डोंगराच्या पल्याड माझ्या
बा च झोपटं
,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं
खोपटं !!
रुणुझुणु बैलासंग तिथे होते
हो पहाट,
चालू होते मंग
कष्टाचीच रहाट,
गाई - म्हशी बैलासंग
बा राबतो जमिनीत,
काट्या कुट्यातच त्याच्या आयुष्याची
वाट,
बा खातो भाकरी
, लेवतो धोतर,
साधीच राहणी पण
उच्च ते विचार,
बा पेरतो हो
माया, हात करून
राकट,
घालतो हा जगासाठी
अन्न धान्याची समेट,
डोंगराच्या पल्याड माझ्या
बा च झोपटं
,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं
खोपटं !!१!!
बा राबतो शेतात , माय
सांभाळते घर,
किती शोभून दिसतं
तिचं रांगोळीच दार,
माय थापते भाकर,
सांगे संसाराचा सार,
सारा गावचं हो
तिचा,
तिचं कुटुंबच न्यारं,
माय माझी, तपती
ज्योती,
पेले अंधाराचा भार,
तिची निस्वार्थी भक्ती,
तिची साधना कठोर,
डोंगराच्या पल्याड माझ्या
बा च झोपटं
,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं
खोपटं !!२!!
माय - बाप माझे
थोर,
त्यांचे प्रेम हो
अपार,
काय सांगू हो
थोरवी,
ते अमृताचे शिलेदार,
जागा मिळो मला,
त्यांच्याच पायात,
देवा राहुदेत मला त्यांच्याच
सावलीत,
डोंगराच्या पल्याड माझ्या
बा च झोपटं
,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं
खोपटं !!३!!
@किर्ती कुलकर्णी
Kdk...
ReplyDeleteThank you!!!
ReplyDelete