पडका जुनाट वाडा ,
उभा रात्रीच्या काळोखात ,
करून गीत कोणी गाते,
त्या किर्र्रर्र्र काळोखात ,
भयाण शांतता ती ,
कधी घुत्कार घुबडांचे ,
आवाज दूर घुमती,
कधी आर्त किंकाळ्यांचे ,
बाळाचे रडणे कधी हसणे,
कधी सूर अंगाईचे,
कधी रडणे ,
मातेच्या आक्रोशाचे ,
पाळण्याची दोरी तिथे कोण हलवितो ?,
कोण देई झोका बाळ शांत पेंगतो?,
प्रश्नांतून प्रश्न हा अनुत्तरित राहतो,
निर्मनुष्य वास्तूत या कोण तिथे राहतो?
कोण तिथे राहतो?
@किर्ती कुलकर्णी
No comments:
Post a Comment