Friday, 22 December 2023

बाप आभाळाची माया आणि वटवृक्षाची छाया असतो

 हे अगदी खरेय, अगदीच खरं आहे,

बाप आभाळाची माया आणि वटवृक्षाची छाया असतो,


मला आठवत आम्हाला शाळेत सोडायला आलेले तुम्ही,

अभ्यासात कमी पडल्यावर समजावणारे तुम्ही,

संकटांना पहाडासारखे समोर जाणारे तुम्ही,

आमचं आयुष्य मंदिर व्हावं म्हणून पाया रचणारे तुम्ही,


पप्पा सगळे बोलतात,

तान्ह्याचं पाहिलं ठिकाण आई च गर्भगृह असतं,

पण त्याबरोबर तुमचं काळीज ही असतं,


पप्पा,

माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही आहात,

प्रत्येक संकटाचा आधार तुम्ही आहात,

दादा, मी, अक्षय आम्ही तुमचीच प्रतिकृती आहोत,

पप्पा तुम्ही आणि आई च आमच्या मंदिराचा पाया आणि कळस आहात,


पप्पा आज तुम्ही सेवा निवृत्त होताय,

तुम्ही शाळेतून निवृत्त होताय,

आता तुम्ही आणि आई तुमच्या मनाप्रमाणे जगा,

आम्हाला वाढवताना तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करा,

आपके ये तिनो वीर आपके साथ हे पप्पा...

शेवटी एव्हडेच बोलेल तुम्ही तर महान आहातच आणि तुम्हाला साथ देणारी माझी आई ती पण तुमच्या आभाळाचा आणि वटवृक्षाचाच भाग आहे...


हे खरंच आहे,

आई बाप हे आभाळाची माया आणि वटवृक्षाची छाया असतात...


-किर्ती कुलकर्णी