Friday, 14 July 2017

फक्त तु !

तुला पाहिले की दिवसाची सुरवात व्हायची,
मखमली स्वप्ने मनोमन फुलून जायची,
प्रतेक क्षणी ध्यानी मनी तूच होतास,
माझ्या सोनेरी दिवसांचा तूच तर बहार होतास,
किती अलगद बांधल्या गेली आपल्या मैत्रीची गाठ,
खूपच जवळ आलो आणि एकच झाली आपली वाट,
एकमेकांसाठी झुरलो, रडलो, भांडलो, हसलो,
Assignment च्या नावाखाली कित्तेक वेळा भेटलो,
आता मात्र सगळच निराशमय वाटतेय,
असं वाटतेय तू फक्त formality केली होतीस,
तुला माझ प्रेम कधी समजलच नाही,
की तुला माझ्या भावनाच समजल्या नाहीत,
तुझ्यासाठी मी लाखो-करोडो सारखीच एक होते न?
पण माझ्यासाठी मात्र लाखो-करोडो मध्ये फक्त तू होतास,
तुझ्याशिवाय मी राहू तर शकते,
पण खुश नाही,
तुझ्याशिवाय मी हसू तर शकते,
पण मनातून नाही,
तुझ्याशिवाय मी आयुष्य तर काढू शकते,
पण या वेड्या मनाला कसे समजाऊ,
जे फक्त तुझ्याच मागे पळते,
फक्त तुझ्याच मागे पळते !!!!

Tuesday, 4 July 2017

Its time to open the door !!!




दार उघड गड्या तुला,
कष्टाची साथ हाय,
कष्टाला तुला,
तुझ्या ध्येयाची,
वाट हाय,
ध्येयाची दोर,
तुझ्या हातामध्ये हाय,
दार उघड गड्या,
तुला कष्टाची साथ हाय !!
 
ध्येयाच्या दारात,
यशांची फूल हायेत,
यशांच्या फुलांना,
स्फूर्तीचा सुगंध हाय,
स्फूर्तींच्या सुगंधात,
शास्त्राचा वास हाय,
दार उघड गाड्या,
तुला कष्टाची साथ हाय !!

Its time to open the door !!!
 
                         @ किर्ती कुलकर्णी

Monday, 3 July 2017

मित्र

एक तरी मित्र असावा 
जीवाला जीव देणारा
चांगल्या वाईट गोष्टी 
तळमळीने सांगणारा,
छान दिसतेस अशी comment देणारा, 
चुकल्यावर परत अशी चूक करू नको
असेही धमकावणारा, 
सगळ्या situation मध्ये सोबत देणारा, 
मुर्खातली मूर्ख गोष्टही समजावून सांगणारा, 
असा एखादा तरी मित्रा असावा 
जीवाला जीव देणारा !!१!!

या मुलीशी setting लावून दे 
असं म्हणणारा, 
पण माझ्याकडे एकाही मुलाला 
न पाहू देणारा,
तू मूर्ख आहेस असं बोलणारा, 
आणि तेवड्याच प्रेमाणे 
येऊन समजावणारा, 
एक तरी मित्र असावा 
जीवाला जीव देणारा !!२!!

प्रतेक वेळी नाही 
पण कधीतरी smile देणारा, 
मित्रांच्या घोळक्यातूनही 
माझ्याकडे लक्ष ठेवणारा, 
रोज नाही 
पण कधीतरी भेटणारा, 
सगळ्या गोष्टींमद्धे 
कायम support देणारा,
खरच एखादा तरी असं मित्रा असावा 
जीवाला जीव देणारा !!३!!

ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे 
हे ठनकावणारा, 
आपल्या नात्याला राखीचीहि गरज नाही 
हा विश्वास देणारा,
मैत्रीच्या पालीकडच 
अमूल्य नात जपणारा,
खरच तुझ्या सारखा मित्रा हवा 
जीवाला जीव देणारा 
जीवाला जीव देणारा !!४!!


             @किर्ती कुलकर्णी

Miss you!!


💝मी रडताना तुझ मला हसवण,
तू पडताना माझ तुला सावरण,
छोट्याश्या आनंदासाठी,
छोटीशीच काहीतरी गोष्ट करण,
खूप miss करतेय मी,
तुझ ते जीव लावण !

तुला आवडणार्या गोष्टींना
अलगद संभाळण
तुझ्या attitude
गर्व बाळगण
माझ्या पर्यन्त संकटांची
चाहूलही येऊ देन
खूप miss करतेय मी
तुझ ते जीव लावण !!

डोळ्यांनीच डोळ्यांशी
इशार्याने बोलणं
एकमेकांशी बोलताही
सगळं समजण
एकमेकांसाठी आदर
मनात ठेवण
सांगताही मी तुझा आहे
ही जाणीव देन
खूप miss करतेय मी
तुझ ते जीव लावण !!!

कसलाही स्वार्थ ठेवता
एकमेकांसाठी झुरण
एकमेकांच्या विचारांचा
सम्मान करण
एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी
कायम supportive असण
आहे असच
एकमेकांना स्विकारण
खूप miss करतेय मी
तुझ ते जीव लावण !!!!

                        @किर्ति कुलकर्णी