Friday, 3 October 2025

तुझी माझी ती मनाची खिडकी….

 मान्य आहे आयुष्याचा पसारा खुप वाढलाय,

काही मागे सुटलेय, काही सोबत घेतलेय,

सुटलेय त्याची खंत वाटणारच, आहे ते ही सांभाळावं लागणारच,

आनंद याचा मानूयात,

एव्हड्या सगळ्यात तुझी माझी ती जागा,

आपली ती खिडकी अगदी जशी होती तशीच आहे,

कधीही कोठुनही उघडली तरी सारखीच…

तुझी माझी ती मनाची खिडकी….


किर्ती

No comments:

Post a Comment