Tuesday, 24 September 2019

पहाट !!!!

सांजवेळी केसरी तळी,
तुझी आठवण येते आहे,
सौभाग्याची अभागी ही,
अमावास्येत जगत आहे,
पावसाची सर,
प्रेमाचे गाणे गाते आहे,
गाणे प्रेमाचे कि विरहाचे,
हे मात्र गूढच आहे,
प्रेम असो वा विरह,
आहे ते आपले आहे,
म्हणूनच, प्रेम आपले जिंकणार,
हे आता उमजते आहे,
काळोख्या रात्री नंतरची रम्य,
पहाट आता झाली आहे,
या विचारातच,
आता मी निद्राधीन होत आहे.....

                  @किर्ती कुलकर्णी


No comments:

Post a Comment