मान्य आहे तुला जे हवं ते मी देत नाहीए,
घरात डांबून मी ठेवतेय,
पण मला जे हवं होत ते तू दिलंस का?
एकदा विचार कर मला जे हवं होत ते तू दिलंस का?
नको होती मला धगधगती आग,
हिरव्या शालूत होती माझी आयुष्याची जाग,
नव्हते रे विषाचे द्रव्य,
नव्हते ते हानिकारक किरण,
नव्हते माझ्या पोटात mining चे टोचणं,
नव्हते प्लास्टिक चे माझ्या पोटात सारण,
थंडगार पाण्याच्या सळसळत्या लाटा,
होत्या माझ्या नाभीत जीवजिवांच्या वाटा,
कशासाठी कोणासाठी पोखरले रे डोंगर,
ओरडले, चिडले मी रडले पण मग कोसळल्या दरड,
शांत माझी सरीता मर्यादेत वाहत होती,
तुम्ही घेतली तिची जागा मग ती चिडली,
तीच चिडणं कोणामुळे झालं?
खरंच तुम्ही जे केलं ते बरोबर केलं?
मान्य केलं मी ,खूप प्रगती केली तुम्ही,
पण मला त्रास देऊन,
माझ्या नाभीतून जन्म घेऊन मला त्रास दिला,
हिमालय माझा पुत्र त्यामुळेच रडू लागला,
आता मला माझा वेळ द्या,
माझा हिरवा शालू मला परत द्या,
मी तुमचीच आहे तुमच्याच साठी आहे,
फक्त एकदा मला आई म्हणून तुम्हाला बेस्ट देऊद्या !!
@ किर्ती कुलकर्णी
घरात डांबून मी ठेवतेय,
पण मला जे हवं होत ते तू दिलंस का?
एकदा विचार कर मला जे हवं होत ते तू दिलंस का?
नको होती मला धगधगती आग,
हिरव्या शालूत होती माझी आयुष्याची जाग,
नव्हते रे विषाचे द्रव्य,
नव्हते ते हानिकारक किरण,
नव्हते माझ्या पोटात mining चे टोचणं,
नव्हते प्लास्टिक चे माझ्या पोटात सारण,
थंडगार पाण्याच्या सळसळत्या लाटा,
होत्या माझ्या नाभीत जीवजिवांच्या वाटा,
कशासाठी कोणासाठी पोखरले रे डोंगर,
ओरडले, चिडले मी रडले पण मग कोसळल्या दरड,
शांत माझी सरीता मर्यादेत वाहत होती,
तुम्ही घेतली तिची जागा मग ती चिडली,
तीच चिडणं कोणामुळे झालं?
खरंच तुम्ही जे केलं ते बरोबर केलं?
मान्य केलं मी ,खूप प्रगती केली तुम्ही,
पण मला त्रास देऊन,
माझ्या नाभीतून जन्म घेऊन मला त्रास दिला,
हिमालय माझा पुत्र त्यामुळेच रडू लागला,
आता मला माझा वेळ द्या,
माझा हिरवा शालू मला परत द्या,
मी तुमचीच आहे तुमच्याच साठी आहे,
फक्त एकदा मला आई म्हणून तुम्हाला बेस्ट देऊद्या !!
@ किर्ती कुलकर्णी