अगं सगळं फक्त तूच करू शकतेस !!!
रोज नवा दिवस जगताना,
रोज नव्याने भारारी घेताना,
सगळ्यांच सगळं बघताना,
तुझं विश्व हि तू संभाळतेस,
अगं सगळं फक्त तूच करू शकतेस,
स्वतः मध्ये गुंतताना,
खळाळून हसताना,
स्वतःच भान जपताना,
जगाला जबाबदार बनवताना,
तुझ्यातच जबाबदार तू असतेस,
अगं सगळं फक्त तूच करू शकतेस,,
कधीतरी थकशील,
पण तुझा प्रण सोडू नकोस,
तुझ्यामुळे हे जग आहे हे कधी विसरू नकोस,
तुला जप, तूझ्यसाठी जग,
तुझ्यातल्या तुला तुझी पॉवर दाखव,
कारण अगं सगळं फक्त तूच करू शकतेस !!!
किर्ती कुलकर्णी
८ मार्च,२०२२
No comments:
Post a Comment