तिच्यातली ती!!!
भाग 3
मीच रेवाला म्हणाले, " काय हो मॅडम काय झालं? जेवण अंगी लागलेय का? काहीच का बोलत नाहीहेत? की येणाऱ्या सुनेची आधीपासूनच भीती वाटू लागलीय? "
तशी रेवा बोलली," नाही गं, अनुराग च लग्न ठरवायच्या आधीच मी एक निर्णय घेतलाय."
तास आम्ही दोघीही चपापलो. "काय निर्णय घेतलायस?" हा प्रश्न दोघींच्याही डोळ्यात होता.
माझा निर्णय सांगण्याआधी तो मी का घेतला हे मला सांगायचंय.
" मला सांगा मुलं लहान असत तेव्हा आपण त्या मुलाला एकटं कुठे जाऊ देत नाही, त्यांनतर आपण लक्ष ठेवून मुलांना एकटं जाऊ देतो. जेव्हा त्यांना आणि आपल्याला आत्मविशवस येतो की आता ते स्वतंत्रपणे ते काम करू शकतात तेव्हा आपण निर्धास्त असतो. त्याच बरोबर आपण त्यांना काय चूक काय बरोबर हे सांगतोच ना?"
" जर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या अनुभवाने मुलांना सांगतो, जे आपण चुकलोय ते त्यांनी चुकू नये हे प्रयत्न करतो मग ते संसाराला लागतात तेव्हा आपले बोल का नाही?"
" आत्ताचे मुलं समजून उमजून लग्न करतात. अगं, आपण लग्नाआधी मुलं बघायला जायचो आपण दगड, विटा बघायचो आत्ताच्या मुली दगड, विटा पाहत नाहीत. कारण ते बांधण्याची धम्मक त्या ठेवतात. त्या पाहतात घर कसं ठेवलेय? स्वच्छ आहे का? कोणती गोष्ट कमी आहे घरात? घरातल्यांच्या सवयी कश्या आहेत ?"
रेवाने एव्हडं बोलून आम्हालाच प्रश्न केला ." मी चुकीचं बोलतेय का?"
प्रज्ञा थोडी चिडलेली दिसली ती बोलली," म्हणजे ती नवीन मुलगी येणार म्हणून आपण आपल्या चाळीस वर्षांच्या सवयी बदलायच्या का ? नवीन घरात येणारी ती आहे तिने सांभाळून घेतलं पाहिजे ना?"
रेवा पुढे बोलू लागली, " बरोबर आहे तुझं तिने सांभाळून घेतलं पाहिजे. पण प्रज्ञा आत्ता थोडा वेळ आधी तूच स्वप्न, इच्छा, आकांक्षा बद्दल बोलत होतीस ना? मग ती जी मुलगी येणारेय घरात, तिच्या स्वतःच्या संसाराकडून, आयुष्याकडून, नवऱ्याकडून काही स्वप्न नसतील काही इच्छा नसतील?"
" अगं किती छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुझाच उदाहरण घे तुला तुझ्या आई ने तो पोळपाट दिलाय, म्हणून तुला प्रिय आहे.पण तिच्याही आईने तिला दिल असेल ना काहीतरी, कित्तेक मुलींच्या बापाने दिलेला संसार कुठला तरी कोठीत नाहीतर, पेटीत पडलेला असतो. तिच्या भावना जळत नसतील तेव्हा? घर म्हणलं की काय नसत गं? अगदी तांदूळ कुठला घ्यायचा इथपासून घर कुठे घ्यायचं एवढे प्रश्न असतात? माझं स्पष्ट मत आहे एका घरात दोन संसार कधीच चालत नाहीत. आता माझाच घे माझं लग्न झालं तेव्हा माझी जाऊ होती घरात तीही मोठी, त्यात सासूबाई अंथरुणात, म्हणून घरात सगळ्या गोष्टी त्याच पाहायच्या. खूप छोटी गोष्ट आहे पण अजून सलते मनात माझ्या मला पहिल्या अधानाचा चहा अजिबात आवडत नाही पण त्या तोच बनवायच्या आणि दूध, तूप, दही सगळं त्यांच्या ताब्यात. कोणत्याही गोष्टीची मुभा नव्हती.कोणत्याही वेळी चहा घेताना मला माझं महेर आठवायचं. प्रत्येक गोष्ट करताना मला त्यांचा विचार करावा लागायचा. अगं आमच्या ह्यांना भोपळा आवडत नाही आणि एकदा मी भोपळ्याचा भात बनवला आणि ह्यांनी आणि सगळ्यांनीच खूप आवडीने खाल्ला आणि आमचे मोठे भाऊजी जाऊबाईंना बोलले तू रेवा सारखा भात बनवायला शिक. बापरे, किती राग आला होता त्यांना. त्यानंतर छोट्या मोठ्या कुरबुरी चालू लागल्या ते सासूबाई आणि मामंजींच्या देहांतानंतर वेगळे झालो आणि थांबल्या."
एवढ्या वेळ शांत बसलेले मी पण मलाही रेवाची बाजू पटत होती.
तेव्हाच प्रज्ञा म्हणाली," म्हणजे नात्याला काहीच अर्थ नाही? त्या नात्याचा काहीच आदर नाही?"
रेवा बोलू लागली," नात्यात आदर आपल्या वेळी होता आता आदर कमवावा आणि टिकवावा लागतो. प्रत्येकाने आपापला."
"तुला नेमकं काय म्हणायचंय?" प्रज्ञा
"मला एवढाच म्हणायचंय, "कालये तस्मेय नमः !". जे आपल्या वेळी होत ते आत्ता अपेक्षित नको आणि कोणावर जबरदस्ती तर अजिबात नको.अगं आपण जे सहन केलं ते इतरांनी का करावं? "
पूर्ण संभाषणात मी पहिल्यांदीच बोलले होते." मला पटतेय तुझं रेवा.अगं जेव्हा आपण आपल्या मुलांचं लग्न लावताना त्यांच्या मर्जीने, त्यांना पसंद पडत नाही तोपर्यंत लग्न नाही करत मग संसार त्यांच्या मर्जीने का नाही? कुठे अडलेच तर आपण असूच की पण प्रत्येक गोष्टीत आपली ढवळा ढवळ कशासाठी? या बद्दलचा एक किस्सा माझ्यासोबत पण झाला. मी प्रत्येक वेळी माहेरी जाताना मला आजेसासूबाईंना घेऊन जावं लागायचं, कारण त्यांचं करणार कोणीच नसायचं घरी पण मला अजिबात इच्छा नसायची. त्या असतील तर मी माझ्या आईशी दोन शब्द शांततेत बोलूही नाही शकायचे, की नवं-जून ऐकूही नाही शकायचे.मनात खूप त्रास व्हायचा गं! असं वाटायचं,असं भेटण्यापेक्षा न भेटलेलं बरं. तसंच, माझ्या आई बाबांना माझ्याकडे खूप यावंसं वाटायचं, थोडंसं राहावं वाटायचं. पण सासू, आजेसासू सगळे असल्यामुळे कधीच नाही येऊ शकायचे.त्यावेळी वाटायचं हाकलून द्यावं यांनाच.पण काय करणार उपयोग नव्हता."
प्रज्ञाचा सूर आता थोडा वीरमला होता," खरंय गं, माझं लग्न झालं तेव्हा आम्हीही तीन जावा आणि सासू सासरे. तुझ्या शब्दात चार संसार एकत्र होते.रोजच कुरबुरी असायच्या कधी कोणामुळे तर कधी कोणामुळे कोणाच्याच मनात कोणाचा आदर नव्हता राहिला आता बघ ना सगळे वेगळे आहोत पण वळ बरेच राहिलेत."
"प्रज्ञा तू सुखी आहेस तुला samajdar सून मिळालीय तिने तुमच्या बद्दलचा आदर कमी होण्याआधीच पाऊल उचललेय आणि तुझ्या मुलाने तिला त्यात साथ देऊन त्याने त्याच कर्तव्य बजावलेय." रेवा
"पण माझं घर तुटलं गं, माझा मुलगा तुटला.तो असं वागेल असं अजिबात नव्हतं वाटलं मला पण धोका दिला गं."प्रज्ञा
प्रज्ञा च्या वाक्यावर मी पटकन बोलले ,"कसला धोका गं ? तो दुसरीकडे राहायला गेला हा? आणि तो तुटला असं कस म्हणतेस? काही दिवस आधी तो देशाच्या बाहेर गेला होता, तीन वर्षांसाठी. वर्षात चार दिवसांसाठी येत होता. तेव्हा नव्हता का तुटला तो? आता तर आठवड्यात दोन वेळा भेटतो.ते काळजी पोटीच ना? लागणारे पैसे पाठवतो तेही काळजी पोटीच ना? तू म्हणतेस तुझी सून बाहेरून जेवण मागवायची, अगं आज एक दिवस आपण बाहेर गेलोय तर एव्हडं दमलो ती तर रोज जाते. आठवड्यात एखादा दिवस असेल तिचा व्यस्त. त्यादिवशी असेल तिला खूप काम, दमत असेल ती.नाही म्हणलं तरी सासू या नात्याचा दबाव येत असेल, नसेल सांगू शकत तुला काही गोष्टी आणि स्वछतेच म्हणशील, तर मीच म्हणते स्वच्छता असायलाच हवी. एखाद्यामध्ये असते जास्तच स्वच्छता तीही चुकत असेल पण घराच्या नावाखाली तीच खदखद मनात घेऊन जगायचं का? आपण होतो तश्या आत्ताच्या मुली असणं शक्य नाही आणि असूही नयेत.अगं मी म्हणेल याचा फायदा आहे. आता तुझी मुलगी माहेरपण चार दिवस जास्त जगेल. कारण घर फक्त आई वडिलांचं असणं आणि त्यात भावजय पण असणं खूप फरक असतो. या गोष्टीला सकारात्मकता दे.तुझ्या मुलीच माहेर पण तुझ्या सुनेनं वाचवलेय हे समजून घे."
रेवा बोलू लागली,"माझं ना कायम एक स्वप्न होत, छोटंसंच पण मनाला लागलेय ते. मला ना लग्न ठरलं तेव्हा अशी कल्पना यायची की मी स्वयंपाक घरात काम करतेय आणि हे हळूच मागून येऊन माझ्या केसात गजरा माळतायत. पण लग्न झालं आणि रहाटगाडग्यात येऊन पडले. स्वप्न तर सोड आमच्या सगळा वेळ दुसऱ्याचं मन संभाळण्यातच जाऊ लागला.अगं मी केलेल्या भाजीच कौतुक पण वहिनींना आवडणार नाही म्हणून हे कधी करायचे नाहीत.खूप वाईट वाटायचं."
"जेव्हा अनुला मुलगी बघायला चालू केलं ना, भीती वाटत होती. माझं मन जस मारलं जात होत, माझ्या जावेमुळे उद्या आलेल्या सुनेबरोबर पण ते होऊ शकत.कारण तेव्हाही माझा आणि तिचा संसार म्हणजे पुन्हा दोन संसार एकत्र.मग ठरवलं जस प्रत्येक गोष्टीचा आरंभ करण्याआधी सभा होणं महत्वाचं असत तसंच लग्न कारण्या आधी मन स्वछ असणं महत्वाचं असत. त्यामुलीला माझ्या घरात काय हवेय आणि काय मिळणारेय याचा ताळमेळ मिळणं महत्वाचं आहे.कारण आपण सोशिक होतो आत्ता घटस्फोटाचं जग आहे आणि ते करूनही सुखी कोणीच होत नाही. त्यापेक्षा लग्नाची जशी ते तयारी करणारेत तशी त्यांची संसाराची तयारी पण झालेली असूदेत."
"जेव्हा अनुराग ने अनुष्काला पसंद केले येऊन मलाच सांगितले.त्यानंतर मी त्या दोघांनाही बोलावून आणि आमच्या ह्यांनाही समजावून एक प्रश्न केला " तुम्हाला लग्नाबद्दल काय माहित आहे?""
"दोघांकडेही उत्तर नसणे अपेक्षितच होत. हे वयचं असं असतं लग्न म्हणजे एक परिकथेचा खेळ वाटतो.पण जेव्हा होत, तेव्हा चालू होतो संसाराचं गाभा.मी अनुष्काला बोलले मला माहित आहे बेटा तू खूप समजदार आहेस हुशार आहेस माझ्या अनुराग ला संभाळशील पण बेटा फक्त अनुराग नाही होणारेय तुझा, त्याबरोबरची सगळी नाती तुझी होणारेत.मी लग्न करून आले होते तेव्हा अश्या खूप काही गोष्टी होत्या ज्या राहून गेल्यात त्याची खंत आजही वाटते.मला तुमच्या बाबतीत ते होऊ द्यायचे नाहीए. म्हणून मला वाटते लग्नानंतर काही दिवस, काही वर्ष तुम्ही आधी तुमचं नातं अतूट करा त्यानंतर इतर नात्यांकडे पहा.अनुराग बोलालाही मला आई अगं आमचं प्रेमविवाह आहे मला याची गरज वाटत नाही.पण त्याच्या बाबांनी त्याला समजावले अनु बाळा लग्न लग्न असतं प्रेमविवाह असूदेत की अजून कुठला.पुरुष एकदा नवरा झाला ना, तो कसा वागेल हे तो नवरा होईपर्यंत माहित नसतं. कारण एक हक्काची त्याची साथ न सोडणारी व्यक्ती आयुष्यात आलेली असते आणि सेम बायकोचही असतं. बेटा एकदा तुम्ही नवरा बायको म्हणून सफल झालात ना की जगात कोणीच तुम्हाला वेगळं नाही करू शकतnआणि तसं नाही झालं तर उरतात फक्त नात्याच्या कठपुतळ्या.अनुष्का तरीही तयार नाही झाली. तिला वाटत होत मी आणि अनुराग चे बाबा लग्नाला पूर्ण तयार नाही आहोत. मी तिला समजावले. किती छान मिठी मारली होती पोरीने तेव्हा मला."
प्रज्ञा," म्हणजे तू लग्नानंतर तुझ्या मुलापासून लांब राहणार?"
रेवा,"नाही त्याला त्याच्या आयुष्याची मजा घेऊ देणार.तो सुखात आहे हे दुरून पाहणार.काही लागलंच तर नक्की हजर असणार पण पहिला प्रयत्न त्यालाच करू देणार."
किती समाधानी वाटत होती रेवा, आयुष्यच गूढ गावसल्यासारखी!
नकळत मनात आलं,रेवाने हा निर्णय घेऊन खरा स्त्री पुरुष समानतेचा न्याय दिलाय का? भावनांचा बळी नेहमी मुलींचा जातो, कमीतकमी तिचा नवरा तिच्या सोबत राहील आणि होता होईल तो कमी बळी जाईल ही व्यवस्था तिने केली.
कित्येक दिवसांनी भेटून खरंच आम्ही भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ सकारात्मक बनवला. आम्ही साकारात्मकतेची पहाट पाहत होतो.
ही सकारात्मकता प्रत्येकाच्या आयुष्यात येउदेत ही देवचारणी प्रार्थना ठेऊन इथे मी थांबते.
@किर्ती कुलकर्णी
कथा कशी वाटली ते कृपया कळवावे.
open for suggestions !!!

No comments:
Post a Comment