Monday, 8 October 2018

तुझा हात हाती हवा!!

आयुष्याच्या वाटेवर,
तुझा हात हाती हवा,

अबोल क्षणांमध्येही,
संवाद आपला हवा,

तुझ्या माझ्या प्रेमाचा,
ओलावा त्यात हवा,

तू माझ अस्तित्व,
मी तुझा श्वास हवा,

तुझ्या माझ्या नात्याला,
विश्वास आपला हवा,

आयुष्याच्या वाटेवर,
तुझा हात हाती हवा!!


              किर्ती कुलकर्णी.

No comments:

Post a Comment