तु श्री कृष्ण तुच पांडूरंग
तूच आहेस वाणीतील अभंग....
तुझे नाम घेता,
तुलसी असे माथा
दर्शन दे रे पांडूरंगा आता!!१!!
तुच ध्यानी मनी
तुच वसे वचनी
तुज संग शोभे माय रुक्मीणी
गाभाऱ्यात उभी आहे
कान्होपात्र
दर्शन दे रे पांडूरंगा आता!!२!!
तुच तुलसी माळ
तुच वाजवी टाळ
तुच आहेस यशोदेचा बाळ
तुला आठविता
दिसे माता पिता
दर्शन दे रे पांडूरंगा आता!!३!!
उभा विटेवरी
कर कटीवरी
मस्तकी शोभे तो जटाधारी
तुझे रूप पाहता
आसु नयनी दाटता
दर्शन दे रे पांडूरंगा आता!!४!!
संत दयानेश्वर, मुक्ताई नि जनी,
तुच आहेस संत शिरोमणी,
तुझ्या पायी आता
जागा द्यावी तत्वता
दर्शन दे रे पांडूरंगा आता!!५!!
किर्ती कुलकर्णी
No comments:
Post a Comment