गर्द एकटी या अंधारात मी चालत आहे,
कुठे कधीही न भेटणारी वाट मी शोधत आहे,
चुकून भेटलेला कवडासाही आज सोडत आहे,
मिळणाऱ्या सुप्त विचारांनाही मी मारत आहे,
कधी वाटते हा तर नियतीचा खेळ,
नंतर कळते हि तर आपल्याच माणसाने आणलेली वेळ,
दम घुटतोय या अंधारात आता,
श्वासासोबतच सुटणार वाटतेय, हा अंधार आता.......
@ किर्ती कुलकर्णी
No comments:
Post a Comment