Tuesday, 25 June 2019

काहीतरी अजबच आजकाल घडतेय !!


तुझ्या माझ्या नात्याचा
सुगावा या जगाला लागला,
सगळ्यांनी आनंदाचा वर्षाव
आपल्यावर केला,
माझ्या मनाचा कानोसा,
तुझं मन घेतेय,
काहीतरी अजबच
आजकाल घडतेय !!!!

नात्यांना नात्यांची नवीन
गुंफण मिळतेय,
कर्तव्य आणि प्रेमाचे पारडेही
जड होतेय,
भावनांची लेखणी डोळ्यात स्वप्नांचे,
इंद्रधनुष्य रेखाटतेय,
खरंच, काहीतरी अजबच,
आजकाल घडतेय !!!!

                             @ किर्ती कुलकर्णी

No comments:

Post a Comment