खळखळ झर्याचा आवाज,
तुझ्या हसण्याचा भासत होता,
हिरव्या गार गवतावर ओलावा,
मातीचा जाणवत होता,
मंद सुगंधी फुलांच्या वासात,
मी भास तुझा शोधत होते,
उगाचच पालटून मावळणार्या
सूर्याला पाहताना,
मी सावली तुझी शोधत होते,
तुझे भास आभासचे क्षण मी
पुन्हा जगत होते,
कळत – नकळत मी पुन्हा तुझ्याकडे
परतत होते !!