खूप जवळ आले रे,
सकाळी लवकर उठून
तुझ्यासाठी डब्बा बनवताना,
तुझ्या आधी fresh होऊन,
तुझ्यासाठी fresh coffe करताना,
तुझ्यात गुंतत गेले रे,
मी तुझ घर सांभाळताना !!
अजून सुंदर होत गेले रे,
तुझ मंगळसूत्र घालताना,
डोळ्यात लाज भरत गेले,
तुझ्यासाठी काजळ लावताना,
तुझ्यात जाऊन लपले रे,
मी माझ्यातून हरवताना,
मी माझे पण विसरून गेले रे,
तुझ होऊन जगताना,
खूप जवळ आले रे,
मी तुझ्यात सामावून घेताना !!