Wednesday, 1 August 2018

अंतरंग

तूही एक लाट मीही एक लाट,
निवांत विहर आहे आपला,
या प्रेमाच्या सागरात,
कुठून आली ती समाजाची नाव,
छेदून गेली आपल्या परिसीमांचा गाव,
उसळलो आपण कणाकणात,
आणि म्हणूनच एक झालो आपण अंतरंगात!!


@किर्ती कुलकर्णी