Virtuality Part २:
आता मात्र इन्स्पेक्टर प्रधान पुरते भांबावले होते.आता पर्यंत माणसांच्या खुनाचे तपास ते करायचे आता मांजरीच्या खुनाचा पण.
इन्स्पेक्टर प्रधान , हवालदार नाईक आणि कॉन्स्टेबल देशमुख मॅडम हे सगळे केस ची चर्चा करत काही तर्क लागतोय का हे चेक करत होते.
इन्स्पेक्टर प्रधान "नाईक या मांजरी पण पिस्तूल ने मरण हा या केस चा विचित्र भाग आहे.रामू ला मारण्या मागचा उद्धेश अजून सुटत नाही आणि त्यात हे मांजर प्रकरण.नाईक हा जो कोणी आहे मारणारा नक्कीच माथेफिरू असाला पाहिजे. नाहीतर मुक्या जीवाला कोण त्रास देणार?"
तेवढ्या देशमुख मॅडम बोलल्या " सर मला वाटत हे मांजरींना मारून आपल्याला आपल्या तपासाच्या दिशा मिळू नयेत किंवा त्या विखुरल्या जाव्यात हा हेतू तर नसेल ना ? आणि असा असेल तर कदाचित अजून कोणाचा तरी जीव धोक्यात असू शकतो."
"नाईक आपण बिल्डिंग वर नकळत लक्ष ठेवतोय,त्यात काही संशयास्पद?" प्रधान
"नाही सर काही नाही, फक्त तो महाडिक काय ठीक वाटत नाही, परवा त्यानं एका भाजीवाल्याचा गाळा खाली करून घेतला त्याची complain आलीय.बाकी ज्यांच्याकडे पिस्तूल होतं त्यांचं सगळं ठीक वाटतेय."
एवढ्यात प्रधानांना काहीतरी सुचलं आणि ते एकदम बोलले नाईक गाडी काढा आपल्याला सोसायटी मध्ये परत जावं लागेल.
इंस्पेक्टर प्रधान, नाईक आणि देशमुख गाडीसहीत आत आले. आत आल्याबरोबर प्रधान रामू चा खून झाला तिथे एका हवालदारासोबत गेले आणि देशमुख मॅडम आणि नाईक मांजरीचं खून झाला तिथे गेले.
थोड्याच वेळात प्रधानांबरोबर च्या हवालदाराला काहीतरी सापडले आणि त्याने प्रधानांना आवाज दिला.
बुलेट होती ती साहजिकच रामूला लागलेली.
प्रधानांची अजून बाकी माहिती घेतली आणि आणि ती बुलेट आणि ती बुलेट फॉरेन्सिक लॅब ला पाठवले.
इकडे नाईक आणि देशमुख मॅडम ला काहीही सापडले नव्हते.
प्रधान ही तिथे पोहचले. मांजरी जिथे खेळत होत्या तिथे कुंपण केले होते, त्याच्या बरोबर मागे सिनियर सिटीझन पार्क होतं. आणि tत्याच्या बरोबर मागे यांना बसण्यासाठी केले बेंच होतं.नाईक ना अचानक प्रधानांनी आवाज दिला आणि सांगितले जाऊन त्या बेंच वर बसा. नाईक जाऊन बसले आणि प्रधान समजल्याच्या आवेशात सगळ्यांना बोलले चला जाऊ आता
पोलीस चौकीत आल्या आल्या प्रधानांनी बुलेट ची माहिती मागवली पण ते रिपोर्ट यायला अजून दोन तास बाकी होते.
पुन्हा नाईक, देशमुख आणि प्रधान त्यांच्या केबिन मध्ये होते.
आपल्याला सर्वात मोठा पुरावा म्हणजे बुलेट मिळाली आहे आता हे कळेल की गन आहे कोणाची?
" हो सर, पण हे पण तेवढच महत्वाचं आहे की रामू ने काय बिघडवले होत? त्याला का मारलं ? तसेच त्या बिचार्या मांजरी एक वेळ मान्य केलं की रामू च काहीतरी सेक्रेटली कोणाशी बिनसलं असेल पण मांजरी त्यांना का मरावं आणि तेही पिस्तूल ने?" नाईक बोलले
"नाही नाईक मांजरी कदाचीत मोहरा झाल्यात मेन टार्गेट काहीतरी वेगळाच असावं"प्रधान
"पण सर अजून एक प्रश्न आहे, जर टार्गेट काहीतरी वेगळं असेल तर अजूनही ते धोक्यात आहे कारण मांजरीं नंतर काही चुकीचं घडलं नाहीए तिथे." कॉन्स्टेबल देशमुख
"हम्म...नाईक देशमुख मला त्या सोसायटी च्या लोकांची सगळी माहिती पाहिजे अगदी सगळी छोट्यात छोटी गोष्टही मोठी असू शकते आपल्यासाठी" प्रधान
"ओके सर.." हे बोलून आणि सॅल्यूट देऊन नाईक आणि देशमुख दोघेही कामाला लागले.
ऑर्डर देऊन प्रधान आपल्या केबिन मध्ये cctv फुटेज पुन्हा पाहण्यात मग्न झाले.
तीच रम्य सकाळ आणि तेच सकाळचं वातावरण कोणीही या जागेच्या प्रेमात पडेल असा वाटलं एक मिनिट प्रधानांना.पुन्हा पुन्हा फुटेज पाहूनही काही हाती लागत नव्हतं.
रामू लास्ट तिने जेव्हा फुटेज मध्ये होतं ते शाळकरी मुलांच्या घोळक्यातच.
तेव्हड्यात बुलेट चे फॉरेन्सिक रिपोर्ट आले.
ती बुलेट ज्या गन मधून निघाली आहे ती गन स्पेसिअल बनवलेली आहे भारतीय आर्मी साठी आणि ती गन फक्त त्याच लोकांना मिळते जे आर्मी मध्ये खूप वरच्या पोस्ट वर काम करतात.कमी फोर्स मध्ये ही बुलेट fire होते.हे त्याचे वैशिष्ट्य आहे इ माहिती फॉरेन्सिक ऑफिसर ने सांगितली.
प्रधानाच्या डोक्यातील तारा फिरल्या त्यांनी ताबडतोब नाईक ना फोन करून Mr जोशी जे आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांना ताब्यात घ्यायला सांगितले तसेच त्यांच्या घराची झडतीही घ्यायला सांगितली.
जोशींना पोलीस स्टेशन ला आणण्यात आले.त्यांची कसून चौकशी सुरु झाली पण त्यांच्याकडे मिळालेल्या गन मध्ये ती बुलेट फिट होत नव्हती.
त्यांच्या कडे दुसरे कोणते गन आहे का यासाठीची चौकशी सुरु झाली त्यांची पूर्ण हिस्टरी काढण्यात आली पण कुठेही काहीही धागा मिळाला नाही शेवटी पुरावा नसल्याने जोशींना सोडून द्यावे लागले.
पण जो धागा मिळाला होतं तो चुकीचा नव्हता कदाचित जोशी नसतील पण कोणीतरी नक्की आहे.
नाईक, प्रधान आणि देशमुख टीम सोबत कसून चौकशी करत होते.
सोसायटी च्या सगळ्या लोकांची इत्यंभूत माहिती घेताना अजून एक फॅमिली समोर आली.श्रीमती चारुलता सबनीस. त्यांचे पती देखील आर्मी मध्ये होते आणि एका युद्धात ते शाहिद झाले होते.पण या गोष्टीला तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि त्या त्यांच्या एक १२ वर्षाचा मुलगा व ९ वर्षाची मुलगी या समवेत राहत होत्या.सबनीस इंटिरियर डिझायनेर होत्या आणि त्यांनी नामांकित प्रोजेक्ट सांभाळले होते.समाजात त्यांना एक स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून खूप मान होतं.मी आणि माझं काम माझं काम माझं कुटुंब त्या यातच बिझी असतात.
मुख्य म्हणजे जेव्हा रामूचा खून झाला तेव्हा त्या घरीच नव्हत्या. प्रोजेक्ट काम संपलं नसल्याने त्या त्या सकाळी ७ च्या आधीच गेल्या होत्या आणि हे आपण cctv मध्ये पडताळूनही पहिले आहे.
" ओके नाईक यांचा फॅमिली बॅकग्राऊंड जरी नीट असेल तरी आपण हे विसरू नाही शकत की त्या आर्मी ला बेलॉन्ग करतात आणि हा सर्वात मोठा दुआ आहे.त्यांच्या घराच्या झडतीचं वॉरण्ट घ्या आणि कल्पतरू वर पोहचा."
प्रधान आपल्या टीम सहित फ्लॅट नंबर ५०५५ च्या समोर उभे होते.दरवाजा सबनीसांनीच उघडला.
सबनीस नुकत्याच कामावरून आलेल्या दिसत होत्या.
"आमच्याकडे घराच्या झडतीचं वॉरण्ट आहे,रामूच्या खुनाच्या संदर्भात आम्हाला माहिती घ्यायची आहे." प्रधान
"पण मी काहीच केलं नाहीए आणि माझ्या घरात माझ्या व्यतिरिक्त फक्त माझी मुलं असतात आमच्या कामाला देखील कोणी नाहीए मग का? आणी रामूचा खून झाला त्या दिवशी मी लवकर गेले होते पाहिजे तर तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये विचारा"सबनीस
"आम्हाला हे सगळं माहित आहे पण आर्मी बॅकग्राऊंड मध्ये जोशी नंतर तुम्हीच आहेत म्हणून हे करावं लागेल.कृपया आमच्या कामात अडथळा आणू नका " प्रधान
"ओके इन्स्पेक्टर you carry on with your job "सबनीस
"Thank You " प्रधान
"सर सगळं घर शोधलं पण काहीच नाही सापडलं." नाईक
"ओके मॅडम काही वाटलं तर आम्ही पुन्हा येऊ आता साठी थँक यु! फक्त एक प्रश्न तुमची मुलं कुठे दिसत नाहीत ?"
"त्यांच्या शाळेची पिकनिक आहे आज. वॉटर पार्क ला गेले आहेत पोहचतीलच एवढ्यात पाहिजे तर कॉल करते मी त्यांना" सबनीस
एव्हडं बोलून सबनीसांनी दोन्ही मुलांना कॉल केले व किती वेळ आहे विचारून कॉल ठेवला.
"तुमचा मुलगा १० १२ वर्षांचा आणि मुलगी ९ वर्षांची आणि त्यांच्याकडे मोबाईल आहेत?"प्रधान
"हो आम्ही तिघेच असतो काही पाहिजे असलं नसलं कामात असले तर त्यांची माहिती मला असावी म्हणून दिलाय" सबनीस
थँक यु येतो आम्ही एव्हडं बोलून प्रधान आपल्या तें सहित बाहेर पडले.
कुठेच यश मिळत नव्हतं पाणी नक्की कुठे मुरात होत कळत नव्हतं.
काहीतरी लीड मिस होतेय.
एवढ्यात काहीतरी समजल्याने प्रधान अचानक खुश झाले आणि नाईकांना म्हणाले " नाईक आज वार कोणता आहे?"
नाईक या अश्या अचानक न कळलेल्या प्रश्नाने थोडे भांबावले आणि बोलले"शनिवार सर आज शनिवार पण उद्या सुट्टी मिळेल असा काही वाटत नाही"
"उद्या सुट्टी मिळेल नाईक पण थोडा वेळ काम करून.चला आज घरी जाऊन निवांत अराम करून उद्या इथेच भेटूया " प्रधान
नाईक आणि देशमुख मॅडम काहीही न समजल्याने गोंधळला पण सरांना काहीतरी सापडलंय हे त्यांनी बरोबर ताडलं.
आणि घरी जाऊन निवांत झाले.
दुसरे दिवशी सकाळी पुन्हा प्रधान आपल्या टीम सोबत फ्लॅट नंबर ५०५५ च्या समोर होते आज दरवाज्या एका लहान मुलाने उघडला.
पोलिसांना दारात पाहून सबनीस थोड्या चिडल्याच कारण पोलीस आल्याचं त्यांनी मुलांना सांगितलं नव्हता हे सगळं समाजव एवढे मोठे ते म्हणून.
घरात जाऊन प्रधान डायरेक्ट मुलांच्या रूम मध्ये गेले त्यांनी दोघांचे स्कूल बॅग बाहेर आणल्या आणि सगळ्यांसमोर त्या रिकाम्या केल्या.
मुलीच्या बॅग मधून छोटे मोठे गमे चे सामान काही छोट्या पेन्सिल इ.. गोष्टी बाहेर पडल्या मुलाच्या बॅग मधून गोट्या छोटे मोठे सामान पण एक छोटे काय किंवा मोठे काय कोणासाठीच नसलेले एक पिस्तूल मिळाले.
हे सगळं पाहून सबनीस तर चक्कर येऊन पडायचाच बाकी होत्या. त्यांना काळतच नव्हतं काय चाललंय.
प्रधाननी बरोबर आणलेली बुलेट त्यामध्ये बसवून पहिली तर त्याच गन ची असल्याचं निष्पन्न झालं.
सबनीस ना देशमुख मॅडम नी सावरलं आणि मग प्रधान त्या मुलाकडे वळले.
त्यांनी त्याला त्याच नाव विचारले त्याने ओजस असं सांगितले.
"बाळा हे पिस्तूल तुझ्याकडे कस आलं?"प्रधान
"पोलीस काका हे माझं सिक्रेट होत मला पप्पांच्या रूम मध्ये सापडलं होत. तुम्हा सगळ्यांसमोर काढलेत आता मी ताईला कास चिडवणार की माझं सिक्रेट नाही सांगणार म्हणून" ओजस
" कधी पासून आहे हे तुझ्याकडे?" ओजस
"सगळं घर साफ करण्याची turn माझा होतं तेव्हा पासून, ताई पप्पांचं कपाट साफ नाही करत म्हणून मी केलं मला तिथे हे सापडलं. पोलीस काका माझे बाबा सुपर हिरो सारखे सुपर हिरो होते म्हणून त्यांना हे पिस्तूल दिल होत.आई म्हणते मी पण सुपरहिरो होणार आणि मग मला पण मिळणार. पण सुपर हिरो छोटे असल्यापासून पिस्तूल ठेवतात म्हणून मी पण ठेवली" ओजस
त्याची निरागसता पाहून प्रधान पण हेलावले.
" तू आज पर्यंत कधी कधी या सोबत खेळलायस?" प्रधान
"सीक्रेट आहे कोणाला सांगायचं नसत नाहीतर पॉईंट्स कमी होतात मी नाही सांगणार."ओजस
"कशाचे पॉईंट कमी होतात बाळा ?"प्रधान
"मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट" असा म्हणून त्याने स्वतःचा मोबाईल आणला
तो प्रधान आणि सबनीसांना एक गमे दाखवू लागला ज्यामध्ये सुपरहिरो येऊन लोकांना मारतो पॉईंट्स वाढवतो आणि गेम जिंकतो.
"हे बघ बाळ आता आपण पार्टनर झालो ना ? मग मला येताच नाही सांग ना कसे पॉईंट्स वाढवले तू?" प्रधान स्वःताला सांभाळत त्याला विचारत होते
"काका आधी यांना मारायचं मग नॉर्मल लोकांना जे त्रास देत त्यांना मारायचं पॉईंट्स मिळतात पण कोणाला सांगू नका नाहीतर तुम्हीच हराल" म्हणून तो निरागतेने हसू लागला.
"बरं मला एक सांग अजून कोणाकडे आहे हा गेम?"प्रधान
"सगळ्यांकडे आशु,आदी,तो खालचा शुभम पण खेळतो....पण त्यांच्या कडे पिस्तूल नाहीए कारण ते सुपरहिरो नाहीत" ओजस
"बाळा तू या पिस्तूल ने रामू दादा वर अटॅक केलास?" प्रधान
"अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? एवढासा आहे तो तो हे करेल का?" सबनीस
"मॅडम पण पिस्तूल इथेच सापडलं आहे. कृपया आम्हाला आमचे काम करू द्या "प्रधान
"काका हो मी आणि तो खेळत होतो आमचं ठरलं होत लास्ट चान्स म्हणून आणि तो हरला मग मी मारलं त्याला."ओजस
"आणि बेटा मांजरींना?" प्रधान
"काका त्या ना घाबरवायच्या एकदा आई ला पण घाबवल होत त्यांनी मग नॉर्मल माणसांना वाचवणं हे सुपरहिरो च काम आहे म्हणून मी त्यादिवशी सकाळी मारलं त्यांना" ओजस
"बाळा कधीपासून तु हा गेम खेळतोस?" प्रधान
"ताई एव्हडा होतो तेव्हा पासून "ओजस
सगळे एव्हिडन्स कॉलेक्ट करून व ओजस ला त्याच्या आई बरोबर कस्टडी घेऊन पोलीस ठाण्यावर परत आले.
केस सोडवली की चालू केली हेच कळत नव्हतं.
आपण मुलांच्या security साठी कधी करमणुकीसाठी देतो मोबाईल पण खरंच ते योग्य आहे का?
मोबाईल देत जरी असून तरी त्यावर ते नेमकं काय करतात हे पाहतो का?
लहान मुलं गेम च्या आहारी जाऊन काहीही करतायत लहान मुलं कशाला तरुण पिढीही तशीच होत आहे.
कोणत्यातरी गेम मधले काहीतरी टार्गेट पूर्ण करायचे एवढे की आपला आपल्या जीवाचा घरच्यांचा विचार अजिबात नाही करायचा?
चूक कोणाची? मोबाईल ची ? मोबाइलला देणाऱ्याची ? घेणाऱ्याची ? गेम तयार करणाऱ्याची ? की चुकीच्या पद्धतीने आहारी जाणाऱ्यांची?
कोणाचीही असो ओजस सारखी मुलं तयार व्हायला वेळ लागत नाही.Virtual जगात जगन सोडलं तर आयुष्यच सुपर हिरो होऊ हे समजावण्याची गरज आलीय.सुपर हिरो पेक्षा नॉर्मल माणूस जास्त खस्ता काहून जगतो आणि जागवतो हे सांगण्याची गरज आलीय.
@किर्ती कुलकर्णी
No comments:
Post a Comment