Thursday, 29 November 2018

प्रेम तुझं !!!

तुझ्याकडूनच शिकलेय मी,
प्रेम करायला ,
प्रेम सांभाळायला ,
तूच शिकवलंस राग नसतानाही चिडायला,
छोट्या छोट्या भांडणात मणवायला,
तूच शिकवलंस उगाच त्रास देऊन परत जवळ यायला,
तूच शिकवलंस सगळं प्रेमाने ऐकायला,
तुझ्या विचारात रमायला,
तूच शिकवलंस " I  don't  love  you"  म्हणतानाही,
जीव ओतून प्रेम करायला,
तूच शिकवलंस वेड्यासारखी वाट पाहायला,
छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधायला,
न बोलताही मी तुझी आहे सांगायला,
तुझ्याच कडून शिकलेय खूप प्रेम करायला,
ते निभवायला !!

                        @किर्ती कुलकर्णी 

Tuesday, 20 November 2018

तुमची आठवण माझ्या क्षणा - क्षणात राहते !!


श्वासात सुगंध म्हणून राहते ,
मनात अस्तित्व बनून राहते ,
ध्यासात मार्ग शोधात राहते ,
शब्दात कौतुक तरळते ,
आई-पप्पा तुमची आठवण माझ्या क्षणा - क्षणात राहते !

भीती मध्ये धीर देते ,
निर्णयाच्या क्षणी आधार देते ,
समाजात वावरताना संस्कारात येते ,
माझ्या कणा - कणात तुमचेच प्रतिबिंब बहरते ,
आई-पप्पा तुमची आठवण माझ्या क्षणा - क्षणात राहते !

एकटेपणा तुमच्या आठवणीत झुरतोय,
मायेचा ओलावा ठीक-ठिकाणी शोधतोय ,
पप्पा तुमचं पिल्लू परतण्यासाठी क्षण क्षण तडपतेय ,
तुमच्यापासून दूर तरी फक्त तुमच्यातच जगतेय ,
फक्त तुमचं म्हणून जगतेय !!

                                   @किर्ती कुलकर्णी

पोरकेपण !!

आज पुन्हा ती तिथेच उभी,
त्याच मावळणाऱ्या सूर्याला पाहत,
कदाचित पुन्हा नवीन गार्हाणे मांडत,
पुन्हा त्याला तिच्या व्यथा नव्याने सांगत,
पुन्हा कोणाची तरी करुण कहाणी मांडत,
आज पुन्हा ती तिथेच उभी,
मावळणाऱ्या सूर्याला पाहत!!१!!

तशी तर रोज,
उध्वस्त झालेल्या मुलींना आधार ती देत,
त्यांना उभारी देण्यासाठी,
रोज़च करे मेहनत,
रोज रोज त्याच कहाण्या,
रोज होती पाहत,
रोज हजारो कळ्या,
तिच्याचपाशी धुमसत,
नानाविध अत्याचारातून,
तीच त्यांना बाहेर काढत,
त्यांना पुन्हा जगण्यास,
तीच देतसे हिंमत,
जरी रोज अश्रू दाटून येई,
तरीही कधीही न रडे, फक्त त्या सूर्याला मात्र असे सगळं सांगत !!२!!

आजही अशीच जखडली होती,
त्याच निर्जीव कळ्यांना उमलवण्यात,
काळाने घातली झडप,
तिच्याच चिमुकलीचा केला घात,
एव्हडीशी ती पोर,
आकांताने होती विव्हळत,
त्या नराधमाला ,
तिचे वयही नव्हते कळत?
स्वतःच्या भावावरचा विश्वासच,
फोल ठरला होता,
चिमुकलीच्या मामानेच तिचा,
जीव घेतला होता,
चिमुकल्या जिवाबरोबर,
प्राण तिने हि सोडला,
त्याच सूर्याला कहाणी सांगत,
जीव आज तिचा गेला,
जीव तिचा एकटीचा गेला,
पण त्या सगळ्याच कळ्या आज आहेत पोरकेपणात नाहत,
सगळ्याच कळ्या आज आहेत पोरकेपणात नाहत!!३!!

                                                             @किर्ती कुलकर्णी

Wednesday, 14 November 2018

हम उडणे कि उमंग रखते हे!

गिरने से नहीं डरते हे,
समय आये तो पाहाडों से भी लढते हे,
हम उडणे कि उमंग रखते हे!

मेहनत हो या मोहब्बत जी जाणं से करते हे,
हम तकदीर को झूकाने कि समझ रखते  हे,
हम उडणे कि उमंग रखते हे!

कोई कहता हे, वो घर के वारीस होते हे,
हम तो घर के साथ साथ पुरे जग मे दिया जलातें हे,
हम उडणे कि उमंग रखते हे!

उमीद के साथ जिते हे,
उमीद पे हि जितते हे,
हम उडणे कि उमंग रखते हे!


                                   @किर्ती कुलकर्णी 

आज पुन्हा तुझी आठवण आली!


आज पुन्हा तुझी आठवण आली,


काळ्याभोर नभातून कोणी ,
वीज चमकून गेली,
मळकटलेली ती वृक्ष ,
आज पुन्हा न्हाऊन गेली ,
आळसावलेल्या फुलांतही ,
नवी उमेद जागवून गेली,
या प्रसन्न वातावरणात,
पुन्हा तुझी आठवण आली !
कोणी एक नावाडी,
आठवणींचे जहाज घेऊन आला ,
या आठवणींच्या पाणवठ्यात ,
मला मात्र बुडवून गेला,
नकळत त्या पाण्याने ,
किनाऱ्याची वाट धरली,
आज पुन्हा त्या नावाड्याची  आठवण आली!!


                                   @किर्ती कुलकर्णी

कोण तिथे राहतो?


पडका जुनाट वाडा ,
उभा रात्रीच्या काळोखात ,
करून गीत कोणी गाते,
त्या किर्र्रर्र्र काळोखात ,
भयाण शांतता ती ,
कधी घुत्कार घुबडांचे ,
आवाज दूर घुमती,
कधी आर्त किंकाळ्यांचे ,
बाळाचे रडणे कधी हसणे,
कधी सूर अंगाईचे,
कधी रडणे ,
मातेच्या आक्रोशाचे ,
पाळण्याची दोरी तिथे कोण हलवितो ?,
कोण देई झोका बाळ शांत पेंगतो?,
प्रश्नांतून प्रश्न हा अनुत्तरित राहतो,
निर्मनुष्य वास्तूत या कोण तिथे राहतो?
कोण तिथे राहतो?


                                   @किर्ती कुलकर्णी