Tuesday, 29 September 2020

Lockdown Tales १ नौरोबाने पहिल्यांदा केलेला शिरा :

 Lockdown Tales 


१ नौरोबाने पहिल्यांदा केलेला शिरा :


Lockdown मुळे ज्यांना शक्य आहे ते सगळेच घरी राहून काम करतायत,सोप्या भाषेत Work From Home चालू आहे. त्यात ज्या लोकांचे client अमेरिकन आहेत त्या काहींना रात्री काम करावे लागते त्याच काही मधले आम्हीही आहोत.

तर झाले असे सकाळी रोजच्या वेळेला म्हणजे साधारण चार वाजता आमचे काम संपले आणि माझ्या नौरोबाला शिरा खाण्याची इच्छा झाली.असेही ऑफिस कामामुळे रात्री नीट जेवण होत नाही आमचं सो सकाळी सकाळी भरपूर वेळा भूक लागते. मग काय स्वारी ड्राय फ्रुट्स बारीक करून देण्याच्या तयारीत, तू रवा भाज मी तयारी करून देतो म्हणत सरळ मला घेऊन किचन मध्ये हजर.

कढई शेगडी वर ठेवली रवा भाजून घेतला, तो खाली काढताना कढई ताई आमच्या हातावर विराजमान झाल्या.कढई आणि हातामध्ये वाद झाले बहुतेक हात रागाने बराच लाल झाला होता, धड चमचाही हातात धरता येईना.

मग काय, मलम पट्टी झाल्यावर Mr नी घेतला पुढाकार आणि लागले कामाला. काही टिप्स घेणं देणं झाल्या आणि मस्त यम्मी वास घरात फिरू लागला. लवकरच कढई तुन डिश मध्ये आणि डिश मधून जिभेवर आगमन झाले. या शिऱ्याच्या चवीत हाताला भाजलेलं कधीच विसरून गेले होते.

त्या दिवशी वाटले " Morning Be Like "


(हाताला भाजल्याचा एक फायदा झाला, यापुढे शिऱ्याचे कायम चे कॉन्ट्रॅक्ट माझ्या नौरोबाकडे कडे गेले. ;) )


                                     @ किर्ती कुलकर्णी 

No comments:

Post a Comment