फास (शशक - शत शब्द कथा)
गडद काळ्या खोलीत एक मुलगी आहे. गळ्याभोवती फास अडकलाय तिच्या, तरीही खुश दिसतेय.फोन वाजतो ती हसून हसून कोणाशीतरी बोलते.फोन ठेवून शांत बसलीय. तिकडून एक माणूस आलाय त्याने तिचा फोन पहिला. तो ओरडला तिच्यावर, फास घट्ट झालाय.
आजही, ती फोनवर बोललीय पुन्हा तो तिला ओरडलाय. आज ती त्याच्या पाया पडतेय.आज फासाने मानेवर वळ आलाय आणि हातही सोललेत. ती खचलीय, एकटी पडलीय.पण डोळ्यात पाणी नाही उमेद आहे.
नवरा संशयातून मानसिक छळ करतो, यामुळे हे न्यायालय सौ.रोहिणी यांचा घटस्फोट मान्य करत आहे.
खोलीतला अंधार दूर झालाय. फासाचे वळ आहेत पण इजा नाहीत. ती हसत नाहीए पण प्रसन्न आहे.
@ किर्ती कुलकर्णी

No comments:
Post a Comment