Friday, 17 April 2020

परीघ नात्याचा ! भाग १ :

परीघ नात्याचा !
भाग १ :

निलेश , पूर्वा आणि नुपुरा लोहगाव विमानतळावर उतरले आहेत.
निलेश च्या नवीन कंपनीने त्यांना घेण्यासाठी गाडी पाठवली होती पण निलेश ला नवीन घरात जाण्याआधी आई वडिलांच्या जुन्या घरात जायचं होत. काही गोष्टी होत्या ज्या त्याला पूर्वा ला सांगायच्या होत्या.काही आठवणीत थोडा वेळ रमायचं होत. नुपुरा तर पहिल्यांदीच आजी आजोबांच्या घरी जाणार होती.
त्यांची कॅब कोथरूड च्या एका प्रशस्त घरासमोर येऊन थांबली तसे घर देखरेखीसाठी ठेवलेले श्याम काका   बाहेर आले निलेश आणि पूर्वा ला पाहून त्यांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले सामान घरात नेऊन त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि जेवणाच्या व्यवस्थेसाठी निघून गेले.
निलेश आणि पूर्वा आपल्या जुन्या आठवणीत हरवले तर नुपुरा मात्र हे सगळं पाहण्यातच गुंग होती.नकळत पूर्वा बोलून गेली आज आई बाबा असते तर नुपुरा ला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे केले असते. नकळत निलेश च्याही डोळ्यात पाणी तरळले.
निलेश पूर्वा नी आई बाबांच्या फोटोचा हार बदलला , दिवा लावला आणि २ वर्षाच्या आपल्या लेकीला आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करायला सांगितलं.
एवढ्यात निलेश ला नवीन कंपनीच्या मॅनेजर चा कॉल आला आणि निलेश बोलतच बाहेर गेला. पूर्वा मात्र सासूच्या प्रसन्न मुद्रा असलेल्या फोटोकडे पाहत राहिली .
निलेश पूर्वा ला आवाज देतच बाहेरूनच आत आला आणि बोलला चल आपल्याकडे वेळ कमी आहे तुला जे द्यायचंय ते देतो.दोघेही देवघरात आले निलेश ने एका लाल कपड्यात बांधलेले देव पूर्वा याच्या हातात दिले आणि बोलला आपल्या नवीन घरासाठी या घराचा आशीर्वाद.
श्याम काकाकडे जेवण करून दोघेही आपल्या नवीन घरी रवाना झाले..
पण असं म्हणतात ना "काही गोष्टींना तुम्ही सोडू शकत नाही आणि काही गोष्टी तुम्हाला सोडत नाहीत."

निलेश त्याच ऑफिस आणि नवीन काम यात कधी बिझी झाला त्यालाही कळलं नाही. पूर्वा आणि नुपुरा नवीन ठिकाणी रुळत होत्या.आजूबाजूचे लोकही चांगले होते. बघता बघता निलेश पूर्वा चा संसार पुण्यात बसला असं म्हणायला हरकत नव्हती.
पण या संसारात काहीतरी चुकत होत असायला होते हे तिघेच पण अजून कोणीतरी असल्याचं सारखं वाटायचं.निलेश कामामध्ये एव्हडा गाडून गेला कि तो पूर्वा आणि नुपुरा पासून लांब जातोय हे त्याला जाणवून घ्यालाही जमलं नाही.पूर्वा मात्र त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती असेल कामाचं टेन्शन, नसेल जमलं या गोष्टींनी स्वतःला बाकी गोष्टींमध्ये गुंतवत होती.
निलेश पूर्वा ची हि स्थिती असताना नुपुरा मात्र वेगळ्याच विश्वात असायची , खेळायची , बागडायची अशीच एकदा खेळता खेळता ती घराच्या मागच्या अंगणात गेली वेळ साधारण  संध्याकाळी सात ची असावी.पूर्वा किचन मध्ये कामात होती दिवा लावून मागच दार ती लावायचं विसरून गेली होती आणि त्याने याचाच फायदा घेतला होता.
थोड्या वेळाने पूर्वा ला नूपुरांची काहीच चालूल लागेना तेव्हा तिने सगळं घर शोधले पण नुपूर कुठेच सापडली नाही घाबरून तिने निलेश ला कॉल केला निलेश हि अर्धा तासात घरी पोहचला त्यानेही शोधले तोपर्यंत घराच्या आजूबाजूचे लोकही आले होते सगळे आपापल्या पद्धतीने शोधात होते पण काही फायदा झाला नाही.शेवटी काही लोकांनी पोलिसात जायचा सल्ला दिला. आणि एवढ्यात पूर्वा ला नूपुरच्या खोलीत काहीतरी जाणवले तसे ते दोघेही तिथे आले आणि पाहतात तर नुपूर झोपेतून जागी होत होती आणि रडत होती.पण हे सगळं पाहून निलेश आणि पूर्वा दोघेही पुरते चक्रावले होते कारण काहीच मिनिटांपूर्वी त्यांना ती तिथेच सापडली नव्हती.पण या सगळ्या प्रश्नांच्या आधी तीच रडणं शांत कारण महत्वाचं होत आणि तिला जेवण देणं. नूपुरला जेवू घालून झोपवले आणि ठरवले कि उद्या तिला सगळं विचारायचे पण भीतीही होती अडीच तीन वर्षाचं लेकरू ते काय सांगणार ? त्यादिवशी खूप दिवसांनी निलेश पूर्वा एकत्र जेवायला बसले. जेवण मात्र दोघांनाही गेलं नाही.
दुसरे दिवशी निलेश ने खास सुट्टी टाकली होती त्याने नुपूर बरोबर खूप वेळ घालवाल पण काही झालं तरी नुपूर त्याला हे सांगू शकली नव्हती कि अदालदिवशी रात्री कुठे गेली.
त्याचदिवशी संध्याकाळी बरोबर तिन्हीसांजेला पूर्वा ला नूपुरच्या खोलीत काहीतरी जाणवले, पूर्वा काय आहे ते पाहण्यासाठी खोलीत गेली व तिथेच भोवळ येऊन पडली. निलेश नुपूरांसोबत खेळून घरात येत असतानाच पूर्वा ला आवाज देत येत होता त्याने किचन मध्ये पहिले तिथे ती नव्हती त्याने पुन्हा एकदा आवाज देत हात पाय धुतले आणि नूपुरलाही फ्रेश केले. एवढे आवाज देऊनही काहीच रिस्पॉन्स नाही सो त्याने एक एक खोली पाहण्यासाठी आपल्या बेडरूम कडे जात होता तस त्याला नुपूरने ओढले आणि आपल्या खोली कडे बोट केले तो तिच्या खोलीत गेला तर पूर्वा तिथेच पडली होती.त्याने तिच्या डोक्यावर हात ठेऊन पहिले तर तिला खूप ताप होता.निलेश ने तिला आपल्या बेडरूम मध्ये आणले आणि डॉक्टर ला फोन केला.
आज दोन दिवस झाले होते पण पूर्वा चा ताप कमी नव्हता.निलेश ने पूर्वा च्या आईला बोलावून घेतले होते. कारण पूर्वा च आजारपण आणि नुपुरा दोघींना सांभाळणं त्याला अवघड होत होते.पण पूर्वा च्या आई ला यायला दोन चार दिवस लागणार होते कारण त्या आपल्या लोकांकडे सौदीला गेल्या होत्या.
डॉक्टर नी पूर्वा ला हॉस्पिटल मध्ये हलवावे लागेल असे सांगितले होते.निलेश पुरता अडकला होता पूर्वा ची अशी तब्बेत लहानगी नुपुरा.
निलेश डॉक्टर ला दारात सोडून परत येतच होता एवढ्यात दारावरची बेल वाजली. निलेश ने दार उघडले तर बाहेर प्रीती उभी होती. निलेश दोन मिनिट साठी सगळंच विसरला होता.आपली जुनी मैत्रीण अशी अचानक आपल्या दारात उभी पाहून तो पूर्ण भांबावला त्याला काहीच काळात नव्हतं नेमकं काय होतेय.तिनेच पुढाकार घेऊन म्हणलं, "आरे आत तरी बोलावशील कि नाही?"
तो भानावर येत," अरे ये ना ये"
ती आत येताच पूर्वा जोरात ओरडली तसा निलेश त्यांच्या रूम मध्ये पळाला. मात्र त्यामागे प्रीती गेली नाही.
निलेश पूर्वा च्या रूम मध्ये होता तोपर्यंत प्रीती मागच्या अंगणात गेली तिथे तिने एक लिंबू आणि भात गुलाल लावून ठेवला काहीबाही पुटपुटून ती आत गेली. इथे पूर्वा शांत झाली होती.
निलेश पुन्हा दिवाणखान्यात आला आणि प्रीती ला बोलला सॉरी मी तुला पाणीही नाही विचारले तशी प्रीती त्याला बोलली " इट्स ओके, काही प्रॉब्लेम आहे का? कोण ओरडलं?"
तस मागच्या चार दिवसांपासून चालू असलेला खेळ त्याने प्रीतीला सांगितलं.त्यातून त्याची होत असलेली फरपट तिला दिसली.
प्रीती ने त्याला विचारलं " तुझी हरकत नसेल तर तुझ्या सासूबाई पर्यंत मी इथे राहून तुला मदत करू का?"
निलेश ला तिचे हे शब्द खूप आधारवाने वाटले.
त्याच दिवशी प्रीती तिथे राहायला आली.पूर्वा च्या तब्बेतीत काहीच सुधारणा नव्हती , निलेश ने डॉक्टर आणि nurse  ना पण घरीच बोलावले होते.दिवसभर nurse पूर्वा सोबत असायच्या आणि रात्री घरी जायच्या
प्रीती आली त्या रात्री नुपुरा खूप किरकिर करत होती. प्रीती ने नुपूराला जवळ घेतले आणि झोपी घातले.
मध्य रात्रीची वेळ होती प्रीतीला पूर्वाच्या खोलीत काहीतरी जाणवले कोणीतरी पूर्वाला घेऊन जातेय असे.
प्रीती उठून पूर्वा जवळ गेली. प्रीती खोलीत जाताच ते जे काही होते ते खिडकीतून पळाले.असेच पुढची रात्रही झाले.आणि त्यानंतर मात्र ते जे काही होते त्याने प्रीतीवर घात केला.
प्रीती तिच्या खोलीत झोपली असताना तिच्यावर कोणीतरी येऊन बसले होते ते दुसरा कोणी नसून पूर्वा होती. पूर्वा प्रीतीला मारण्याच्या प्रयत्नात होती . पण प्रीती जोरात ओरडली "आदी नाही सोड, आदी सोड".
हे ऐकताच पूर्वा चवताळली आणि आणखीन जोरात प्रहार करू लागली.तसे प्रीती स्वतःला वाचवत बोलली " काय हवं आहे तुला ? का तिला त्रास देतोयस? का तिला शिक्षा देतोयस?"
तसे माणसाच्या आवाजात पूर्वा बोलू लागली " तिला नाही तिच्या नवऱ्याला त्याला त्रास द्यायचाय, फु..\ ने माझी बायको मला मिळू दिली नाही मग मी त्याची बायको घेऊन जाणार, आणि जोरात हसू लागला." हे सगळं चालू असताना निलेश ही तिथे आला.
"आदी सोड तिला तीची चूक नाही सोड तिला आदी" असा म्हणत प्रीती पूर्वाच्या गयावया करू लागली.
इकडे निलेश ला काहीच कळत नव्हते काय होतेय? प्रीती पूर्वा ला आदी का म्हणतेय ?
पूर्वा प्रीतीच्या समोर बसली तिने प्रीतीला हनुवटी पकडून चेहरा वरती केला आणि बोलली " तुला खूप पुळका आहे ना हिचा दोन दिवस आहेत तुझ्याकडे वाचावं हिला , नाही तर असं कर तो आहे ना निलेश कडे तोंड करत पूर्वा बोलत होती ,त्याने माझी बायको मला दिली नाही त्याचा जीव घे जा," आणि जोरात हसू लागली, लगेच त्यानंतर " वाचव वाचव असं विव्हळत पूर्वा पुन्हा रडू लागली आणि मधेच मोठ्याने हसली "
तशी पूर्वा जमिनीवर पडली प्रीती आणि निलेश ने तिला परत बेड वर झोपवले.
निलेश ने प्रीतीला खांद्याला हलवून विचारले, "काय आहे हे? तू पूर्वा ला आदी का म्हणतेयस? कोण आहे आदी? काय झालेय माझ्या पूर्वा ला? "
प्रीती ने निलेश ला दिवाणखान्यात आणले आणि कहाणी चालू केली.

क्रमशः 

No comments:

Post a Comment