Tuesday, 20 November 2018

तुमची आठवण माझ्या क्षणा - क्षणात राहते !!


श्वासात सुगंध म्हणून राहते ,
मनात अस्तित्व बनून राहते ,
ध्यासात मार्ग शोधात राहते ,
शब्दात कौतुक तरळते ,
आई-पप्पा तुमची आठवण माझ्या क्षणा - क्षणात राहते !

भीती मध्ये धीर देते ,
निर्णयाच्या क्षणी आधार देते ,
समाजात वावरताना संस्कारात येते ,
माझ्या कणा - कणात तुमचेच प्रतिबिंब बहरते ,
आई-पप्पा तुमची आठवण माझ्या क्षणा - क्षणात राहते !

एकटेपणा तुमच्या आठवणीत झुरतोय,
मायेचा ओलावा ठीक-ठिकाणी शोधतोय ,
पप्पा तुमचं पिल्लू परतण्यासाठी क्षण क्षण तडपतेय ,
तुमच्यापासून दूर तरी फक्त तुमच्यातच जगतेय ,
फक्त तुमचं म्हणून जगतेय !!

                                   @किर्ती कुलकर्णी

No comments:

Post a Comment