Thursday, 6 March 2025

|| बाळंतविडा ||

 || बाळंतविडा ||

 

काही महिन्यांपूर्वी माझी डिलिव्हरी झालीमी आई झाले होते.आनंद गगनातमावत नव्हता.दवाखान्यातून घरी आणि मग माहेरी अशी माझी आणिबाळाची रवानगी झाली.

दिवसेंदिवस जात होते मी आणि बाळ दोघेही मोठे होत होतो.तो मलाओळखत होता आणि मी त्याला.आईच्या मालिश-अंघोळीनेनवनवीनपदार्थांच्या खान-पाण्याने दोघेही भरत होतो.बाळामध्ये आणि माझ्यामध्येआई मात्र मोठा दुआ झाली होती त्याच्या एका रडण्यावर तिला कळायचं कित्याला भूक लागलीये कि पोट दुखतंय.त्याच्या रडण्यावर उपाय काय हे पणतिला माहित असायचं.

आई ने समजावलं बाळ कसं रडलं कि काय करायचंचेक पॉईंट्स दिले होते:).तिने समजावलं आई  दूध बाळाला किती महत्वाचं असतदूध कमी होऊनये म्हणून काय काळजी घ्यायची.आई च्या काळजी नेच मी आणि बाळशारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त झालो.

आजही आई कडून रोज नव्या टिप्स मिळतातच कि बाळासाठी काय करायचंआणि काय नाही.एकदा मी तिला म्हणलंआई मी जॉब सोडते मी बाळालामाझा पूर्ण वेळ देऊन गुड मम्मा होतेतरती म्हणाली कि जॉब करणारीमम्मा गुड मम्मा नसते असं असत काआईपण बाळा सोबत रोज शिकतअसते.बाळाची काळजी घेणे आणि बाळासोबत स्ट्रॉंग पणे उभं राहणे म्हणजेआई होणे.एकदा आई झालं कि अडकल्याची भावना  येणे म्हणजे आईआई अडकत नाही ती स्ट्रॉंग होते.एक मानसिक आणि शारीरिक रुपी सशक्तआई  चांगलं बाळ घडवू शकते.

आई च्या याच गोष्टींनी मी आणि बाळ खूप पॉसिटीव्ह व्हायचो.

मी थोडीफार आई म्हणून सशक्त झाले आणि परतीची वेळ आली.तेच आईने बाळंतविडा बद्दल सांगितले.

बाळंत बाई आणि बाळाला जेव्हा सासरची मंडळी न्यायला येतात तेव्हा तेबाळंतविडा घेऊन येतात.

माझ्या नवऱ्याने माझ्याच पसंतीने आईलाबहिणीलावडलांना आणिमेव्हण्याला कपडे बाळाला कपडे आणि दागिनासासूबाईंनी लाडू असे सगळेघेऊन मला आणि बाळाला न्यायला आले होते.

आई पप्पांनी आणि बहीण मेव्हण्याने पण माझ्या सासू सासर्यांनानवऱ्यालामला कपडेबाळाला दागिना आणि कपडे असे सगळे घेतले होते.

जेव्हा लक्षात कि उद्यापासून आई नाहीए बाळाचं आपल्यासोबत काहीपाहायलातेव्हा भोवळ यायची बाकी होती.तसं नवरा म्हणाला कि, "तूकाळजी करू नकोस आपण दोघे मिळून करूयात पण तो आत्मविशासदिसतंच नव्हतातसं तोही तर नवीनच बाबा झाला होता.

रात्री बाळाच्या आवाजाने माझ्याही आधी उठणारी आईआज नसेलमाझ्याजवळ या विचाराने ब्रह्मांड काय असते ते दिसले.

लग्नाच्या विदाई मध्ये पण एव्हडी रडले नव्हते तेव्हडी तेव्हा रडले.आई च्याकुशीत शिरून बाळापेक्षाही लहान होऊन रडत होते.पप्पा समजावत होते, "अंग आम्ही काय लांब आहोत का तुझ्या एका कॉल वर दहा मिनिट मध्येपोहचू". पण मन मानत नव्हतं.तस तर फक्त पाच किलोमीटर अंतर आहेमाझ्या सासरमाहेर मध्ये पण त्यादिवशी पाचशे किलोमीटर एव्हडं जाणवतहोत.त्यादिवशी दिवस खूप लवकर पळतोय असं वाटत होत.सगळं इथंचगोठून जावं असं वाटत होत.

संध्याकाळ झाली जेवण झालेसासर माहेर चे आहेर-माहेर झाले आणिनिघण्याची वेळ आली.हुंदका फोडून रडणं कोसळलं खूप खूप रडू आलं.

तेव्हा एक गोष्ट मात्र प्रखरतेने जाणवली.आई झाल्यावर सगळ्यात जास्तगरज आई ची असते आणि सगळ्यात जास्त जवळ फक्त आई  असते.आईशिवाय लेकीचं बाळंतपण कोणीच करू शकत नाही म्हणूनच कदाचितमाहेरी जाण्याची प्रथा रूढ झाली असावी.खरं तर आई मुलाला एकदाच जन्मदेते पण मुलीला दोनदा देते.

एकदा स्वतःची मुलगी म्हणून आणि एकदा एका तान्हुल्याची आई म्हणून.

तो बाळंतविडा मला एखाद्या सणापेक्षाही मोठा वाटला कारण तिथे काहीचलॉजिकल नव्हतं सगळं फक्त इमोशनल होत.प्रत्येकीच्या आयुष्यात हा क्षणएकदा तरी यावा एकदा तरी प्रत्येकीने बाळंतविडा नक्की उपभोगावा.

हे लिखाण माझ्या आई साठी समर्पित जिच्यामुळे मी आणि माझं बाळ आजसशक्त आहोत..

 

आई तुला Thank You हे खूप कमी शब्द आहेत.तरीही Thank You ...खूपसार Thank You मला पुन्हा आई  म्हणून जन्म दिल्याबद्दल....

 

 

 

-किर्ती

Friday, 26 January 2024

अडकित्ता - सुपारी!!!

 अडकित्ता - सुपारी 


सुपारी,

आज दुपारी भेटली एक सुपारी 

थोडी होती चिडलेली,

त्याहीपेक्षा जास्त रडलेली,

समजेना एव्हडी मजबूत व्यक्ति हिला कोण भेटलं रडवणार?


म्हणलं तिला सांग बाई काय झालं ते,

तुला रडवून कोण गेलं ते?


केली सुरवात तिने स्वतःच्या कर्म कहाणीला,

हमसू हमसू लागली रडायला,


म्हणाली मी टणक म्हणून,

सगळ्यांना वाटतं मी खूप strong ,


नाहीच मुळी तस काही,

प्रत्येक जण मला फक्त अडकित्त्यातच ठेवू पाही,


प्रत्येकाचा अडकित्ता आहे वेगळा आहे,

कोणी ठेवत अपेक्षांच्या अडकित्त्यात,

कोणी धरतं कर्तव्याच्या अडकित्त्यात,

कोणी लादतो तो जबाबदारीचा अडकित्ता,

तर अगदीच कोणी डोक्यात घालतो बत्ता,


गम्मत म्हणजे प्रत्येक अडकित्त्यायची धार ती वेगळी,

कोणी चरचर कापते,

कोणी टोमण्यांनी आग लावते,

कोणाचे ते वागणे जीव तोडते,

तर कोणी अगदीच नजरेनेच धाक भरते,


प्रत्येकाची वेगळी गत, पद्धत नी वेगळा पेच,

इथे तुटते, चुरते, झुरते मात्र मीच,


तिची कहाणी आपलीच वाटू लागली,

तिच्या शब्दात आपलीच व्यथा सांगू लागली,


एवढ्यात एकाने अडकित्ता घेतला,

आणि त्या सुपारीचा एक तुकडा काढला,

अशी ही सुपारी,

मला भेटली एका दुपारी.


-किर्ती कुलकर्णी


Friday, 22 December 2023

बाप आभाळाची माया आणि वटवृक्षाची छाया असतो

 हे अगदी खरेय, अगदीच खरं आहे,

बाप आभाळाची माया आणि वटवृक्षाची छाया असतो,


मला आठवत आम्हाला शाळेत सोडायला आलेले तुम्ही,

अभ्यासात कमी पडल्यावर समजावणारे तुम्ही,

संकटांना पहाडासारखे समोर जाणारे तुम्ही,

आमचं आयुष्य मंदिर व्हावं म्हणून पाया रचणारे तुम्ही,


पप्पा सगळे बोलतात,

तान्ह्याचं पाहिलं ठिकाण आई च गर्भगृह असतं,

पण त्याबरोबर तुमचं काळीज ही असतं,


पप्पा,

माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही आहात,

प्रत्येक संकटाचा आधार तुम्ही आहात,

दादा, मी, अक्षय आम्ही तुमचीच प्रतिकृती आहोत,

पप्पा तुम्ही आणि आई च आमच्या मंदिराचा पाया आणि कळस आहात,


पप्पा आज तुम्ही सेवा निवृत्त होताय,

तुम्ही शाळेतून निवृत्त होताय,

आता तुम्ही आणि आई तुमच्या मनाप्रमाणे जगा,

आम्हाला वाढवताना तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करा,

आपके ये तिनो वीर आपके साथ हे पप्पा...

शेवटी एव्हडेच बोलेल तुम्ही तर महान आहातच आणि तुम्हाला साथ देणारी माझी आई ती पण तुमच्या आभाळाचा आणि वटवृक्षाचाच भाग आहे...


हे खरंच आहे,

आई बाप हे आभाळाची माया आणि वटवृक्षाची छाया असतात...


-किर्ती कुलकर्णी 


Friday, 1 April 2022

शायरी

 रडत असत हृदय,

        पाणी मात्र डोळ्यांना वाहावे लागत,

दूर जातात माणस,

        बोल मात्र नात्यांना ऐकावे लागतात,

तू माझा आहेस हे सांगणार भेटेलही,

        मी तुझी आहे हे सांगणार्यांसाठी नशीबच लागत !!!

                

                       किर्ती कुलकर्णी 

Thursday, 31 March 2022

शायरी

 

शायर ने लफ्ज चुराए तो शायरी बन गयी,

तुम हमे मिले तो कहाणी बन गयी,|

हम यहाँ रुके और, आप चल दिए,

बस बात दिल को भारी पड गयी||

 

                    किर्ती कुलकर्णी

Monday, 7 March 2022

अगं सगळं फक्त तूच करू शकतेस !!!

रोज नवा दिवस जगताना,
रोज नव्याने भारारी घेताना,
सगळ्यांच सगळं बघताना, 
तुझं विश्व हि तू  संभाळतेस,
अगं सगळं फक्त तूच करू शकतेस,

स्वतः मध्ये गुंतताना,
खळाळून हसताना,
स्वतःच भान जपताना,
जगाला जबाबदार बनवताना,
तुझ्यातच जबाबदार तू असतेस,
अगं सगळं फक्त तूच करू शकतेस,,

कधीतरी थकशील,
पण तुझा प्रण सोडू नकोस,
तुझ्यामुळे हे जग आहे हे कधी विसरू नकोस,
तुला जप, तूझ्यसाठी  जग,
तुझ्यातल्या तुला तुझी पॉवर दाखव,
कारण अगं सगळं फक्त तूच करू शकतेस !!!

किर्ती कुलकर्णी
८ मार्च,२०२२ 

Sunday, 28 February 2021

दर्शन दे रे पांडूरंगा आता!!!

 तु श्री कृष्ण तुच पांडूरंग

तूच आहेस वाणीतील अभंग....

तुझे नाम घेता,

तुलसी असे माथा

दर्शन दे रे पांडूरंगा आता!!१!!


तुच ध्यानी मनी

तुच वसे वचनी

तुज संग शोभे माय रुक्मीणी

गाभाऱ्यात उभी आहे

कान्होपात्र

दर्शन दे रे पांडूरंगा आता!!२!!


तुच तुलसी माळ

तुच वाजवी टाळ

तुच आहेस यशोदेचा बाळ

तुला आठविता

दिसे माता पिता

दर्शन दे रे पांडूरंगा आता!!३!!


उभा विटेवरी

कर कटीवरी

मस्तकी शोभे तो जटाधारी

तुझे रूप पाहता

आसु नयनी दाटता

दर्शन दे रे पांडूरंगा आता!!४!!


संत दयानेश्वर, मुक्ताई नि जनी,

तुच आहेस संत शिरोमणी,

तुझ्या पायी आता

जागा द्यावी तत्वता

दर्शन दे रे पांडूरंगा आता!!५!!


                   किर्ती कुलकर्णी