तेव्हा त्यांची किव आली.......
सोन्यानाण्यात मला मडवल,
हिर्या मोत्यात तोललं,
काही दिवसांनी बापाकडून घेतलेल्या हुंड्याबद्दल कळलं,
तेव्हा त्यांच्या सोने, हिरे मोत्यांची मला किव आली !१
मला पूर्ण शिक्षण दिलं
मला १०० % च्या मार्कात लोळवळ,
माझ्या करिअर च्या कळसावर मला पोहचवलं,
पण नवरा म्हणतोय म्हणून नौकरी सोड सांगितले,
तेव्हा मला त्यांच्या भिकारड्या विचारांची किव आली !२
रोज मी कामावरून येऊन जेवण बनवायचे,
सगळ्यांचे सगळं सांभाळायचे,
एकदा तब्बेत ठीक नसताना,
नवर्याकडे पाणी मागितले तर तू पाप केले हे ऐकले,
त्यावेळी मला त्यांच्या संकुचित विचारांची किव आली!३
No comments:
Post a Comment