Wednesday, 6 February 2019

Virtuality : भाग १

Virtuality : भाग १

  पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणावर वसलेली कल्पतरू सोसायटी.सोसायटी च्या चारही बाजूने वेढलेली उंच उंच झाडी आणि नंतर पाच बिल्डिंग गोलाकार उभ्या असलेल्या. एक मोठं प्रवेश द्वार सगळ्या बिल्डिंग साठी कॉमन असलेलं.अजूनही दोन छोटी गेट होते एक emergency एक्सिट म्हणून आणि एक सेकंड option म्हणून.एका बिल्डिंग मध्ये साधारण पन्नास घर असतील काही डुप्लेक्स फ्लॅट होते तर काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले.बिल्डिंग च्या मधोमध मोठं आणि छान उद्यान तयार केलेले होते.ज्यामध्ये जिम ,लहानमुलांना खेळण्यासाठी वेगळा परिसर,सिनियर सिटीझन साठी laughing  क्लब व पेडेस्टरीण एरिया असा बराच मोठा परिसर या सोसायटी ने सोयी सुविधांसाठी वापरला होता .एकूणच सगळ्या वयाच्या लोकांसाठी अतिशय उच्च अशी हि जागा होती.तसेच विविध सामाजिक उपक्रमातून इथली लोक सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीही जपत असत.याच मध्ये गणपती ,दांडिया, ईद,दिवाळी,मोहरम इत्यादी...सणांचा प्रामुख्याने सहभाग असे. उच्चब्रू लोकांच्या या सोसायटी मध्ये आता काही सो कॉल्ड टेकनॉलॉजिकल किडे रुजू लागले होते त्यामुळे कधीतरी लहान मुलांनी गजबजणार उद्यान अभ्यास,हा क्लास ,ती ट्युशन नको तेवढ्या पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा यामुळे बऱ्याच वेळा रिकामं राहू लागलं.कोणत्या तरी सणाच्या निमित्याने किंवा कोणाच्या तरी वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या वेळी एकत्र येत होते लोक.मोबाईल,लॅपटॉप,ipad, याच्या नादात सगळं जगच virtual होत आहे तर हि सोसायटी कशी अपवाद ठरेल ?
आजची सकाळ हि तिथे नेहमी सारखी होती. काही लोक मॉर्निंग वॉल्क साठी आलेले, काही लोक भाज्या विकण्यासाठी काही lughing क्लब मध्ये होते.शाळकरी मुले शाळेत निघाली होती.प्रसन्न वातावरण मध्ये जो तो आपापल्या प्रपंचात मश्गुल होता.
तेव्हड्यात ढीश्शह..... असा मोठा आवाज झाला आणि सगळे आवाजाकडे निघाले.जवळ गेल्यावर काय झाले आहे हे कळत होते.रामू दादा याला गोळी मारली होती कोणीतरी. रामू दादा हा शाळकरी मुलांना नेऊन आणून सोडण्यासाठी ठेवलेला माणूस होता.साधारण २५ ते ३० वर्ष वयातला पण मागचे आठ नऊ वर्षांपासून काम करत असल्याने सोसायटी चा एक जवळचा व्यक्ती बनलेला.रामू दादाला कोणी गोळी मारली? खरं तर पिस्तूल कोणाकडे आली? इथून प्रश्न येत होते.सोसायटी मध्ये काही लोक पोलीस होते, कोणी वकील, कोणी डॉक्टर, वेगवेगळे व्यवसाय करणारे, कोणी स्वरक्षणासाठी घेतलेली होती.पण रामू दादा सारख्या माणसाला मारून कोणाला मिळणार होते? त्याकडे ना पैसे ना तो कधी कोणाच्या अधे मध्ये.
जोशी काका सोसायटी चे चेअर पर्सन म्हणून त्यांनी पोलिसांना कॉल करून माहिती दिली. काही वेळातच पोलीस हजर झाले.रामू चा मृत देह उताणा पडला होता गोळी फार जवळून मारली होती.डाव्या बाजूच्या छातीला वरच्या बाजूने गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला होता. प्रथमदर्शनी काहीच संशयास्पद वाटत नव्हतं.रामू दादा च्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा त्याला कोणी मारणारे हे हि त्याला माहित नसावे असे वाटत होते.पण पोलिसांना तेच शोधायचे होते असे काय झाले ज्यामुळे कोणीतरी त्याला मारले असावे तेही एवढ्या सहज पणे.इन्स्पेक्टर प्रधान यांनी प्रथम पाहणी करून बॉडी पोस्टमार्टम ला पाठवली आणि हवालदार नाईक व लेडीज कॉन्स्टेबल देशमुख यांना पूर्ण सोसायटी ची पाहणी व रामू बद्दलची सगळी चौकशी करायला सांगितली.
दुपारच्या वेळेत प्रधान त्यांच्या ऑफिस मध्ये केस चा विचार करत बसले होते. हवालदार नाईक व कॉन्स्टेबल cctv फुटेज, बिल्डिंग मधल्या लोकांची माहिती व पोस्टमार्टम रिपोर्ट अशी सगळी इत्यंभूत माहिती घेऊन आले.

हवालदार नाईक बोलू लागले,"सर,एकूण सहा लोकांकडे पिस्तूल आहे ते कबूल झाले आहेत. Mr पाटील जे डॉक्टर आहेत,मिस दीक्षित फॅशन डिझायनेर,मिसेस स्वर्णलता देशपांडे बँक मालक, Mr जोशी रिटायर्ड आर्मी ऑफिसर,मिसेस अग्निहोत्री बिसनेस आहे त्यांचा आणि राहुल महाडिक कॉन्ट्रॅक्टर.यांनी प्रत्येकाने पिस्तूल ठेवण्याचे वेगवेगळे कारण दिले आहेत.ज्यामध्ये मिस दीक्षित यांचं कारण फारसं पटण्यासारखं नाहीए त्यांचं म्हणणं असं आहे कि त्यांचा एक्स बॉयफ्रेंड बऱ्याच वेळा त्यांच्या कडे येत असतो आणि तो त्रास पण देतो म्हणून त्यांनी स्वरक्षणासाठी ती पिस्तूल त्यांच्या जवळ ठेवली आहे.पण कोणत्याच पोलीस स्टेशनला त्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंड ची complain नाही केलीय. पाटील हे एक मोठे surgien असून आता पर्यंत त्यांच्या वर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला आहे म्हणून त्यांनी पिस्तूल त्यांच्या जवळ ठेवली आहे आणि याची शहानिशा केल्यावर ते खरं बोलतायत याचे पुरावेही मिळाले आहेत.मिसेस स्वर्णलता या एका बँकेच्या मालक आहेत त्यामुळे त्यांनी सेफ्टी साठी तर जोशी हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर म्हणून त्यांच्या कडे हि पिस्तूल आहे.सर हा महाडिक, नावाचा भाज्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे भाज्यांचा सोडून अजूनही त्याचे बरेचसे धंदे आहेत ज्यामध्ये लोकांना धमकावून गाळे खाली करून घेण्यापासून जबरदस्तीने चंदा गोळा करायला लावणे इथं पर्यंत."
मगापासूनच्या संवादामध्ये पहिल्यांदाच देशमुख बाई बोलत होत्या "सर एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे या महाडिक ची बायको सगळ्यांशी थोडं जास्तच सलगीने बोलते शक्यतो पुरुषांशी.यावरून तिचे आणि Mr महाडिक यांचे बऱ्याच वेळा वाद झालेत असेही कळले आहे."
"हो सर मॅडम च्या बोलण्यात तथ्य आहे मी ते अनुभवले" नाईक थोडे ओशाळुनच बोलले.
"ओके, पण यांच्या कोणाकडेच रामूला मारण्याचा काहीच हेतू नाहीए.ज्यांच्याकडे पिस्तूल आहेत हे कबूल झालेत त्यांचे licence चेक केलेत?"
"हो सर त्यांचे licence चेक करून त्यांच्या झेरोक्स आपल्या रेकॉर्ड घेतल्या आहेत."नाईक
"ओके गुड,पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये गोळी जवळून लागल्याने कॅव्हिटी तयार होऊन रक्त प्रवाह थांबला आणि म्हणून लगेच मृत्य झाल्याची नोंद झालीय." इन्स्पेक्टर प्रधान.
"रामूच्या घरी जा व लवकरात लवकर माहिती घ्या. तसेच आपल्या सगळ्या माहिती पुरवणाऱ्यांना सोसायटीवर नकळत नजर ठेवायला सांगा. मला एकूण एका गोष्टीची माहिती हवी आहे. कोणत्याही हेतू शिवाय एव्हडं मोठं धाडस कोणी करणार नाही आणि तो हेतू काय आहे हे काळाल्याशिवाय आपण खुन्यापर्यंत पोहचू शकणार नाही."प्रधान
"येस सर,म्हणून नाईक कामाला लागले सुद्धा."
हवालदार नाईक बरोबर पोलिसांची गाडी रामूच्या घराजवळ येऊन थांबली.
घरामध्ये शोक कळा पसरली होती.रामूची आई, वडील, लहान, बहीण, एक भाऊ सगळेच भान हरवून बसले होते.गरीब असले तरी त्यांच्यातले प्रेम दुरूनही दिसत होते.घरात कमावणार रामू एकटाच होता.बहीण वे भाऊ शिकत होते आई थकलेली दिसत होती वडील एका पायाने अधू.रामू कल्पतरू सारख्या अजून तीन चार सोसायटी मध्ये काम करायचा शाळकरी मुलांना न्यायचं आणायचं आणि त्यानंतर एका ठिकाणी ड्राइवर म्हणून जात होता.
रामू स्वतःहा जास्त शिकलेला नसला तरी शिक्षणाची आस होती त्याला.ज्याला जशी जमेल तशी मदत करायचा तो.एकूणच चारित्र्य आणि सामाजिक शैल्य तो जपून होता.

दुसरा दिवस : स्थळ पोलीस स्टेशन:

रामूचा खून होऊन आज २ दिवस झाले होते अजून खुनी मोकाट होता.रामूची मिळालेली माहिती नाईकांनी प्रधानना दिली.त्यातूनही काहीच संशयास्पद मिळालं नव्हतं.
पुढच्या तपासासाठी आता पोलिसांनी परत कल्पतरू ला भेट दिली.पण तीही भेट फारशी उपयोगी नाही ठरली.
पुरावे भेटत नाहीत कळल्यावर आता जबानी घेणे हेच पोलिसांच्या हातात होते आणि त्यासाठी लागणार होती कसून तपासणी.माहितीगारांकडूनहि काही विशेष माहिती मिळत नसल्याने पोलीस वरचे वर जास्तच कोड्यात जाऊ लागले.
यावर उपाय म्हणून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब च्या मदतीने आता गोळी मारणाऱ्या व्यक्तीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
फॉरेन्सिक लॅब च्या हेड डॉक्टर अपर्णा इन्स्पेक्टर प्रधानांना सांगत होत्या " गोळी मारणारा व्यक्ती मृत व्यक्ती पेक्षा उंची ने कमी असावा. तो साधारण उजव्या बाजूने ने वाकडा उभा असेल म्हणून गोळी लागताना बरोबर गोळी डाव्या बाजूने लागली आहे.गोळी मारणारा व्यक्ती जास्तीत जास्त चार हाथ लांब असेल."
फॉरेन्सिक डॉक्टर ना धन्यवाद देऊन प्रधान पोलीस स्टेशन कडे जातानाच त्यांनी नाईकांना कॉल करून कल्पतरू मधील सगळ्यांच्या उंची आणि त्यादिवशी उद्यानात असलेले सगळ्यांचे फिंगर प्रिंट्स अशी माहिती घेऊन होईल तेवढ्या लवकर पोलीस स्टेशन ला यायला सांगितले.
प्रधानना हवी असलेली सगळी माहिती घेऊन नाईक पोलीस स्टेशन ला आले त्याच बरोबर अजून एक माहिती त्यांनी आणली ती म्हणजे कल्पतरू मध्ये ते होते तेव्हाच दोन मांजरीचं खून झालाय ते पण त्याच प्रकारे ज्या प्रकारे रामू चा झाला.

(रामू चा खून कोणी केला व का केला? तसेच मांजरींनी त्या खुन्याचा काय बिघडवल होत? खरंच कोणी खुनी होत कि अजून काही यासाठी वाचा पुढचा भाग.)

(माझ्या कथा वाचाण्यासाठी खूप धन्यवाद.)

                                  @किर्ती कुलकर्णी