तिच्यातली ती!!!
भाग १
आज मला रेवाचा कॉल आला. खूप खुश होती तिने सांगितले कि अनुराग च लग्न ठरलेय.रेवाचा च प्रोमोशन होणार होत ती आता सासू होणार होती.
बऱ्याच वेळ गप्पा झाल्या आमच्या खूप दिवसांनी एव्हडं मनमोकळं बोललो होतो.नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही प्रद्ज्ञानालाही कॉल वर घेतले बोलता बोलता तिघीही इमोशनल झालो होतो. जवळ जवळ अर्धा तास बोलल्यावर रेवा सोबत रविवारी खरेदीला येऊ या प्रॉमिस वर आमचा कॉल थांबला. कॉल तर ठेवला पण माझं मन मात्र तीस वर्ष मागे गेलं.
मी मीनाक्षी जवळकर लग्न झालं तेव्हा तेव्हा अठरा वीस वर्षाची असेल, यशवंत देशमुख यांच्याशी लग्न झाले , आणि मीनाक्षी जवळकर ची मीनाक्षी देशमुख झाली.सतारीहून तिची कोल्हापूर ला रवानगी झाली.
लग्नानंतर सासू ,सासरे,आजेसासू, एक नणंद,नवरा असा सगळं परिवार.बडे घराणे होते, थाटही तसाच होता.नवरा नौकरीनिमित्त बाहेर जाऊन येऊन असायचा.खूप स्वप्न घेऊन लग्न केले होते हे असे असेल ते तसे असेल पण लग्नानंतर सगळ्यांचे मन संभाळण्यातच दिवस जाऊ लागले.
त्या घरात रुळताना शेजारी पजऱ्यांशीही जुळवून घेतले जाऊ लागले. आणि अश्यातच शेजारच्या आणा काका च्या घरी म्हणजे अण्णाभाऊ पाटील यांच्या घरात सुनेने म्हणजे रेवा ने पाऊल टाकले व सहा महिन्यातच समोरच्या घोरपडे काकूंनीही आपल्याला धाकट्या मुलाचे हात प्रज्ञा सोबत पिवळे केले.या सगळ्या मुळे आमच्या तिघींचे सगळे पहिले सण एकत्रच साजरे होत होते.आणि आमची मैत्री होत होती.घोरपडेंची प्रज्ञा,पाटीलची रेवा आणि देशमुखांची मीनाक्षी असे आमचे त्रिकुट जुळले.
किती गोड़ होती रेवा लुकडी सुकडी पण तेज होत चेहऱ्यावर.आणि प्रज्ञा थोडीशी स्थूल पण चंचल आणि प्रचंड हुशार.त्या दोघींच्या ही माहेरी बरीच श्रीमंती होती.
तेव्हड्यात शांती ने घराची घंटी वाजवली आणि माझी आठवणींची तार तुटली.आल्याआल्या बडबडणारी शांती आज अगदीच शांततेत किचेन मध्ये गेली आणि यंत्रवत पणे काम करू लागली. रोज बोलणार माणूस बोललं नाही कि करमत नाही पण, मग मीच विचारले, "काय झाले ग आज एव्हडी शांत का?" ती म्हणाली काही नाही असाच, थोडा मूड नाही वाटतेय. पण मानसशात्र शिकलेल्या मुलीची आई होते मी थोडासा मलाही जमू लागलं होत. अलगद तिच्या पाठीवर हात ठेवला आणि मायेने विचारले काही खुपत असेल तर सांग.तशी शांती रडू लागली, " तिने पाठीवरचे आणि पायावरची वळ दाखवले, मारलं होत तिला नवऱ्याने आणि सासूने. नवऱ्याने संशयावरून आणि सासू ने उलट बोलली म्हणून."कसे तरी तिला समजावून पोलीस मदत करतात वेगैरे गोष्टी सांगून शांत केले.तिने चहा घेतला आणि गेली ती पुढच्या घरी कामाला.
शांती च्या वळांनी मला अजून एक खूप अवघड सत्य दाखवले समाजाचे आणि माझे डोळे क्षणभर का होईना पाणावले.
घरातलं काम वारल्यावर मोबाईल हातात घेतला रेवाने आमच्या ग्रुप वर सारी, दागिने यांचे फोटो पाठवले होते. त्यात अनुराग आणि त्याची होणारी बायको अनुष्का यांचाही फोटो टाकला होता.जोडी अगदी छान दिसत होती.अनुष्का सालस वाटत होती फोटो मध्ये तरी. अनुराग च्या लग्नाने आमच्या गृप ला बहार आणला होता. रेवा तर जणू हवेतच होती. या सगळ्या गप्पा गोष्टीत प्रज्ञा ने एक खूप जुना आमच्या तिघींचा फोटो टाकला होता. किती वेगळ्या होतो आम्ही बालिशच वाटत होतो खरचं वर्ष, कशी फुर्र्कन उडतात ना.त्या फोटो मध्ये आमच्या आमच्या सासू बाई पण होत्याच.त्याही किती वेगळ्या होत्या.आता मात्र तो फुटला ऐट सगळं उतरला होता.
बघता बघता रविवार आला मी प्रज्ञा आणि रेवा एका कॉमन पॉईंट ला भेटून पुढे निघालो. मनसोक्त खरेदी केली आणि निवांत येऊन माझ्या घरी बसलो असंही मी आणि माझी मुलगी नैना सोडून कोणी नसतंच त्यात ती पण मानसोपचाराची वोर्कशॉप घेण्यासाठी मुंबई ला गेली होती दोन दिवसांनी येणार होती. त्यामुळे त्या दोघींना मी त्यादिवशी राहण्याचा आग्रहाचं केला.आणि तो त्यांनी मान्य पण केला. खूप दिवसांनी आम्ही आमचा वेळ घालवणार होतो काही जुन्या आठवणीला उजाळा तर भविष्याचा तारतम्य लावणार होतो.
घरात माझ्या नवऱ्याचा फोटो पाहून प्रज्ञा मला म्हणाली," पंधरा वर्ष झाले ना ग भाऊजींना जाऊन ?, खूप धीरानं घेतलास बाई तू. वयाच्या सहावीसाव्या वर्षी तुझी साथ सुटली हातात तीन वर्षाच्या मुलीसहीत. घराची लोक अशी तुझ्या जागी दुसरा कोणी असत तर खचलं असत पण तू तर मोठी झालीसच घरालाही सांभाळलस आणि लेकीलाही तिच्या पायावर उभं केलास कौतुक करावं तेवढ कमी आहे तुझं." तिच्या शब्दात रेवाने री ओढली ," लग्न झालं तेव्हा आजेसासू सहित सगळे होते.किती बोलायच्या त्या बघितलंय आम्ही.एक किस्सा तर अजूनही आठवतो मला तुझ्या नणंदेला चकली चे डोहाळे लागले होते आणि म्हणून तू बनवत होतीस आणि तुझ्याकडून चकल्या लाल झाल्या म्हणून त्या चकल्या संपेपर्यंत त्यांनी तुला जेवण दिले नव्हते फक्त त्या चकल्या खायला लावल्या होत्या.आणि हे पाहून या प्रज्ञा ने चोरून भात वरण आणलं तर तिला तिच्या सासू ने उपाशी ठेवले होते. आमच्या हि घरी काय वेगळं वार नव्हतं म्हणा,सगळं जेवणाचं माप त्यांनीच काढून देऊन उरल तरी ओरडायचं आणि कमी पडलं तू आव बरकती आहेस म्हणायचं दोन्ही कडून टाळ तेच वाजवणार."
"खरे आहे, पण हे गेल्यावर घराला कळाच गेली सहा महिन्याच्या फरकाने सासरेही गेले आणि येऊन ठेवले सगळे आमच्या डोकयावर. सासू, आजेसासू आणि नैना. घराची परिस्थिती बरी होती म्हणून बरंय.जेव्हडा शिकले होते त्या जोरावर नौकरी मिळाली. आणि हळू हळू आलं सगळं रुळावर. तेव्हा समजलं घरातले फक्त पुरुषाचं नाही स्त्री पण खंबीर आणि पायावर उभी असणं किती महत्वाचे आहे. म्हणून तर अडाणी, सोडलेल्या किंवा कोणत्या तरी अत्याचाराला बळी पडलेल्या साठी मी आश्रम चालू करू शकले.आपण जे भोगलं ते परत कोणी भोगू नये म्हणून. मरताना आजे सासू नेही कौतुक केलं."मी
यावर प्रज्ञा थोडी हसली आणि बोलली," तू जे भोगलं त्यासाठी आश्रम काढून तू सिद्ध झालीस का? आपण जे भोगलेय कोणी तीन दिवस जेवलो नाही, कोणी मार खाल्लाय, कोणी कारण नसताना शिक्षण सोडलंय, कोणी संशयाला बळी पडलेय, कोणाला माहेरच्यांना उगाच दिलेल्या शिव्या ऐकाव्या लागल्यात, माहेरून अवाजवी केलेल्या मागण्या पाहाव्या लागल्यात, या सगळ्यामध्ये हरवलेले त्यांचे दिवस त्यांचे स्वप्न कोणी भरून काढू शकत का?" प्रज्ञा बोलली.
"वीस ऐककवीस वर्षच्या पोरी होतो आपण खरंच लग्नाची अक्कल होती का ग आपल्याला?कधी कधी वाटत आत्ताच्या पिढीत जन्माला यायला हवे होते. स्पष्ट बोलण्याचा आत्मविश्वास तरी असला असता. काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे समजण्याचा तरी अक्कल असली असती.काही नाही तर कोणाशी लग्न होतेय त्याला समजून घेण्याचा आणि मनाची तयारी करण्याची तरी संधी मिळाली असती.आणि याउपर काही झालेच असते तर न्यायालय पोलीस यांची मदत तरी मिळाली असती" प्रज्ञा
" अगं असा काही नाहीए आत्ताही होतो सासुरवास फक्त पद्धत बदलीय.आपल्याला शारीरिक त्रास द्यायचे आत्ता मानसिक त्रासच प्रमाण वाढलेय.आश्या पद्धतीत छळ केला जातो ज्यात छळ, छळ वाटतच नाही पण असतो तर खरा.आत्ता कोणी उपाशी नाही ठेवत पण जे हवं ते खाऊही नाही देत.खूप मुली आजकाल नौकरी करतात पण खरंच ते सोपं असत का? बाहेरच करून घरात सगळं कारण सोपं असत का? परत सासू ने परंपरेच्या नावाखाली घातलेले काही ना काही टुमणे असतेच. कुठे पौर्णिमा, कुठे अमावास्या त्यादिवशी जर त्या पोरीला सुट्टी नाही मिळाली किंवा तिला घरी येऊन हे करायला नाही जमले तर आहेच परत शब्दरूपी बाण." मी
"अगं पण आजकाल मुली एकत्र राहतातच कुठे? आता माझीच सून घे राहतेय आमच्या जवळ? लग्नानंतर दोन महिन्यात वेगळी राहिली ग तोडलं माझ्या मुलाला माझ्या पासून?" प्रज्ञा
प्रज्ञाच नेमकं दुखणं मला आणि रेवाला समजलं होत.थोडासा काय ते म्हणता ना ब्रेन वॉश त्याची गरज होती पण त्याआधी गरज होती ती पोटोबाची.सगळ्याच दमलो होतो म्हणून स्वीगी च केलं.फ्रेश होऊन आवरलं तोपर्यंत पार्सल आले पण.
तिघींनीही आलेल्या जिन्नसावर ताव मारला आणि येऊन बसलो मागच्या अंगणात.
क्रमशः

No comments:
Post a Comment