Tuesday, 21 May 2019

चंद्र !!

मिठीत तुझ्या विसावले मी,
मधू चंद्राचा असताना,
तोच चंद्र पुन्हा पहिला,
रवी खिडकीतून डोकावताना !!१!!

शांत निखळ या चंद्रामध्ये,
नकळत पुन्हा हरवले मी,
पुन्हा होऊन गुलाबी लाल,
स्व नशिबावर भारावले मी !!२!!

आयुष्यात तुझ्या रोज हरवते,
नव्याने स्वतःला सापडताना,
तोच चंद्र नव्याने पाहते,
रवी खिडकीतून डोकावताना !!३!!


                                  @किर्ती कुलकर्णी

गुज !!

साद मनाची अवचित आली,
गुज प्रेमाचे सांगून गेली,
अबोल या मनाचे,
कवाडे हि उघडून गेली,
नजरेतून नजरेचे,
खेळ नवे शिकवून गेली,
साद मनाची अवचित आली,
गुज माझे उलघडू लागली !!१!!

साद मनाची अवचित आली,
भास - आभासात जगू लागली,
गर्दीतही तुझा,
कानोसा घेऊ लागली,
क्षितिजापर्यंत,
तुझ्याच जगात नांदू लागली,
साद मनाची अवचित आली,
गुज तुझे रे सांगून गेली !!२!!

साद मनाची अवचित आली,
सर्वस्व रे घडवून गेली,
सगळ्या नात्यांपलीकडे,
मैत्री आपली सुखावून गेली,
माझ्यातला तू तुझ्यातली मी,
जग वेगळे जगवून गेली,
साद मनाची अवचित आली,
गुज आपले घडवून गेली
गुज आपले घडवून गेली !!३!!


                          @किर्ती कुलकर्णी

Saturday, 4 May 2019

कशी विसरू?

ती जागा कशी विसरू?
जिथे स्वप्न तुझे तरंगते..
ती हवा कशी साठवू?
जी तुला स्पर्शून येते?
ते अश्रू कसे लपवू?
जे तुझ्या आठवणींचे असतात....
आपली आठवण , अश्रू,स्पर्श,स्वप्न सगळं  ह्रुदयात खोल बसले...
सांग कसं विसरू?
मी तुझी साथ द्यायची?

              @ किर्ती कुलकर्णी