Friday, 20 December 2019

भावनेच्या नदीला आज पुर आला होता,
पुरात हिंसा होऊ नये म्हणून आज मी डोळ्यांची कवाड लाऊन घेतली☺☺

छंद !!!!

चंद्राला न्याहळण्याचा जुनाच छंद माझा,
बहुतेक जास्तच जोपासला मी,
कारण आजकाल माझ्या रात्री,
माझ्या चंद्राच्या कुशीत जातात....



        @किर्ती कुलकर्णी

Saturday, 28 September 2019

तस्वीर !!!

हुस्न की बहार आई थी,
बहारों की मल्लिका हम पे मरी थी।
तुझे भूलने की कोशिश हमने भी की,
पर फिर भी तेरे अलावा किसी और की तस्वीर हमने तो इस दिल में नहीं पायी थी।।

        @किर्ती कुलकर्णी

Wednesday, 25 September 2019

बाईस !!!

लिखना चाहते हे हिसाब हमारे अतीत का,
लिखना चाहते हे हिसाब उस शख्स का,
पर कितनी बार उसको दोहराना साहब,
जो बाईस हे जिंदगी के तक्कलुफ़ और ख़ुशी का?

                            @किर्ती कुलकर्णी

Tuesday, 24 September 2019

पहाट !!!!

सांजवेळी केसरी तळी,
तुझी आठवण येते आहे,
सौभाग्याची अभागी ही,
अमावास्येत जगत आहे,
पावसाची सर,
प्रेमाचे गाणे गाते आहे,
गाणे प्रेमाचे कि विरहाचे,
हे मात्र गूढच आहे,
प्रेम असो वा विरह,
आहे ते आपले आहे,
म्हणूनच, प्रेम आपले जिंकणार,
हे आता उमजते आहे,
काळोख्या रात्री नंतरची रम्य,
पहाट आता झाली आहे,
या विचारातच,
आता मी निद्राधीन होत आहे.....

                  @किर्ती कुलकर्णी


Wednesday, 10 July 2019

उलझे बैठे है !

बेपनाह मोहब्बत है,
इसलिए तो तुमसे उलझे बैठे है !
नहीं तो दर्दे दिल संभलके सुलझाना,
हमारे बाये हात का खेल है !!

            @ किर्ती कुलकर्णी

Tuesday, 2 July 2019

सुकून !

सपनों को दिल से लगा रही हूँ,
तेरे बेपनाह मुहब्बत में, फ़ना हो रही हूँ !
जानती हूँ समंदर से भी गहरा हे,
फिर भी सुकून से इसमें डुब जा रही हूँ !!

                                  @किर्ती कुलकर्णी

Thursday, 27 June 2019

इश्क इबादद बन जाता हे,
जब मोहब्बत से पास आता हे !
वरना जानता तो हर कोई हे हमें,
पेहचानना सिर्फ तुम्ही को आता हे !!

                             @किर्ती कुलकर्णी
रोने के लिए किसी और का कंधा मिला,
ये हमारी तारीफ़ समझे या तौहीन?
इश्क निभाने के लिए हमरा ही दिल मिला,
वफ़ादारी समझे या रिश्तों के शौक़ीन?

                              @किर्ती कुलकर्णी

Tuesday, 25 June 2019

काहीतरी अजबच आजकाल घडतेय !!


तुझ्या माझ्या नात्याचा
सुगावा या जगाला लागला,
सगळ्यांनी आनंदाचा वर्षाव
आपल्यावर केला,
माझ्या मनाचा कानोसा,
तुझं मन घेतेय,
काहीतरी अजबच
आजकाल घडतेय !!!!

नात्यांना नात्यांची नवीन
गुंफण मिळतेय,
कर्तव्य आणि प्रेमाचे पारडेही
जड होतेय,
भावनांची लेखणी डोळ्यात स्वप्नांचे,
इंद्रधनुष्य रेखाटतेय,
खरंच, काहीतरी अजबच,
आजकाल घडतेय !!!!

                             @ किर्ती कुलकर्णी

Tuesday, 21 May 2019

चंद्र !!

मिठीत तुझ्या विसावले मी,
मधू चंद्राचा असताना,
तोच चंद्र पुन्हा पहिला,
रवी खिडकीतून डोकावताना !!१!!

शांत निखळ या चंद्रामध्ये,
नकळत पुन्हा हरवले मी,
पुन्हा होऊन गुलाबी लाल,
स्व नशिबावर भारावले मी !!२!!

आयुष्यात तुझ्या रोज हरवते,
नव्याने स्वतःला सापडताना,
तोच चंद्र नव्याने पाहते,
रवी खिडकीतून डोकावताना !!३!!


                                  @किर्ती कुलकर्णी

गुज !!

साद मनाची अवचित आली,
गुज प्रेमाचे सांगून गेली,
अबोल या मनाचे,
कवाडे हि उघडून गेली,
नजरेतून नजरेचे,
खेळ नवे शिकवून गेली,
साद मनाची अवचित आली,
गुज माझे उलघडू लागली !!१!!

साद मनाची अवचित आली,
भास - आभासात जगू लागली,
गर्दीतही तुझा,
कानोसा घेऊ लागली,
क्षितिजापर्यंत,
तुझ्याच जगात नांदू लागली,
साद मनाची अवचित आली,
गुज तुझे रे सांगून गेली !!२!!

साद मनाची अवचित आली,
सर्वस्व रे घडवून गेली,
सगळ्या नात्यांपलीकडे,
मैत्री आपली सुखावून गेली,
माझ्यातला तू तुझ्यातली मी,
जग वेगळे जगवून गेली,
साद मनाची अवचित आली,
गुज आपले घडवून गेली
गुज आपले घडवून गेली !!३!!


                          @किर्ती कुलकर्णी

Saturday, 4 May 2019

कशी विसरू?

ती जागा कशी विसरू?
जिथे स्वप्न तुझे तरंगते..
ती हवा कशी साठवू?
जी तुला स्पर्शून येते?
ते अश्रू कसे लपवू?
जे तुझ्या आठवणींचे असतात....
आपली आठवण , अश्रू,स्पर्श,स्वप्न सगळं  ह्रुदयात खोल बसले...
सांग कसं विसरू?
मी तुझी साथ द्यायची?

              @ किर्ती कुलकर्णी

Saturday, 20 April 2019

आशा !!!

श्वासा गानिक साद तुला जाते,
मग कोऱ्या कागदाची ही कविता होते,
आपले स्वप्न , कविता यातच मी गुंतते,
एका जन्माची ही सोबत न केलेली सात जन्माची आशा मी धरते....

           @ किर्ती कुलकर्णी

Virtuality : part 2

Virtuality Part २:


आता मात्र इन्स्पेक्टर प्रधान पुरते भांबावले होते.आता पर्यंत माणसांच्या खुनाचे तपास ते करायचे आता मांजरीच्या खुनाचा पण.
इन्स्पेक्टर प्रधान , हवालदार नाईक आणि कॉन्स्टेबल देशमुख मॅडम हे सगळे केस ची चर्चा करत काही तर्क लागतोय का हे चेक करत होते.
इन्स्पेक्टर प्रधान "नाईक या मांजरी पण पिस्तूल ने मरण हा या केस चा विचित्र भाग आहे.रामू ला मारण्या मागचा उद्धेश अजून सुटत नाही आणि त्यात हे मांजर प्रकरण.नाईक हा जो कोणी आहे मारणारा नक्कीच माथेफिरू असाला पाहिजे. नाहीतर मुक्या जीवाला कोण त्रास देणार?"

तेवढ्या देशमुख मॅडम बोलल्या " सर मला वाटत हे मांजरींना मारून आपल्याला आपल्या तपासाच्या दिशा मिळू नयेत किंवा त्या विखुरल्या जाव्यात हा हेतू तर नसेल ना ? आणि असा असेल तर कदाचित अजून कोणाचा तरी जीव धोक्यात असू शकतो."

"नाईक आपण बिल्डिंग वर नकळत लक्ष ठेवतोय,त्यात काही संशयास्पद?" प्रधान
"नाही सर काही नाही, फक्त तो महाडिक काय ठीक वाटत नाही, परवा त्यानं एका भाजीवाल्याचा गाळा खाली करून घेतला त्याची complain  आलीय.बाकी ज्यांच्याकडे पिस्तूल होतं त्यांचं सगळं ठीक वाटतेय."
एवढ्यात प्रधानांना काहीतरी सुचलं आणि ते एकदम बोलले नाईक गाडी काढा आपल्याला सोसायटी मध्ये परत जावं लागेल.

इंस्पेक्टर प्रधान, नाईक आणि देशमुख गाडीसहीत आत आले. आत आल्याबरोबर प्रधान रामू चा खून झाला तिथे एका हवालदारासोबत गेले आणि देशमुख मॅडम आणि नाईक मांजरीचं खून झाला तिथे गेले.
थोड्याच वेळात प्रधानांबरोबर च्या हवालदाराला काहीतरी सापडले आणि त्याने प्रधानांना आवाज दिला.
बुलेट होती ती साहजिकच रामूला लागलेली.
प्रधानांची अजून बाकी माहिती घेतली आणि आणि ती बुलेट आणि ती बुलेट फॉरेन्सिक लॅब ला पाठवले.

इकडे नाईक आणि देशमुख मॅडम ला काहीही सापडले नव्हते.
प्रधान ही तिथे पोहचले. मांजरी जिथे खेळत होत्या तिथे कुंपण केले होते, त्याच्या बरोबर मागे सिनियर सिटीझन पार्क होतं. आणि tत्याच्या बरोबर मागे यांना बसण्यासाठी केले बेंच होतं.नाईक ना अचानक प्रधानांनी आवाज दिला आणि सांगितले जाऊन त्या बेंच वर बसा. नाईक जाऊन बसले आणि प्रधान समजल्याच्या आवेशात सगळ्यांना बोलले चला जाऊ आता

पोलीस चौकीत आल्या आल्या प्रधानांनी बुलेट ची माहिती मागवली पण ते रिपोर्ट यायला अजून दोन तास बाकी होते.
पुन्हा नाईक, देशमुख आणि प्रधान त्यांच्या केबिन मध्ये होते.
आपल्याला सर्वात मोठा पुरावा म्हणजे बुलेट मिळाली आहे आता हे कळेल की गन आहे कोणाची?
" हो सर, पण हे पण तेवढच महत्वाचं आहे की रामू ने काय बिघडवले होत? त्याला का मारलं ? तसेच त्या बिचार्या मांजरी एक वेळ मान्य केलं की रामू च काहीतरी सेक्रेटली कोणाशी बिनसलं असेल पण मांजरी त्यांना का मरावं आणि तेही पिस्तूल ने?" नाईक बोलले
"नाही नाईक मांजरी कदाचीत मोहरा झाल्यात मेन टार्गेट काहीतरी वेगळाच असावं"प्रधान
"पण सर अजून एक प्रश्न आहे, जर टार्गेट काहीतरी वेगळं असेल तर अजूनही ते धोक्यात आहे कारण मांजरीं नंतर काही चुकीचं घडलं नाहीए तिथे." कॉन्स्टेबल देशमुख
"हम्म...नाईक देशमुख मला त्या सोसायटी च्या लोकांची सगळी माहिती पाहिजे अगदी सगळी छोट्यात छोटी गोष्टही मोठी असू शकते आपल्यासाठी" प्रधान
"ओके सर.." हे बोलून आणि सॅल्यूट देऊन नाईक आणि देशमुख दोघेही कामाला लागले.
ऑर्डर देऊन प्रधान आपल्या केबिन मध्ये cctv फुटेज पुन्हा पाहण्यात मग्न झाले.
तीच रम्य सकाळ आणि तेच सकाळचं वातावरण कोणीही या जागेच्या प्रेमात पडेल असा वाटलं एक मिनिट प्रधानांना.पुन्हा पुन्हा फुटेज पाहूनही काही हाती लागत नव्हतं.
रामू लास्ट तिने जेव्हा फुटेज मध्ये होतं ते शाळकरी मुलांच्या घोळक्यातच.
तेव्हड्यात बुलेट चे फॉरेन्सिक रिपोर्ट आले.
ती बुलेट ज्या गन मधून निघाली आहे ती गन स्पेसिअल बनवलेली आहे भारतीय आर्मी साठी आणि ती गन फक्त त्याच लोकांना मिळते जे आर्मी मध्ये खूप वरच्या पोस्ट वर काम करतात.कमी फोर्स मध्ये ही बुलेट fire  होते.हे त्याचे वैशिष्ट्य आहे इ माहिती फॉरेन्सिक ऑफिसर ने सांगितली. 
प्रधानाच्या डोक्यातील तारा फिरल्या त्यांनी ताबडतोब नाईक ना फोन करून Mr जोशी जे आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांना ताब्यात घ्यायला सांगितले तसेच त्यांच्या घराची झडतीही घ्यायला सांगितली.
जोशींना पोलीस स्टेशन ला आणण्यात आले.त्यांची कसून चौकशी सुरु झाली पण त्यांच्याकडे मिळालेल्या गन मध्ये ती बुलेट फिट होत नव्हती.
त्यांच्या कडे दुसरे कोणते गन आहे का यासाठीची चौकशी सुरु झाली त्यांची पूर्ण हिस्टरी काढण्यात आली पण कुठेही काहीही धागा मिळाला नाही शेवटी पुरावा नसल्याने जोशींना सोडून द्यावे लागले.
पण जो धागा मिळाला होतं तो चुकीचा नव्हता कदाचित जोशी नसतील पण कोणीतरी नक्की आहे.
नाईक, प्रधान आणि देशमुख टीम सोबत कसून चौकशी करत होते.
सोसायटी च्या सगळ्या लोकांची इत्यंभूत माहिती घेताना अजून एक फॅमिली समोर आली.श्रीमती चारुलता  सबनीस. त्यांचे पती देखील आर्मी मध्ये होते आणि एका युद्धात ते शाहिद झाले होते.पण या गोष्टीला तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि त्या त्यांच्या एक १२ वर्षाचा मुलगा व ९ वर्षाची मुलगी या समवेत राहत होत्या.सबनीस इंटिरियर डिझायनेर होत्या आणि त्यांनी नामांकित प्रोजेक्ट सांभाळले होते.समाजात त्यांना एक स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून खूप मान होतं.मी आणि माझं काम माझं काम माझं कुटुंब त्या यातच बिझी असतात.
मुख्य म्हणजे जेव्हा रामूचा खून झाला तेव्हा त्या घरीच नव्हत्या. प्रोजेक्ट काम संपलं नसल्याने  त्या त्या सकाळी ७ च्या आधीच गेल्या होत्या आणि हे आपण cctv मध्ये पडताळूनही पहिले आहे.
" ओके नाईक यांचा फॅमिली बॅकग्राऊंड जरी नीट असेल तरी आपण हे विसरू नाही शकत की त्या आर्मी ला बेलॉन्ग करतात आणि हा सर्वात मोठा दुआ आहे.त्यांच्या घराच्या झडतीचं वॉरण्ट घ्या आणि कल्पतरू वर पोहचा."
प्रधान आपल्या टीम सहित फ्लॅट नंबर ५०५५ च्या समोर उभे होते.दरवाजा सबनीसांनीच उघडला.
सबनीस नुकत्याच कामावरून आलेल्या दिसत होत्या.
"आमच्याकडे घराच्या झडतीचं वॉरण्ट आहे,रामूच्या खुनाच्या संदर्भात आम्हाला माहिती घ्यायची आहे." प्रधान
"पण मी काहीच केलं नाहीए आणि माझ्या घरात माझ्या व्यतिरिक्त फक्त माझी मुलं असतात आमच्या कामाला देखील कोणी नाहीए मग का? आणी रामूचा खून झाला त्या दिवशी मी लवकर गेले होते पाहिजे तर तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये विचारा"सबनीस
"आम्हाला हे सगळं माहित आहे पण आर्मी बॅकग्राऊंड मध्ये जोशी नंतर तुम्हीच आहेत म्हणून हे करावं लागेल.कृपया आमच्या कामात अडथळा आणू नका " प्रधान
"ओके इन्स्पेक्टर you  carry  on  with  your  job  "सबनीस
"Thank You " प्रधान

"सर सगळं घर शोधलं पण काहीच नाही सापडलं." नाईक
"ओके मॅडम काही वाटलं तर आम्ही पुन्हा येऊ आता साठी थँक यु! फक्त एक प्रश्न तुमची मुलं कुठे दिसत नाहीत ?"
"त्यांच्या शाळेची पिकनिक आहे आज. वॉटर पार्क ला गेले आहेत पोहचतीलच एवढ्यात पाहिजे तर कॉल करते मी त्यांना" सबनीस
एव्हडं बोलून सबनीसांनी दोन्ही मुलांना कॉल केले व किती वेळ आहे विचारून कॉल ठेवला.
"तुमचा मुलगा १० १२ वर्षांचा आणि मुलगी  ९ वर्षांची आणि त्यांच्याकडे मोबाईल आहेत?"प्रधान
"हो आम्ही तिघेच असतो काही पाहिजे असलं नसलं कामात असले तर त्यांची माहिती मला असावी म्हणून दिलाय" सबनीस
थँक यु येतो आम्ही एव्हडं बोलून प्रधान आपल्या तें सहित बाहेर पडले.

कुठेच यश मिळत नव्हतं पाणी नक्की कुठे मुरात होत कळत नव्हतं.
 काहीतरी लीड मिस होतेय.

एवढ्यात काहीतरी समजल्याने प्रधान अचानक खुश झाले आणि नाईकांना म्हणाले " नाईक आज वार कोणता आहे?"
नाईक या अश्या अचानक न कळलेल्या प्रश्नाने थोडे भांबावले आणि बोलले"शनिवार सर आज शनिवार पण उद्या सुट्टी मिळेल असा काही वाटत नाही"
"उद्या सुट्टी मिळेल नाईक पण थोडा वेळ काम करून.चला आज घरी जाऊन निवांत अराम करून उद्या इथेच भेटूया " प्रधान
नाईक आणि देशमुख मॅडम काहीही न समजल्याने गोंधळला पण सरांना काहीतरी सापडलंय हे त्यांनी बरोबर ताडलं.
आणि घरी जाऊन निवांत झाले.

दुसरे दिवशी सकाळी पुन्हा प्रधान आपल्या टीम सोबत फ्लॅट नंबर ५०५५ च्या समोर होते आज दरवाज्या एका लहान मुलाने उघडला.
पोलिसांना दारात पाहून सबनीस थोड्या चिडल्याच कारण पोलीस आल्याचं त्यांनी मुलांना सांगितलं नव्हता हे सगळं समाजव एवढे मोठे ते म्हणून.
घरात जाऊन प्रधान डायरेक्ट मुलांच्या रूम मध्ये गेले त्यांनी दोघांचे स्कूल बॅग बाहेर आणल्या आणि सगळ्यांसमोर त्या रिकाम्या केल्या.
मुलीच्या बॅग मधून छोटे मोठे गमे चे सामान काही छोट्या पेन्सिल इ.. गोष्टी बाहेर पडल्या मुलाच्या बॅग मधून गोट्या छोटे मोठे सामान पण एक छोटे काय किंवा मोठे काय कोणासाठीच नसलेले एक पिस्तूल मिळाले.
हे सगळं पाहून सबनीस तर चक्कर येऊन पडायचाच बाकी होत्या. त्यांना काळतच नव्हतं काय चाललंय.

प्रधाननी बरोबर आणलेली बुलेट त्यामध्ये बसवून पहिली तर त्याच गन ची असल्याचं निष्पन्न झालं.

सबनीस ना देशमुख मॅडम नी सावरलं आणि मग प्रधान त्या मुलाकडे वळले.
त्यांनी त्याला त्याच नाव विचारले त्याने ओजस असं सांगितले.
"बाळा हे पिस्तूल तुझ्याकडे कस आलं?"प्रधान
"पोलीस काका हे माझं सिक्रेट होत मला पप्पांच्या रूम मध्ये सापडलं होत. तुम्हा सगळ्यांसमोर काढलेत आता मी ताईला कास चिडवणार की माझं सिक्रेट नाही सांगणार म्हणून" ओजस
" कधी पासून आहे हे तुझ्याकडे?" ओजस
"सगळं घर साफ करण्याची turn माझा होतं तेव्हा पासून, ताई पप्पांचं कपाट साफ नाही करत म्हणून मी केलं मला तिथे हे सापडलं. पोलीस काका माझे बाबा सुपर हिरो सारखे सुपर हिरो होते म्हणून त्यांना हे पिस्तूल दिल होत.आई म्हणते मी पण सुपरहिरो होणार आणि मग मला पण मिळणार. पण सुपर हिरो छोटे असल्यापासून पिस्तूल ठेवतात म्हणून मी पण ठेवली" ओजस
त्याची निरागसता पाहून प्रधान पण हेलावले.
" तू आज पर्यंत कधी कधी या सोबत खेळलायस?" प्रधान
"सीक्रेट आहे कोणाला सांगायचं नसत नाहीतर पॉईंट्स कमी होतात मी नाही सांगणार."ओजस
"कशाचे पॉईंट कमी होतात बाळा ?"प्रधान
"मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट" असा म्हणून त्याने स्वतःचा मोबाईल आणला
तो प्रधान आणि सबनीसांना एक गमे दाखवू लागला ज्यामध्ये सुपरहिरो येऊन लोकांना मारतो पॉईंट्स  वाढवतो आणि गेम जिंकतो.
"हे बघ बाळ आता आपण पार्टनर झालो ना ? मग मला येताच नाही सांग ना कसे पॉईंट्स वाढवले तू?" प्रधान स्वःताला सांभाळत त्याला विचारत होते
"काका आधी यांना मारायचं मग नॉर्मल लोकांना जे त्रास देत त्यांना मारायचं पॉईंट्स मिळतात पण कोणाला सांगू नका नाहीतर तुम्हीच हराल"  म्हणून तो निरागतेने हसू लागला.
"बरं मला एक सांग अजून कोणाकडे आहे हा गेम?"प्रधान
"सगळ्यांकडे आशु,आदी,तो खालचा शुभम पण खेळतो....पण त्यांच्या कडे पिस्तूल नाहीए कारण ते सुपरहिरो नाहीत" ओजस
"बाळा तू या पिस्तूल ने रामू दादा वर अटॅक केलास?" प्रधान
"अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? एवढासा आहे तो तो हे करेल का?" सबनीस
"मॅडम पण पिस्तूल इथेच सापडलं आहे. कृपया आम्हाला आमचे काम करू द्या "प्रधान
"काका हो मी आणि तो खेळत होतो आमचं ठरलं होत लास्ट चान्स म्हणून आणि तो हरला मग मी मारलं त्याला."ओजस
"आणि बेटा मांजरींना?" प्रधान
"काका त्या ना घाबरवायच्या एकदा आई ला पण घाबवल होत त्यांनी मग नॉर्मल माणसांना वाचवणं हे सुपरहिरो च काम आहे म्हणून मी त्यादिवशी सकाळी मारलं त्यांना" ओजस
"बाळा कधीपासून तु हा गेम खेळतोस?" प्रधान
"ताई एव्हडा होतो तेव्हा पासून "ओजस
सगळे एव्हिडन्स कॉलेक्ट करून व ओजस ला त्याच्या आई बरोबर कस्टडी घेऊन पोलीस ठाण्यावर परत आले.
केस सोडवली की चालू केली हेच कळत नव्हतं.

आपण मुलांच्या security साठी कधी करमणुकीसाठी देतो मोबाईल पण खरंच ते योग्य आहे का?
मोबाईल देत जरी असून तरी त्यावर ते नेमकं काय करतात हे पाहतो का?
लहान मुलं गेम च्या आहारी जाऊन काहीही करतायत लहान मुलं कशाला तरुण पिढीही तशीच होत आहे.
कोणत्यातरी गेम मधले काहीतरी टार्गेट पूर्ण करायचे एवढे की आपला आपल्या जीवाचा घरच्यांचा विचार अजिबात नाही करायचा?

चूक कोणाची? मोबाईल ची ? मोबाइलला देणाऱ्याची ? घेणाऱ्याची ? गेम तयार करणाऱ्याची ? की चुकीच्या पद्धतीने आहारी जाणाऱ्यांची?

कोणाचीही असो ओजस सारखी मुलं तयार व्हायला वेळ लागत नाही.Virtual जगात जगन सोडलं तर आयुष्यच सुपर हिरो होऊ हे समजावण्याची गरज आलीय.सुपर हिरो पेक्षा नॉर्मल माणूस जास्त खस्ता काहून जगतो आणि जागवतो हे सांगण्याची गरज आलीय.

                                                    @किर्ती कुलकर्णी 

Wednesday, 6 February 2019

Virtuality : भाग १

Virtuality : भाग १

  पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणावर वसलेली कल्पतरू सोसायटी.सोसायटी च्या चारही बाजूने वेढलेली उंच उंच झाडी आणि नंतर पाच बिल्डिंग गोलाकार उभ्या असलेल्या. एक मोठं प्रवेश द्वार सगळ्या बिल्डिंग साठी कॉमन असलेलं.अजूनही दोन छोटी गेट होते एक emergency एक्सिट म्हणून आणि एक सेकंड option म्हणून.एका बिल्डिंग मध्ये साधारण पन्नास घर असतील काही डुप्लेक्स फ्लॅट होते तर काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले.बिल्डिंग च्या मधोमध मोठं आणि छान उद्यान तयार केलेले होते.ज्यामध्ये जिम ,लहानमुलांना खेळण्यासाठी वेगळा परिसर,सिनियर सिटीझन साठी laughing  क्लब व पेडेस्टरीण एरिया असा बराच मोठा परिसर या सोसायटी ने सोयी सुविधांसाठी वापरला होता .एकूणच सगळ्या वयाच्या लोकांसाठी अतिशय उच्च अशी हि जागा होती.तसेच विविध सामाजिक उपक्रमातून इथली लोक सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीही जपत असत.याच मध्ये गणपती ,दांडिया, ईद,दिवाळी,मोहरम इत्यादी...सणांचा प्रामुख्याने सहभाग असे. उच्चब्रू लोकांच्या या सोसायटी मध्ये आता काही सो कॉल्ड टेकनॉलॉजिकल किडे रुजू लागले होते त्यामुळे कधीतरी लहान मुलांनी गजबजणार उद्यान अभ्यास,हा क्लास ,ती ट्युशन नको तेवढ्या पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा यामुळे बऱ्याच वेळा रिकामं राहू लागलं.कोणत्या तरी सणाच्या निमित्याने किंवा कोणाच्या तरी वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या वेळी एकत्र येत होते लोक.मोबाईल,लॅपटॉप,ipad, याच्या नादात सगळं जगच virtual होत आहे तर हि सोसायटी कशी अपवाद ठरेल ?
आजची सकाळ हि तिथे नेहमी सारखी होती. काही लोक मॉर्निंग वॉल्क साठी आलेले, काही लोक भाज्या विकण्यासाठी काही lughing क्लब मध्ये होते.शाळकरी मुले शाळेत निघाली होती.प्रसन्न वातावरण मध्ये जो तो आपापल्या प्रपंचात मश्गुल होता.
तेव्हड्यात ढीश्शह..... असा मोठा आवाज झाला आणि सगळे आवाजाकडे निघाले.जवळ गेल्यावर काय झाले आहे हे कळत होते.रामू दादा याला गोळी मारली होती कोणीतरी. रामू दादा हा शाळकरी मुलांना नेऊन आणून सोडण्यासाठी ठेवलेला माणूस होता.साधारण २५ ते ३० वर्ष वयातला पण मागचे आठ नऊ वर्षांपासून काम करत असल्याने सोसायटी चा एक जवळचा व्यक्ती बनलेला.रामू दादाला कोणी गोळी मारली? खरं तर पिस्तूल कोणाकडे आली? इथून प्रश्न येत होते.सोसायटी मध्ये काही लोक पोलीस होते, कोणी वकील, कोणी डॉक्टर, वेगवेगळे व्यवसाय करणारे, कोणी स्वरक्षणासाठी घेतलेली होती.पण रामू दादा सारख्या माणसाला मारून कोणाला मिळणार होते? त्याकडे ना पैसे ना तो कधी कोणाच्या अधे मध्ये.
जोशी काका सोसायटी चे चेअर पर्सन म्हणून त्यांनी पोलिसांना कॉल करून माहिती दिली. काही वेळातच पोलीस हजर झाले.रामू चा मृत देह उताणा पडला होता गोळी फार जवळून मारली होती.डाव्या बाजूच्या छातीला वरच्या बाजूने गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला होता. प्रथमदर्शनी काहीच संशयास्पद वाटत नव्हतं.रामू दादा च्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा त्याला कोणी मारणारे हे हि त्याला माहित नसावे असे वाटत होते.पण पोलिसांना तेच शोधायचे होते असे काय झाले ज्यामुळे कोणीतरी त्याला मारले असावे तेही एवढ्या सहज पणे.इन्स्पेक्टर प्रधान यांनी प्रथम पाहणी करून बॉडी पोस्टमार्टम ला पाठवली आणि हवालदार नाईक व लेडीज कॉन्स्टेबल देशमुख यांना पूर्ण सोसायटी ची पाहणी व रामू बद्दलची सगळी चौकशी करायला सांगितली.
दुपारच्या वेळेत प्रधान त्यांच्या ऑफिस मध्ये केस चा विचार करत बसले होते. हवालदार नाईक व कॉन्स्टेबल cctv फुटेज, बिल्डिंग मधल्या लोकांची माहिती व पोस्टमार्टम रिपोर्ट अशी सगळी इत्यंभूत माहिती घेऊन आले.

हवालदार नाईक बोलू लागले,"सर,एकूण सहा लोकांकडे पिस्तूल आहे ते कबूल झाले आहेत. Mr पाटील जे डॉक्टर आहेत,मिस दीक्षित फॅशन डिझायनेर,मिसेस स्वर्णलता देशपांडे बँक मालक, Mr जोशी रिटायर्ड आर्मी ऑफिसर,मिसेस अग्निहोत्री बिसनेस आहे त्यांचा आणि राहुल महाडिक कॉन्ट्रॅक्टर.यांनी प्रत्येकाने पिस्तूल ठेवण्याचे वेगवेगळे कारण दिले आहेत.ज्यामध्ये मिस दीक्षित यांचं कारण फारसं पटण्यासारखं नाहीए त्यांचं म्हणणं असं आहे कि त्यांचा एक्स बॉयफ्रेंड बऱ्याच वेळा त्यांच्या कडे येत असतो आणि तो त्रास पण देतो म्हणून त्यांनी स्वरक्षणासाठी ती पिस्तूल त्यांच्या जवळ ठेवली आहे.पण कोणत्याच पोलीस स्टेशनला त्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंड ची complain नाही केलीय. पाटील हे एक मोठे surgien असून आता पर्यंत त्यांच्या वर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला आहे म्हणून त्यांनी पिस्तूल त्यांच्या जवळ ठेवली आहे आणि याची शहानिशा केल्यावर ते खरं बोलतायत याचे पुरावेही मिळाले आहेत.मिसेस स्वर्णलता या एका बँकेच्या मालक आहेत त्यामुळे त्यांनी सेफ्टी साठी तर जोशी हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर म्हणून त्यांच्या कडे हि पिस्तूल आहे.सर हा महाडिक, नावाचा भाज्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे भाज्यांचा सोडून अजूनही त्याचे बरेचसे धंदे आहेत ज्यामध्ये लोकांना धमकावून गाळे खाली करून घेण्यापासून जबरदस्तीने चंदा गोळा करायला लावणे इथं पर्यंत."
मगापासूनच्या संवादामध्ये पहिल्यांदाच देशमुख बाई बोलत होत्या "सर एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे या महाडिक ची बायको सगळ्यांशी थोडं जास्तच सलगीने बोलते शक्यतो पुरुषांशी.यावरून तिचे आणि Mr महाडिक यांचे बऱ्याच वेळा वाद झालेत असेही कळले आहे."
"हो सर मॅडम च्या बोलण्यात तथ्य आहे मी ते अनुभवले" नाईक थोडे ओशाळुनच बोलले.
"ओके, पण यांच्या कोणाकडेच रामूला मारण्याचा काहीच हेतू नाहीए.ज्यांच्याकडे पिस्तूल आहेत हे कबूल झालेत त्यांचे licence चेक केलेत?"
"हो सर त्यांचे licence चेक करून त्यांच्या झेरोक्स आपल्या रेकॉर्ड घेतल्या आहेत."नाईक
"ओके गुड,पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये गोळी जवळून लागल्याने कॅव्हिटी तयार होऊन रक्त प्रवाह थांबला आणि म्हणून लगेच मृत्य झाल्याची नोंद झालीय." इन्स्पेक्टर प्रधान.
"रामूच्या घरी जा व लवकरात लवकर माहिती घ्या. तसेच आपल्या सगळ्या माहिती पुरवणाऱ्यांना सोसायटीवर नकळत नजर ठेवायला सांगा. मला एकूण एका गोष्टीची माहिती हवी आहे. कोणत्याही हेतू शिवाय एव्हडं मोठं धाडस कोणी करणार नाही आणि तो हेतू काय आहे हे काळाल्याशिवाय आपण खुन्यापर्यंत पोहचू शकणार नाही."प्रधान
"येस सर,म्हणून नाईक कामाला लागले सुद्धा."
हवालदार नाईक बरोबर पोलिसांची गाडी रामूच्या घराजवळ येऊन थांबली.
घरामध्ये शोक कळा पसरली होती.रामूची आई, वडील, लहान, बहीण, एक भाऊ सगळेच भान हरवून बसले होते.गरीब असले तरी त्यांच्यातले प्रेम दुरूनही दिसत होते.घरात कमावणार रामू एकटाच होता.बहीण वे भाऊ शिकत होते आई थकलेली दिसत होती वडील एका पायाने अधू.रामू कल्पतरू सारख्या अजून तीन चार सोसायटी मध्ये काम करायचा शाळकरी मुलांना न्यायचं आणायचं आणि त्यानंतर एका ठिकाणी ड्राइवर म्हणून जात होता.
रामू स्वतःहा जास्त शिकलेला नसला तरी शिक्षणाची आस होती त्याला.ज्याला जशी जमेल तशी मदत करायचा तो.एकूणच चारित्र्य आणि सामाजिक शैल्य तो जपून होता.

दुसरा दिवस : स्थळ पोलीस स्टेशन:

रामूचा खून होऊन आज २ दिवस झाले होते अजून खुनी मोकाट होता.रामूची मिळालेली माहिती नाईकांनी प्रधानना दिली.त्यातूनही काहीच संशयास्पद मिळालं नव्हतं.
पुढच्या तपासासाठी आता पोलिसांनी परत कल्पतरू ला भेट दिली.पण तीही भेट फारशी उपयोगी नाही ठरली.
पुरावे भेटत नाहीत कळल्यावर आता जबानी घेणे हेच पोलिसांच्या हातात होते आणि त्यासाठी लागणार होती कसून तपासणी.माहितीगारांकडूनहि काही विशेष माहिती मिळत नसल्याने पोलीस वरचे वर जास्तच कोड्यात जाऊ लागले.
यावर उपाय म्हणून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब च्या मदतीने आता गोळी मारणाऱ्या व्यक्तीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
फॉरेन्सिक लॅब च्या हेड डॉक्टर अपर्णा इन्स्पेक्टर प्रधानांना सांगत होत्या " गोळी मारणारा व्यक्ती मृत व्यक्ती पेक्षा उंची ने कमी असावा. तो साधारण उजव्या बाजूने ने वाकडा उभा असेल म्हणून गोळी लागताना बरोबर गोळी डाव्या बाजूने लागली आहे.गोळी मारणारा व्यक्ती जास्तीत जास्त चार हाथ लांब असेल."
फॉरेन्सिक डॉक्टर ना धन्यवाद देऊन प्रधान पोलीस स्टेशन कडे जातानाच त्यांनी नाईकांना कॉल करून कल्पतरू मधील सगळ्यांच्या उंची आणि त्यादिवशी उद्यानात असलेले सगळ्यांचे फिंगर प्रिंट्स अशी माहिती घेऊन होईल तेवढ्या लवकर पोलीस स्टेशन ला यायला सांगितले.
प्रधानना हवी असलेली सगळी माहिती घेऊन नाईक पोलीस स्टेशन ला आले त्याच बरोबर अजून एक माहिती त्यांनी आणली ती म्हणजे कल्पतरू मध्ये ते होते तेव्हाच दोन मांजरीचं खून झालाय ते पण त्याच प्रकारे ज्या प्रकारे रामू चा झाला.

(रामू चा खून कोणी केला व का केला? तसेच मांजरींनी त्या खुन्याचा काय बिघडवल होत? खरंच कोणी खुनी होत कि अजून काही यासाठी वाचा पुढचा भाग.)

(माझ्या कथा वाचाण्यासाठी खूप धन्यवाद.)

                                  @किर्ती कुलकर्णी

  

Monday, 28 January 2019

कुर्बान हो ना साकेगा !!

अब किसी ओर से इजहार हो ना सकेगा,
ये दिल अब किसी ओर पे कुर्बान हो ना साकेगा !!

इस दिल कि तार तुने छेडी,
अब किसी ओर के लिये ये धून गा ना सकेगा,
दिल का दरवाजा तेरे लिये खोला,
अब किसी ओर के लिये खुल ना सकेगा,
तेरी आदते, तेरी ख्वाहिशें ,तेरे सपने अपना बना बैठा हे,
किसी ओर के लिये जगह दे ना सकेगा,
सिर्फ तुही राज कर सक्ती हे इसपर,
ये किसी ओर पे कुर्बान हो ना सकेगा !!१!!

चाहता तो हूं,
तू भी आके रोज मिले,
जैसे रकीब को मिला करती हो,
तेरे हाथ कि बानी चाई,
मी भी पिऊ,
जैसे रकीब को पिलाया करती हे,
तुझे गाडी पे बिठा के,
गली गली घुमू,
जैसे रकीब घुमाया करता हे,
पर जानता हू वो नहीं पर तू जान वारती हे ऊसपे,
वो नहीं पर तू जान वारती हे ऊसपे,
लेकिन सून, मै अब किसी ओर से इजहार कर ना सकुंगा,
ये दिल तूझ पे कुर्बान हे,
किसी ओर पे कुर्बान हो ना सकेगा !!२!!

जब तेरी खुबसूरती कम हो जाये,
या रकीब को कोई ओर फुल मिल जाये,
जब तुझे सच्चे प्यार कि जरुरत हो,
किसी अपने कि जरुरत हो,
जब इबादत से ज्यादा,
इजहार हि चाहिये हो,
बस एक बार याद करना इस दिल को,
क्यों कि, किसी ओर से इजहार अब हो ना सकेगा,
ये दिल अब किसी ओर पे कुर्बान हो ना साकेगा
किसी ओर पे कुर्बान अब ये हो ना सकेगा!!४!!

                                  @किर्ती कुलकर्णी







Thursday, 24 January 2019

स्नेहलता !!!!

सकाळची प्रसन्न वेळ होती.साधारण आठ वाजले असतील.कोवळ्या उन्हामध्ये बाल्कनी मध्ये निवांत पेपर वाचत बसले होते.एवढ्यात माझा मोबाईल रिंग झाला.स्क्रीन वर तरुण च नाव झळकत होत.एवढ्या सकाळी तरुण चा कॉल पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. थोड्यात काळजी वाटली सगळं ठीक असेल ना.लता ची तब्बेत ठीक असेल ना.कालच तर बोलले होते मी तिला.एवढ्या सकाळी आलेल्या कॉल ने नको ते सगळे विचार एका क्षणात डोक्यात आले.
मी कॉल उचलला.....
" मावशी आई ला हॉस्पिटल ला आणलेय काल रात्री अचानक तिला अस्वस्थ वाटत होत आणि नंतर छातीत दुखायला लागलं.डॉक्टर म्हणत आहेत कि घाबरण्याचं कारण नाही पण ती अजून ती शुद्धीवर नाहीए, माऊ मला भिती वाटतेय तू ये प्लीज "तरुण रडत रडतच म्हणाला.तरुण च्या तोंडात माऊ हे शब्द मी खूप दिवसांनी ऐकत होते मला तरुण चा तो लहान मुलांसारखं घाबरलेला चेहरा डोळ्यासमोर आला.
तू काळजी करू नकोस मी निघते लगेच.त्याच्याशी बोलत बोलतच मी गाडीची चावी, घराचं कुलूप हॉस्पिटलचं नाव आणि काही पैसे अश्या काही गोष्टी घेत घाईतच बाहेर पडले बाहेर पडताना फक्त ती सुखरूप असूदेत हीच प्रार्थना करत होते.

स्थळ : नीरजा हॉस्पिटल

पंचावन्न साठ वर्षांची स्त्री शांत पडलेली आहे बेड वर जस की झोपलीय.डॉक्टर नर्सेस आणि अजून काही मेडिकल कर्मचारी आहेत शेजारी.दरवाज्याच्या काचेतून साधारण पंचविशीतला एक मुलगा डबडबलेल्या डोळ्याने पाहतोय तिला.त्याच्या बरोबर साधारण त्याच्याच वयाची एक तरुणी आहे.जिने त्याला धीर देण्यासाठी त्याच्या खांद्यावर हाथ ठेवला आहे.

रिसेपशनिस्ट ला ICU विचारून मी धावतच ICU जवळ आले तिथेच तरुण उभा होता त्याच्या लाडक्या मावशीला पाहून तो धावतच तिच्या कडे गेला." मावशी आई...., माऊ आईला बघ ना ग.डॉक्टर म्हणतायत काही सिरीयस नाहीए मग आई अजून शुद्धीवर कशी नाही येतेय ग ?" "मला खूप काळजी वाटतेय".

एवढ्यात डॉक्टर बाहेर आले ,"इथे सौम्या कोण आहे? सौम्याचं नाव घेत आहेत त्या.त्या शुद्धीवर येतील तेव्हा सौम्या त्यांच्या समोर असतील तर त्या लवकर रिकव्हर होतील.ते इथे नसतील तर त्यांना बोलावून घ्या"

डॉक्टर कडून सौम्या हे नाव ऐकून मी तर हादरूनच गेले.अडोतीस चाळीस वर्षांपूर्वीची माणसं आणि नाव डोळ्यासमोरून ताजी होत गेली.बिचारा तरुण काही न कळल्याने फार गोंधळाला होता.माझ्याकडे बघत म्हणाला माऊ "आपल्याकडे कोणीच सौम्या नाहीए मग आई कोणाची आठवण काढतेय?"

दुपार पर्यंत चा वेळ असाच गेला सौम्या कोण हा विचार  करण्यात खरं तर विचार फक्त तरुण करत होता मी तर फार लांब गेले होते आठवणींच्या पुस्तकात फिरत.
नर्सने ICU मधून बाहेर येत काही औषधनांचे नाव लिहून दिले आणि आणायला सांगितले.माधवी तरुण बरोबर असलेली त्याची सखी आणि लवकरच होणारी अर्धांगिनी त्या गोळ्या आणायला गेली.

तरुण ची घालमेल मला पाहवत नव्हती आता. खूप बेचैन झाला होता तो आई च्या काळजीने आणि सौम्या कोण ? या प्रश्नाने.

खूप धीर एकवटून मी त्याला बोलले मला माहित आहे कोण आहे सौम्या ते.

त्याने एकदम आश्चर्याने मला विचारले कोण आहे सौम्या? कुठे आहे? आईच्या आश्रमात कोणी आहे का? आई फार लवकर आपलंस करते कोणालाही तिने लग्न लावून दिलेल्या लोकांपैकी आहे का कोणी? पण असा असेल तर माधवीला तरी माहिती असायला हवे होते ती तर आई बरोबरच असते आश्रमात.माऊ प्लीज सांग कोण आहे सौम्या?

डोळ्याचे पाणी पुसून आणि पूर्ण धीर एकवटून मी तरुण ला सांगायला सुरवात केली,

"लता आणि मी लहानपणापासून एकत्र बहिणी पेक्षा जास्त प्रेम आमच्यात एकवेळ स्वतःला खोटं बोलू पण एकमेकींना सगळं खरं आणि खोटं बोललेही नाही जायचे कारण लगेच पकडले जायचो.तुझी आई खूप साधी सरळ शांत. कधी कोणाचं एक नाही कि दोन नाही ती आणि तिचा अभ्यास ,घर ,शाळा बास एव्हडेच तिचं आयुष्य.तिचं एकच ब्रीद होत मला माझे कर्तव्य पूर्ण करायचेत.मला माझ्या आई वडिलांना कायम सुखी ठेवायच आहे.आत्ता मी जी हि काही आहे त्यामध्ये तिचा खारीचा वाटा आहे."

एक सुस्कारा सोडला आणि पुढे बोलू लागले," आमची शाळा झाली आणि आम्ही कॉलेज ला पण एकत्रच ऍडमिशन घेतलं.एक एक दिवस पुढे जात होते.कॉलेज मध्ये ओळखी होत होत्या.मी,स्नेहलता (तुझी आई),वैभव,आदित्य,गौरांग,रोशनी,अभिलाषा आणि सौमित्र असा आमचा बऱ्या पैकी मोठा ग्रुप झाला होता.आम्ही सगळे वेगळ्या फॅमिली बॅकगोरुंड चे, वेगळे  ध्येय ठेवणारे पण वाटा मात्र असणारे सहप्रवासी झालो होतो. तरीही लता ला मी आणि मला ती ही जागा कधी कोणी घेऊ शकलं नाही. कॉलेज मध्ये आम्ही वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेत होतो काही जिंकत होतो काही हरतं होतो पण एकत्र राहून पूर्ण धमाल करत होतो."

माधवी नर्सना गोळ्या देऊन आली आणि शांतपणे आमच्या जवळ येऊन आमच्या संवादाचा एक भाग झाली.
"धमाल करत मजा मस्ती करत पाहिलं वर्ष पूर्ण झालं होत आणि त्यावर्षाबरोबर आमची मैत्री देखील. परीक्षा संपल्या आणि आता १ महिना सुट्टी होती. एक महिना आम्ही कोणी कोणाला भेटणार नव्हतो.सुट्टी लागून एक आठवडा झाला आणि मी स्नेहलता ला भेटायला तिच्या घरी गेले होते तर ती तिच्या घरी झोक्यावर बसून काहीतरी विचार करत होती.ती विचारात एव्हडी अडकली होती  की मी तिच्या इथे जाऊन तिला हलवले नाही तोपर्यंत, मी आले आहे हे तिच्या ध्यानातच आले नव्हते.मी तिला विचारले काय ग काय झालं एव्हडा काय विचार करतेयस तर तिने सांगितले की "अतुल दादा म्हणजे तुझा मामा लताचा चुलत मोठा भाऊ त्याने एक मुलीशी प्रेम विवाह केला आहे म्हणून घरातल्यांनी त्याला घराबाहेर काढले आहे आणि परत कधी तोंड नाही पाहायचे म्हणून सांगितले आहे. त्यांनी लताला पण त्याने तोंडही न पाहण्याची सक्ती केली होती. लता अतुल दादाला भेटू शकणार नाही याने खूप दुखी झाली होती.तिला कसे तरी समजावून तिला शांत केले".

मला तेव्हा काय माहित होत एक वादळ शांत करत असताना दुसरा वादळ चालू होणार आहे.थोडं पाणी घेऊन पुढे सांगायला चालू केले " पुन्हा कॉलेज चालू झालं पुन्हा आमचा ग्रुप दंगा मस्ती आणि न संपणार वादळ.दरम्यानच्या काळात कॉलेज उपक्रमासाठी आमचे गट तयार करण्यात आले होते मी, वैभव, रोशनी एका गटात आलो तर सौमित्र , लता आणि आदित्य एका गटात.उपक्रमामुळे आम्ही सगळे रोज एकत्र भेटत नसलो तरी मैत्री तशीच होती.अभ्यास उपक्रम या सगळ्यात मी आणि लता थोड्या दूर तर ती आणि सौमित्र थोडे जवळ आले."
"सौमित्र तसा बड्या घरातला,दिसायला चांगला आणि सुस्वभाळु मुलगा होता.त्याच पूर्ण कुटुंब शिक्षित आणि मनमोकळं होत.त्याच्या घरामध्ये त्याला पूर्ण मोकळीक होती त्याचे निर्णय त्याने घ्यावेत ही रीत होत.एकूणच कोणालाही कशाचंही बंधन नव्हतं.पण म्हणतात ना कोणाचंही धाक नसणे हाच मोठा धाक असतो तसाच काहीस तो सगळ्यांचा मान ठेवायचा आणि योग्य ते करायची हिंमत पण.तर या विरुद्ध लता च्या घरात वातावरण होत लता अत्यंत पौराणिक घरात वाढलेली मुलगी धर्म , पंथ , प्रथा या सगळ्यात समाज तोलणाऱ्या घरात राहिलेली.तिलाही बंधन नव्हती पण एका मर्यादे पर्यंत तिला पण तिचे निर्णय स्वतःच घ्यायला लावले जायचे पण एका मर्यादेपर्यंत.उदाहरण च सांगायचं तर तुला शिकायचंय तर शिक पण काय शिकायचं हे आम्ही ठरवणार.पण माझी लता खूप सोशिक होती भावाशी नातं संपल्या नंतर आई - बाबांना खूप सांभाळून घेत होती.त्यांचा एक शब्द पण खाली पडून नाही द्यायची.काका-काकूंना खूप अभिमान होता तिचा.त्यांचं सर्वस्व झाली होती ती. कधी भावाचा विषय निघालाच तर काका काकू म्हणत तिला बेटा फक्त आपल्या जातील बघ ग पोरी मुलगा ."

"कॉलेज मध्ये ट्रॅडिशनल डे होता सगळ्या मुली साड्या नेसून आल्या होत्या, लता आधीच दिसायला छान त्यात साडी म्हणल्यावर मुलांची तर चांदीच होती.आम्ही कॉलेज पोहचलो आमचा ग्रुप तिथेच होता रोशनी आणि अभिलाषा ने देखील साडी नेसली होती.सगळे एकमेकांना चिडवत कॉम्प्लिमेंट्स देत चालले होते तेव्हड्यात सौमित्र आला किती छान दिसत होता तो त्यादिवशी तो डायरेक्ट लता ला कॉम्पिटिशन देत होता ;).तो आल्यावर आम्ही सगळे कॅन्टीन कडे गेलो जाताना आम्ही सगळे पुढे गेलो पण लता आणि सौमित्र मागे राहिलेले कोणाच्याच ध्यानी नाही आले.त्यादिवशी कॅन्टीन मध्ये सगळ्यांसमोर सौमित्र लताला बोलला ती खूप छान दिसतेय पण ते आम्हाला कोणालाच कळले नाही.म्हणतात ना जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तुमचं जागाच वेगळं असतं."

"दिवस पुढे सरकत होते इकडे यांचे एकमेकांची काळजी घेणे सतत सोबत देणे, आत्मविश्वास वाढवणे,कधी कळत कधी न कळत हक्क गाजवणे चालूच होते.ते बहरत होते. नव्या भावनांमध्ये खेळत होते.सौम्या म्हणजे सौमित्र नेहमी म्हणायचं लता त्याच गुड लक आहे. आणि खरंच असा काहीस असावं ती त्याच्यासोबत असेल तर तो यशस्वी व्हायचं मग ते कबड्डीचा मैदान असो वा कॉलेज च इलेकशन." मी आत्ताचे तरुण तरुणी पहाते शरीर संबंधांना प्रेमाच्या व्याख्या देऊन फक्त स्वतःची भूक मिटवणं चालू आहे."सौम्या आणि लता तसे नव्हते ते मनाने बांधलेले होते,त्यांनी त्यांच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत. कदाचित म्हणूनच ते जास्त दृढ झाले.कदाचित म्हणूनच ते जास्त बहरले.नात्याला हळू हळू उलघाण्याटला आनंद त्यांनी घेतला."

तरुण च्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते, ज्याचे उत्तर देणे गरजेचे होते.

"वेळ कोणासाठी थांबत नसतो.लता च्या घरी लग्न साठी बोलणी चालू झाली होती. लताला सौमित्र शी लग्न करायचं होत पण आडवी येत होती ती त्यांची जात.लता ने घरी समजावण्याचा खूप प्रयत्न केला सौमित्र च्या घरी काही अडचण नव्हती.घरचे ऐकत नाहीत हे पाहून तिने त्याला पळून जाण्याविषयी पण सुचवले मी तर यावर विश्वासच करू शकले नव्हते लता हे बोलतेय....पण सौमित्र चांगल्या घरातला एक भावानळु मुलगा होता.त्याने लता ला समजावले आपण जन्मभर लग्न नाही केले तरी चालेल पण होईल ते घरच्यांच्या संमतीनेच.त्याच्या विषयीच विश्वास आणि प्रेम अजूनच वाढलं होत.
लता ऐकत नाही पाहिल्यावर तिच्या आई बाबांनी तिला एक दिवस सांगितलं तुला पाहिजेच तर आम्ही तुझं लग्न लावून देतो त्या मुलाशी पण नंतर आमच्या दहाव्याला पण नाही यायचं आणि आमचं तोंडही नाही पाहायचं.आणि जर आमच्या बरोबर पाहिजे असेल तर आम्ही सांगू त्यामुलाशी लग्न करावं लागेल. आयुष्य ज्या मुलीने फक्त आई वडिलांचा विचार केला त्या मुलीला हे बोलणं जिव्हारी लागलं.तिने वेळ मागून घेतला आणि सौमित्र च्या कानावर घातली ही गोष्ट.सौमित्र ने तिला यातही साथ दिली.तिचे कर्तव्य त्या दोघांनी पूर्ण केले.त्याने लग्न करून तिचा हात नाही धरला पण तिची साथ ही नाही सोडली.त्यानंतर सौमित्र ची अवस्था मात्र फार वाईट झाली त्याच्या घरच्यांना ते पाहवत नाही म्हणून त्यांनी त्याच लग्न लावून दिल. लग्न झाल्यावर माणसं रिकामी राहत नाहीत या खोट्या आशेवर.इकडे तुझ्या बाबांचं म्हणजे शंतनू परांजपे च स्थळ आले लता साठी, तिने नाही किंवा हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.लग्न हे एक नफ्याचा करार होता तिच्यासाठी ज्यामध्ये जात नावाचा राक्षसाने तिच्या प्रेमाचा बळी घेतला होता."

"देवकृपेने त्याच सगळं चांगलं झालं आणि तिचंही पण सौमित्र वरच प्रेम नेहमीच डोकं वर काढायचं देवाच्या पाय पडताना, नदीत दिवे सोडताना आश्रम चालू करताना पण". तरुण तुला आठवत तू तिला विचारलं होतास एकदा "की लोक अनाथाश्रम, वृद्धाश्रम चालू करतात तू जोडप्यांसाठी का आश्रम चालू केलास? मला वाटते ती त्या प्रत्येक मुलात सौमित्र शोधात असावी आणि मुलीत स्वतःला."

तरुण आणि माधवी ला आत्ता समजलं होत की माधवी ला हो म्हणताना आईच्या डोळ्यात पाणी का होते?

"मला एक किस्सा आठवतोय तुझ्या जन्माच्या आधी एक दिवस अचानक ती आली होती माझ्याकडे आणि मला विचारलं होत " त्याच लग्न झालेय किंवा माझं लग्न झालेय म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करू नयेत का? की भावना आणूच नयेत? पण कोणासाठी काहीतरी मनात भावना येणं आपल्या हातात आहे का? मी खोलात जाऊन विचारले तर सांगितले की आत्ता येता येता एका ट्रक शी तिचा मोठा अपघात होता होता वाचलाय पण त्या क्षणी आई, बाबा, भाऊ, शंतनू हे कोणीच नाही आठवले, आठवला तो सौम्या माझा सौमित्र.खूप समजावलं मी स्वतः ला ,तो तुझा नाहीए पण...."तिच्या कोणत्याच प्रश्नच उत्तर माझ्याकडे नव्हतं.तिला आहे त्या परिस्थितीत साथ देणं या पलीकडे मी काहीही करू शकत नव्हते. कधी कधी वाटायचं तिला म्हणावं जा सगळं सोडून तुझ्या सौम्या कडे पण मी ओळखते तिला तिचे कर्तव्य तिच्या मर्यादा याच भूत आहे डोकयावर तिच्या नाही ऐकणार ती.सगळे कर्तव्य मूक पणे सांभाळताना सर्वात मोठं पाप ती वेळोवेळी करत होती क्षणोक्षणी स्वतः ला मारत होती आणि जगाला भासवत होती ती सुखी आहे."

"काय जादू होती त्याच्या प्रेमात माहित नाही,आज मरणाच्या दारात पण तिला तो हवा आहे"

"देवा प्लीज मरण्याच्या आधी एकदा त्यांना भेटवं एकदा मनसोक्त बघूदेत एकमेकांना" असा म्हणत रुमालाने मी डोळे टिपून घेतले.
तरुण ने मला विचारले तुझ्याकडे त्यांचा नंबर आहे का? मी बोलावेल त्यांना.
माझ्याकडे त्याचा नाही पण वैभव चा आहे नंबर. वैभव, अभिलाषा असे सगळे संपर्क केल्यानंतर कसातरी सौमित्राचा नंबर मिळाला.
तरुण ने कॉल केला तीन रिंग नंतर कॉल उचलल्या गेला. तरुण ने माझ्याकडे कॉल दिला. मी गरजेची सगळी माहिती देऊन मी त्याला येण्याची विनंती केली. तो ही लगेच तयार झाला आणि कॉल केल्यानंतर ५ तासात तो हॉस्पिटल ला हजर झाला.

देवानं माझी प्रार्थना  ऐकली असावी.पस्तीस वर्षानंतर दोन प्रेमी एकमेकांना भेटणार होते.
सौम्या आत गेला त्याने लता चा हात हातात घेतला आणि बोलला " लता उठ बघ मी आलोय तुला भेटायला.लता बघ ना सगळं जग सोडून आलोय मी तुझ्यासाठी."
लताने डोळे उघडले "तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने एकवार सगळ्या रूम मध्ये नजर फिरवली तरुण, मी, माधवी आणि तिचा सौम्या सगळे होतो.ती बोलू लागली " सौम्या मला माफ कर माझ्या कर्तव्यांची शिक्षा मी तुला दिली.मला विसरू नकोस मी तुझी होऊन तुझी नाही झाले."
सौम्या हसून बोलला " अगं वेडे आपण कायम एकमेकांचेच होतो आणि राहणार."

धो धो पावसानानंतर निरभ्र आकाश राहावं तसा सगळं स्वच्छ होत.अपूर्णच एक प्रेम कथा पूर्ण झाली होती.

जातीचा राक्षस पुन्हा हरला होता.प्रेमाने त्याचा डाव जिंकला होता.आज सगळेच समाधानाने सुखाने नांदू लागले होते.माणसाने माणसाला माणसासारखे मानलं होते.

प्रत्येकामध्ये एक लता आणि सौमित्र असतो निस्वार्थी,निराकार प्रेम करणारा त्याला जात ,धर्म ,गरीब ,श्रीमंत याच बालंट नको लावायला.प्रेम दिले तर प्रेम भेटेल आणि दुनिया तरेल.

                                @कीर्ती कुलकर्णी

Sunday, 13 January 2019

चारोळी - जन्म

या जगात जन्म तुझ्यासाठी घेतला,
या श्वासाचा मर्म तुला वाहिला,
प्रेमाच्या समुद्रात पाहिलं पाऊलतुझ्या बरोबर ठेवलं,
तुझ्याच डोळ्यात आता हे आयुष्य सरल........

                                                 @किर्ती कुलकर्णी

प्रेमाची नौका !!!

प्रेमाची नौका !!!

प्रेमाच्या सागरात नौका आपली तरून जावी,
माझ्या श्वासागणिक साद तुला जावी,
तुझ्या - माझ्या प्रेमाने जगही रंगून जावे,
जन्मो-जन्मीसाठी मी फक्त तुझी होऊन जावी,
जन्मो - जन्मीच्या नात्यात विश्वासाची ओंजळ भरत राहावी,
तुझ्या - माझ्या सुखाची तिथे परिसीमा न व्हावी,
अंतरंगात कणाकणात मी तुझ्यात भिनावी,
निराकार,मुक्त,स्वछंदी पाण्याप्रमाणे मी तुझ्यात मिसळावी,
या प्रेमाच्या सागरात नौका आपली तरून जावी !!!

                                                 @किर्ती कुलकर्णी

Tuesday, 1 January 2019

माझ्या बा च झोपटं !!!


डोंगराच्या पल्याड माझ्या बा झोपटं ,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं खोपटं !!
रुणुझुणु बैलासंग तिथे होते हो पहाट,
चालू होते मंग कष्टाचीच रहाट,
गाई - म्हशी बैलासंग बा राबतो जमिनीत,
काट्या कुट्यातच त्याच्या आयुष्याची वाट,
बा खातो भाकरी , लेवतो धोतर,
साधीच राहणी पण उच्च ते विचार,
बा पेरतो हो माया, हात करून राकट,
घालतो हा जगासाठी अन्न धान्याची समेट,
डोंगराच्या पल्याड माझ्या बा झोपटं ,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं खोपटं !!!!
बा राबतो  शेतात , माय सांभाळते घर,
किती शोभून दिसतं तिचं रांगोळीच दार,
माय थापते भाकर,
सांगे संसाराचा सार,
सारा गावचं हो तिचा,
तिचं कुटुंबच न्यारं,
माय माझी, तपती ज्योती,
पेले अंधाराचा भार,
तिची निस्वार्थी भक्ती,
तिची साधना कठोर,
डोंगराच्या पल्याड माझ्या बा झोपटं ,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं खोपटं !!!!
माय - बाप माझे थोर,
त्यांचे प्रेम हो अपार,
काय सांगू हो थोरवी,
ते अमृताचे शिलेदार,
जागा मिळो मला, त्यांच्याच पायात,
देवा राहुदेत मला त्यांच्याच सावलीत,
डोंगराच्या पल्याड माझ्या बा झोपटं ,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं खोपटं !!!!


                                             @किर्ती कुलकर्णी