनेटकं लागायचं. मी सोफयावर बसून भाजी निवडत असेल तर मला म्हणायची, "आई सोफ्या मध्ये घाण अडकते तुम्ही डाईनिंग टेबलं वर बसून निवाडा. बरं हे ऐकलं तर म्हणे की आपण पोळपाट बदलूया, माझ्या आईने दिलेला तो पोळपाट अजून दणकट आहे, का बदलायचा? मी म्हणाले, " नाही बदलायचा." असंच छोट्या मोठ्या गोष्टी चालू असायच्या पण मी लक्ष नव्हते देत.मला हेच नाही पटायचं की मी सासू असून ती एव्हडं बोलते कसं? आपली काय टाप होती ग बोलायची?
अगं कित्येक वेळेला तिचा जेवण बनवायची वेळ असेल तर बाहेरून मागवायची. मला अजिबात नव्हतं पटत पण मी काहीही बोलत नव्हते.आमचे हे किती वेळेला चिडले माझ्यावर तू डोकयावर घेतेस तिला असाही म्हणाले पण मीच म्हणायचे जाऊदेत हो सोडा.
एकेदिवशी असंच तिला शनिवारी पण कामावर जावं लागले तिला. येताना संध्याकाळी ती जेवण घेऊन अली विकत. आता शनिवार म्हणजे ह्यांचा उपवास त्यांच्यासाठी उपवासाचा काहीच आणलं नाही. मी वरई केली आणि जेवलो सगळे. त्यादिवशी मात्र माझा पारा चढला आणि मी बोलले तुमचं तुम्ही करून खा आमचं आम्ही खातो. रोजच बाहेरच खान नाही परवड आम्हाला.भिक्कार चाळे, खिशाला चटक, अरे नवीन संसार आहे, काही तरी बाजूला टाका, फरपट होते नाहीतर. पोरीने ते जिव्हारी घेतलं दुसरे दिवशी दोघंही आमच्या रूम मध्ये आले आम्हाला वाटलं माफी मागायला आलेत, पण झालं उलटंच ते वेगळं राहणार होते. रात्रीच त्यांनी जवळचाच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता तो बघायला चला असा सांगायला आले होते.नाही गेलो आम्ही.तिने माझा मुलगा तोडला गं माझ्या पासून." असं बोलून प्रज्ञा रडायला लागली.
तिचे डोळे पुसून तिला थोडे पाणी दिले आणि मी विचारले," तो गेल्यापासून त्याने काहीच संबंध नाही ठेवला का?
भाऊजींना पेन्शन पण नाहीए मग घर कसं चालत? ती येतच नाही का अजिबात?"
" नाही गं येतात की आठवड्यात एक दोनदा, कधी कधी जेवायलाही थांबतात. आम्हालाही बोलावतात जातो आम्ही पण. तिकडे गेल्यावर मला एकही काम नाही करू देत ती". "पण घर तर तुटलंच ना गं? मीनाक्षी, आम्ही तरी दोघे आहोत एकमेकांना साथ द्यायला तू तर एकटीच आहेस. नैनाचं लग्न होईल तेव्हा तू काय करशील गं? एकटी पडशील बघ खूप." प्रज्ञा ने तिची भीती बोलून दाखवली.
मी बोलले, " नैना च लग्न हे एकच स्वप्न राहिलेय बघ. तिचं लग्न झाल्यावर मी एकटी होईल, ही भीती माझ्या आधी माझ्या लेकीने ओळखलीय. लग्नानंतर मी तिच्यासोबत राहील.अगदी घरात नाही पण घराशेजारीच राहील जास्त लांब नाही जेणेकरून तिची आणि माझी रोज भेट होईल. अशी अट ठेवलीय माझ्या लेकीने. एकवेळ ती मुलगा काळा, गोरा, गरीब, श्रीमंत हे पाहत नाहीए, पण ही अट मान्य असेल तरच मुलाला भेटते. खरंच आपलेच लेकरं आपला एव्हडा विचार करतात हे ऐकून बरं वाटतं.
या गोष्टीचा कधी कधी त्रास पण होतो. कारण आपला समाज अजून तेव्हडा पुढारला नाहीए.अशी स्थळ फार कमी येतात.असो, ती रेडी नसेल तोपर्यंत मी तरी तिला जबरदस्ती करणार नाहीए."
माझ्या लेकीचं माझ्यावरच प्रेम पाहून प्रज्ञा मनोमन सुखावली आणि गंमतीत म्हणाली," एक चान्स घेऊन मुलगी होऊ द्यायला पाहिजे होती." :) :) तसे आम्ही सगळेच हसलो.
" नाही गं मुली खरंच खूप काळजी घेतात आई वडिलांची, तसे मुलं कमीच घेतात मी तर म्हणेल, घेतच नाहीत बायको आली की गेले तिच्या मागे." प्रज्ञा
आम्ही एवढ्या गप्पा मारतोय पण या सगळ्यात रेवा मात्र काहीच बोलली नव्हती.
मीच रेवाला म्हणाले, " काय हो मॅडम काय झालं? जेवण अंगी लागलेय का? काहीच का बोलत नाहीहेत? की येणाऱ्या सुनेची आधीपासूनच भीती वाटू लागलीय? "
तशी रेवा बोलली," नाही गं, अनुराग च लग्न ठरवायच्या आधीच मी एक निर्णय घेतलाय."
रेवाने सुनेचा आणि लेकाचा काय निर्णय घेतलाय पाहूया पुढच्या भागात.
तोपर्यंत कळूद्या तुमच्या प्रतिक्रिया.
मंडळी कोणाला काही अनुभव व्यक्त करायचे असतील किंवा अजून काही गोष्टी या कथेतल्या तुम्हाला तुमच्या वाटतं असतील तर कृपया कंमेंट करा आणि कळवा.
@ किर्ती कुलकर्णी.
No comments:
Post a Comment