Friday, 28 December 2018

Secret Santa !!

आदिती थोडीशी अंतर्मुख,शांत पण समजदार मुलगी.आज पर्यंत आपण आणि आपलं काम असाच तिचा स्वभाव. जास्त कधी कोणाशी बोलणं नाही.हसणं, बोलणं सगळंच मोजकंच पण सगळ्यात एक आपलेपणा, लाघवीपणा असलेली.कॉलेज आणि कॉलेज कॅम्पस मधून मिळालेला जॉब यामुळे खूप स्वप्न उराशी ठेवून आयुष्याला आनंदात जगणारी.आज या ऑफिस मध्ये जॉईन होऊन तिला एक महिना पूर्ण झाला होता.मागच्या एका महिन्याचा कामाचा रेव्हीव  घेऊन तिचा टीम लीडर लवकर  घरी गेला होता. शुक्रवार वीकएंड यामुळे फारस कोणी ऑफिस मध्ये नव्हतंच पण अदिती नवीन होती अजून इथल्या सवयी स्वीकारत होती त्यामुळे वेळेवर येऊन वेळेवर जात होती.

ऑफिस च्या कॅफेटेरिया मध्ये चहा घ्यायला गेली तेव्हाच तिथे तिला तिच्या कॉलेज मैत्रिणीचा कॉल आला.उद्या भेटायचं ठरवून त्यांनी कॉल एन्ड केला. पण काऊ चा कॉल तिला तिच्या कॉलेज जगात परत घेऊन गेला.

कॉलेज आठवलं कि एक मुलगा तिला आठवायचा. तिला तीन वर्ष सिनियर होता तो.कॉलेज डे ला तिने त्याला पाहिल्याने पहिले त्याचे ते बोलके डोळे,लाघवी हास्य,सरळ नाक आणि महत्वाचं म्हणजे बोलण्यातला खरेपणा नकळत तिने त्याला जास्तच निरखलं होत.पहिल्याच भेटीत ती भाळली होती त्याच्यावर. आजूबाजूला एवढ्या मुली असूनही त्यानेही एकदा तिला निरखलंच आणि यासगळ्यात झालेल्या त्यांच्या नजरा नजर ने ओशाळून तिने नज़र फिरवली, ती परत त्याच्याकडे वळवलीच नाही.

कॉलेज डे च्या त्यारात्री काही केल्या तिचा अस्वस्थपणा कमी होत नव्हता सारखा तोच प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. त्याची अजून माहिती घ्यावी त्याला भेटावं असं सारखं वाटत होत त्याने असं का पाहिलं असावं आपल्यासारखाच तो पण आपला विचार करत असेल का? एक नाही प्रश्नाने ती अजून गोंधळत होती.

तेवढ्यात भावाच्या खोकण्याने तिची तंद्री भंगली आणि झोपलेला माणूस अचानक जागा व्हावा तशी तिला तिच्या बाबांचे शब्द आठवले " बेटा शिकून खूप मोठी हो आणि घराचं नाव रोशन कर" त्याच वेळी तिने बाबांना शब्द दिले होते " मी तुम्हाला लोक नाव ठेवतील असं कधीच नाही वागणार " अचानक कोणीतरी गाढ स्वप्नातून जागं करावं तशी ती उठली आजचे सगळे क्षण कोपऱ्यात सारून तिच्या कुटुंबाच्या कर्तव्यांना सामोरे जायला तयार झाली.

सोमवारी तिच्या ऑफिस मध्ये सीक्रेट सांता हा इव्हेंट होणार होता ज्यामध्ये आपल्याच टीम मधला एक माणूस आपल्याच टीम मधल्या एका माणसाला गिफ्ट देईल पण कोणीही कोणाला गिफ्ट दिल हे सांगायचे नाही असं काहीसा तो खेळ होता ज्यामध्ये तिला तिच्या बॉस साठी गिफ्ट द्यायचे होते.डोक्यातले सगळे विचार बाजूला करून तिने बॉस साठी काय गिफ्ट घ्यावं यामध्ये तीच डोकं घातलं.

सोमवारचा दिवस उजाडला तिच्या डेस्क वर एक इन्व्हलोपे तिच्या नावासकट आणून ठेवले होते. तिने गिफ्ट ओपन केले आणि अवाक झाली कोणीतरी तिला चार वर्ष आधीपासूनचे तिचे काही फोटोंचे एक हॅन्ड created बुक दिले होते. पण तिला हे काळत नव्हते इथे तर मला पूर्ण नावानीशीही कोणी ओळखत नाही मग असे गिफ्ट कोणी दिले ? त्या बरोबर एक चिटठी ठेवली होती ज्यामध्ये लिहले होते जर गिफ्ट कोणी दिले आहे हे जाणून घ्यायचे असेल तर केबिन मध्ये ये. तेवढ्यात तिथे कोणीतरी येऊन सांगितले कि तुला आपल्या बॉस ने गिफ्ट दिल आहे तुझ्या नावाची चिठ्ठी त्यांनी घेतली होती.

आता मात्र ती पूर्ण घाबरली होती आपल्या बॉस कडे आपले एवढे फोटो कसे ते हि असे फोटोज जे आपल्याही माहित नाहीत कधी काढलेत ? कोण आहे हा माणूस ? मला एव्हडं कसा ओळखतो? आणि त्याने असं गिफ्ट का द्यावं आपल्याला? सगळ्या प्रश्नाची उत्तर घ्यायची आणि मगच केबिन मधून बाहेर यायचं असं ठरवून तिने केबिन चा दरवाजा उघडला. त्यावेळी तिचे बॉस त्यांच्या सातव्या मजल्यावरच्या  खिडकीच्या बाहेर काहीतरी पाहत होते. तिने आत गेल्या बरोबर आवाज दिला आणि ते पलटले. तेव्हा ती त्यांना पाहताच बसली तेच बोलके डोळे, लाघवी हास्य, सरळ नाक हो तो तोच होता.

आश्चर्य , आनंद ,भीती सगळ्या भावना एकवटून आल्या तिला कळेचना काय बोलू?
तिच्या सगळ्या भावना समजून आणि जसे की त्याला या सगळ्या हावभाव अपेक्षीत होते असे स्मित हास्य देऊन तो बोलला " मी समजू शकतो की तुला खूप प्रश्न पडलेत तुझे फोटोज माझ्याकडे कसे? मी इथे कसा? तर मी तुला पहिल्यापासून सांगतो , ये इथे बस आपण बसून बोलु."

तो बोलु लागला " तुला आठवतो कॉलेज डे मी तुला पहिल्यांदी पाहिलं आणि तू पण मला, आपल्या पहिल्याच भेटीत मला समजलं होत की तुझ्या मनात मी कुठेतरी जागा घेतली आणि त्याच क्षणी तू पण माझ्या मनात घेतली होतीस.माझ्या खूप मैत्रिणी होत्या, भरपूर मुलींना मी आवडायचो पण, मी मात्र तुझ्यात अडकलो होतो. तुझी माहिती काढून तुला प्रपोज  करायचे आणि नंतर लग्न करून जीवनसाथी व्हायचे हे ठरवून त्या रात्री मी झोपलो.पुढच्याच दिवशी तुझ्या classmate  कडून तू कुठे राहते आणि बाकी सगळी माहिती घेतली.तुझी माहिती घेत असताना तुझ्यासाठी रिस्पेक्ट कण-कण वाढत गेला.आपल्या घरासाठी आई वडिलांसाठी जगणाऱ्या मुलीच्या प्रेमात मी अजूनच अडकत गेलो.कर्तव्यदक्ष ,समजदार आणि ऑफकोर्स या जगात सगळ्यात सुंदर असलेल्या या मुलीच्या काबील आधी व्हायचं हे मी ठरवलं आणि त्याचवेळी स्वतःला हे प्रॉमिस केलं की काही झालं भविष्य काहीही असूदेत पण हिची साथ नाही सोडायची.त्यानंतर तुझ्या नकळत तुझे काही फोटोज घ्यायचं जणू छंदच लागला मला. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.आणि तेच हे फोटोज जे या बुक मध्ये आहेत." तिच्या डोळ्यातले भाव वाचायचा प्रयत्न करून तो पुढे बोलला " अदिती मला माहिती नाही आत्ताही मी तुझ्या काबील आहे की नाही पण एव्हडं सांगतो मी कायम तुझ्या सोबत आहे.तू मला आवडतेस आणि तुझी जागा माझ्या मनात कोणीच नाही घेऊ शकत." मनावरचं ओझं कमी झाल्याचा उसासा टाकून तो पुढे म्हणाला,"तुझ्या हातात अजून दोन ऑफर्स असताना, तू इथे जॉईन करतेय हे कळल्यावर माझ्या आनंदाला पारावार नव्हता राहिला आणि ठरवलं तुला माझ्या मनातल्या भावना सांगायच्या. आणि त्या मी आज सेक्रेटली तुला सांगितल्या " थोडं थांबून तो पुढे बोलला, "मी तुझा सांता काय बनणार तूच माझी सांता आहेस ते पण सीक्रेट, तुझ्या दिलेल्या मोटिवेशनमुळेच मी आज काहीतरी घडू शकलो, तुझ्याही नकळत तुला दिलेल्या वचनामुळे स्वतःला घडवू शकलो.अदिती तुझा निर्णय काहीही असूदेत मी तुझ्या सोबत आहे, तुला पाहिजे तेव्हडा वेळ घे आणि मला कळावं"
अदिती संमोहित झाल्यासारखी तिथेच बसून होती आपल्याला आवडणाऱ्या मुलगा आपला एव्हडा विचार करतो, आपल्यावर एव्हडा जीव टाकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याला नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं, तिलाही तो तेव्हडाच आवडत होता तीनेही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा कधी विचार केलाच नव्हता,तिच्या कल्पनेच्या जगात तोच तिचा राजकुमार होता,आनंदाने तिने तीच त्याला घायाळ करणारी smile  दिली आणि तिचा होकार त्याच्यापर्यंत पोहचवला.
त्या क्रिसमस ला सांता ने खरंच त्यांना गिफ्ट दिल होत आयुष्यभरासाठी,एकत्र राहण्याचं गिफ्ट त्यांना मिळालं होत!!

                        @किर्तीकुलकर्णी

4 comments: