Monday, 3 July 2017

मित्र

एक तरी मित्र असावा 
जीवाला जीव देणारा
चांगल्या वाईट गोष्टी 
तळमळीने सांगणारा,
छान दिसतेस अशी comment देणारा, 
चुकल्यावर परत अशी चूक करू नको
असेही धमकावणारा, 
सगळ्या situation मध्ये सोबत देणारा, 
मुर्खातली मूर्ख गोष्टही समजावून सांगणारा, 
असा एखादा तरी मित्रा असावा 
जीवाला जीव देणारा !!१!!

या मुलीशी setting लावून दे 
असं म्हणणारा, 
पण माझ्याकडे एकाही मुलाला 
न पाहू देणारा,
तू मूर्ख आहेस असं बोलणारा, 
आणि तेवड्याच प्रेमाणे 
येऊन समजावणारा, 
एक तरी मित्र असावा 
जीवाला जीव देणारा !!२!!

प्रतेक वेळी नाही 
पण कधीतरी smile देणारा, 
मित्रांच्या घोळक्यातूनही 
माझ्याकडे लक्ष ठेवणारा, 
रोज नाही 
पण कधीतरी भेटणारा, 
सगळ्या गोष्टींमद्धे 
कायम support देणारा,
खरच एखादा तरी असं मित्रा असावा 
जीवाला जीव देणारा !!३!!

ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे 
हे ठनकावणारा, 
आपल्या नात्याला राखीचीहि गरज नाही 
हा विश्वास देणारा,
मैत्रीच्या पालीकडच 
अमूल्य नात जपणारा,
खरच तुझ्या सारखा मित्रा हवा 
जीवाला जीव देणारा 
जीवाला जीव देणारा !!४!!


             @किर्ती कुलकर्णी

No comments:

Post a Comment