Monday, 20 November 2017

एकमेकांचे कधी झालो?

कसा आयुष्यात आलास,
आणि माझ आयुष्यच बनून गेलास,
मैत्रीण म्हणता म्हणता
मी पण तुझ फक्त तुझीच होऊन गेले,
तुझ्या प्रत्येक सवयींच मी कारण बनत गेले,
माझ्या प्रत्येक श्वासांच तू अस्तित्व बनत गेलास,
आपल्या प्रेमाचं झरा फुलवताना आपणच वाहून गेलो,
प्रात्यक्षित आयुष्यात मात्र
दहा पावलेही पार नाही झालो,
आणि मनाच्या जगात परके असून परके नाही राहिलो,
आता तर पूर्णायुष्यासाठी
अनोळखी रे झालो,
प्रश्न तर हा आहे
खरच आपण एकमेकांचे कधी झालो?

No comments:

Post a Comment